मोह मोह के धागे भाग 15

Story Of Love
मोह मोह के धागे भाग १५
क्रमश : भाग १४
राधिका " मीरा कुठे तुला भेटली ? आणि कधी भेटली ते सांग ना अजय .. "
अजय " थांब ग .. हे जे मी सांगतोय ना तेही जास्त महत्वाचे आहे .. माझ्याशी लग्न करण्यासाठी तू जे काही बोलतेय त्याला काही अर्थ नाहीये हे तुलाही कळले पाहिजे .. प्रेमाचा खरा अर्थ तुला कळला पाहिजे .. ह्यासाठी मी हे सगळे सांगतोय .. आणि त्यामुळे माझे विचार तुला कदाचित कळतील आणि पटतील”
राधिका " बरं .. बोल आता .. आय कान्ट वेट "
अजय " पुढे बऱ्याच महिन्यांनी एक दिवस रोहन चा मला कॉल आला मला म्हणला ... \" अजय , मी प्रॉब्लेम मध्ये आहे .. मला तुझी मदत हवीय .. मी म्हटले काय मदत ..?
एकदा भेटायला ये .. पण निवांत भेटून बोलू .. तर तो मला म्हणाला तू माझ्या घरी येशील का ? म्हणजे निवांत बोलता येईल \"
का कुणास ठाऊक मी पण लगेच तयार झालो .. त्याने मला पत्ता पाठवला .. मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी निघालो मी त्याच्या घराजवळ गेलो तर कोणीतरी एक लेडी जोरात ओरडल्याचा भास झाला .. एक आर्त किंकाळी होती " वाचावा ...वाचवा "
मी गाडीतून लिटरली धावतच बाहेर आलो ..
जिकडून आवाज येत होता तिकडे धावत गेलो तर एका गरोदर स्त्रीला कड्यावरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न चालू होता .. मी तिकडे जायला आणि तिचा दुपट्टा हवेवर उडत पाण्यात गेला .. माझे लक्ष तिच्या पोटाकडे गेले .. बऱ्यापैकी दिवस भरले होते त्या बाईचे .. गरोदर स्त्री जिवाच्या आकांताने ओरडत रडत होती .. नका मारू मला .. माझ्या बाळाला जगात येऊ द्या .. प्लिज हे पाप नका करू .. " बोले पर्यंत कोणीतरी तिला लीटरली दगडाने मारले आणि ती पुन्हा ओरडली " रोहन ... रोहन ... "
रोहन असे नाव ऐकताच माझ्या पाया खालची जमीन सरकली ... माझ्या गाडीत सेल्फ डिफेंस साठी असणारी माझी पिस्तूल मी काढली आणि एक गोळी हवेत उडवली ..
बंदुकीचा आवाज ऐकून त्या मारेकऱ्यांना बहुदा मी पोलीस वाटलो .. ते मारेकरी तिला तिथेच टाकून पळाले ..
मी त्या स्त्रीला आधार द्यायला गेलो .. पण ती बेशुद्ध पडली होती .. तिच्या शरीरावर ठीक ठिकाणी मार लागला होता .. रक्त वाहत होते .. तिला पटकन हातावर उचलूंन मी गाडीत मागच्या सीटवर ठेवले .. आणि गाडीत बसतच मी रोहनला कॉल केला
फोन घराच्या आजू बाजूला बाहेर वाजतोय असा आवाज आला म्हणून त्या आवाजा कडे गेलो ..
बघतो तर .. रोहन रक्ताच्या थारोळ्यात शेवटचा श्वास घेत होता .. त्याच्या फोन त्याच्या खिशात होता .. त्यालाही त्या लोकांनी लिटरली दगडांनी ठेचून मारले होते .
रोहन फोनच्या आवाजाने डोळे उघडले आणि समोर मला बघितले
रोहन " माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला वाचवं .. " एव्हडंच तो कसा बसा बोलला आणि तो तिथेच गेला ..
रोहनने माझ्या समोर प्राण सोडले पण त्याचे लक्ष सगळे त्याच्या बायकोकडे आणि होणाऱ्या बाळाकडे होते .. मरताना मला हात जोडले होते त्याने .. आणि शेवटचे शब्द बायकोला आणि बाळाला वाचव .. दरदरून घाम फुटला होता मला .. काय करू काय नको करू काहीच सुचे ना .. इकडे त्याची बायको मरणाच्या दारात होती .. बेशुद्ध होती .. ह्याला इथेच असे टाकून जाणे मला पटत नव्हते पण दुसरा पर्याय नव्हता ..
मी त्याच्या बायकोला घेऊन चांगल्या हॉस्पिटल मध्ये आणली .. आणि ऍडमिट केली .. तिला खूप ठिकाणी इन्जुरीज होत्या .. तब्बेत हलाखीची होती .. डिलिव्हरी जवळ आली होती .. डॉक्टरांनी बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका आहे असे मला सांगितले .. मला दरदरून घाम फुटला .. सारखा हसरा , डॅशिंग रोहन डोळ्यांसमोर यायचा आणि मग त्याचे ते वाक्य " बाळाला आणि बायकोला वाचव .. " हे आठवायचं ..
डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन करून डिलिव्हरी करून घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे निदान बाळ सुखरूप राहील .. तिच्या जखमा बघून हि पोलीस केस आहे असे मला डॉक्टरांनी सांगितले .. पण मी खूप रिक्वेस्ट करून थोडी माझी पॉवर वापरून .. ती माझि बायको आहे हे दाखवून तिचे ऑपरेशन करून घेतले .. ऑपरेशन झाल्यावर एक गोंडस बाळ माझ्या हातात डॉक्टरांनी दिले आणि नर्स मला म्हणाली " अभिनंदन तुम्ही बाबा झालात " मला हसावं का रडावं काहीच कळत नव्हते .. पण त्या इवल्याशा जीवाला बघून रोहन मात्र सारखा आठवत होता .. माझा मित्र रोहन गेल्या नंतर मी रडलोच नव्हतो .. पण रोहनचे बाळ हातात आल्यावर मी लहान मुलांसारखा रडलो .. थरथरणाऱ्या हातात रियाला छातीशी लावले आणि तिच्या कपाळावर किस केला आणि बोललो " रोहन, तुझ्या बाळाला वाचवलंय .. हे बघ तुझे बाळ माझ्या हातात आहे .. तेवढ्यात माझ्या लक्षात आले हिची आई ... मी लगेच नर्स ला विचारले " बाळाची आई कशी आहे ?"
नर्स " त्यांची तब्बेत थोडी क्रिटिकल आहे .. बघू अर्ध्या तासात कळेल "
तेवढयात बाळ रडायला लागले .. मग बाळाला दूध देताना उडालेली गाळण .. तिला कोणी हात जरी लावायला आले तरी मी लगेच " हळू .. केअरफूल " बोलू लागलो .. तिची काळजी घेता घेता तिचा डॅड कधी झालो हे कळेलच नाही ..
मध्ये रियाच्या आठवणीने पुन्हा डोळे भरून आले त्याचे .. राधा त्याच्या जवळ गेली .. त्याच्या दंडावर हात रब केला तिने " यु आर ब्रेव्ह बॉय "
तसा तो सावरला
राधिका " मी कॉफी करून आणू का ?"
अजय " नाही नको .. चल मी तुझ्यासाठी कॉफी करतो "
मग दोघे खाली किचन मध्ये गेले .. चक्क अजयने मस्त फेसाळलेली कॉफी दोघांसाठी केली .. आणि ते दोघे अजय च्या रूम मध्ये आले ..
अजय ने रियाचा एक अल्बम बाहेर काढला आणि तिला दाखवला
रिया एकदम लहान बेबी असताना त्याने तिला हातात घेतलेले , तिच्याशी खेळतानाचे असंख्य फोटो राधिका बघत होती
राधिका एकदम भावुक झाली .. " अजय , किती क्युट आहे तुझी बेबी "
अजय " येस शी इज .. लाईक हर मॉम .. बट हर आईज आर सेम लाईक रोहन "
राधिका " तिला माहितेय का कि तू तिचा खरा डॅड नाहीयेस ते "
अजय " नो .. कधीच कळणार नाहीये हे तिला .. ती फक्त आणि फक्त माझि बेबी आहे " एकदम करारी आवाजात तो बोलला
राधिका " मीरा .. "तिने शिताफीने विषय बदलला
अजय " अर्ध्या एक तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सांगितले कि ऑपरेशन झालेय पण एक वाईट बातमी आहे .. "
मी मनोमन देवाचा धावा करू लागलो " प्लिज देवा , ह्या लहान जीवाला आई पासून दूर करू नकोस .. प्लिज सेव हर
डॉक्टर " शी इज इन कोमा "
अजय " ओह गॉड !!"
डॉक्टर " तिचा मेंदू जणू जाणून बुजून रिपॉन्स देत नाहीये .. तिच्या डोळ्यांनी तिने असे काही बघितलंय कि आता जगायची इच्छाच जणू नाहीशी झालीय .. बॉडी मेडिसिनला रिस्पॉन्स देतेय .. म्हणून वाचलीय "
अजय " म्हणजे ती कधी शुद्धीवर येईल .. बाळाला आई भेटली पाहिजे .. तिची आई वाचली पाहिजे "
डॉक्टर " मिस्टर अजय , ती कधी शुद्धीवर येतील हे आपण नाही सांगू शकत .. जेव्हा त्यांच्या मेंदूला पुन्हा जगण्यासाठी आशा उत्पन्न होईल तेव्हाच त्या शुद्धीवर येतील. "
अजय " डॉक्टर , प्लिज डू समथिंग . प्लिज सेव हर "
डॉक्टर " अजय , आपण प्रयत्न करू .. पण मी ५ % सुद्धा ग्यारेंटि देत नाहीये .. सहा महिने वाट बघू . मग काय ते बोलू "
--------------
तर अशा पद्धतिने मीरा माझ्या आयुष्यात आली .. मला ती रोहनची बायको या व्यतिरिक्त तिचे नाव सुद्धा माहित नव्हते ..
राधिका " तिच्या नवऱ्याचा कोणी खून केला कळले नाही का ?"
अजय " दुसऱ्या दिवशी पेपर आणि न्यूज चॅनेल वर दिवसभर दोघांचे फोटो दाखवत होते .. घरात घुसून दरोडे खोरांनी नवरा बायकोला संपवले .. नवऱ्याचा दगड़ाने ठेचून खून तर गरोदर बायकोला कड्यावरून खाली पाण्यात फेकून दिले .. बायकोचे मृत शरीर शोधण्याचा प्रयत्न चालू आहे पण तिच्या ओढणी व्यतिरिक्त काहीच सापडले नाही ..
राधिका "ओह !! गॉड.. दरोडेखोर .. हे सगळे अजून होते आपल्याकडे ?"
अजय " अजिबात नाही .. नक्कीच काही तरी घोळ होता ..पण मुद्दामून लक्ष दिले नाही .. कारण आता तिची तब्बेत आणि माझ्या वर नव्याने आलेली बाळाची जवाबदारी ती जास्त महत्वाची होती .. "
राधिका " म्हणजे ?"
अजय " म्हणजे .. मला असे वाटतंय कि हि बातमी कोणीतरी मुद्दामून दाबून टाकली होती .. दरोडखोरांच्या नावावर .. कारण पोलिसांना जर तपासच करायचा असता तर लास्ट कॉल माझा होता .. मी त्या लोकेशन ला होतो .. पण तपासणी साठी मला एक सुद्धा कॉल आला नाही .. आणि मी मुद्दामून त्याकडे लक्ष दिले नाही .. ज्या अर्थी रोहन मारला गेला त्या अर्थी अजूनही मीराच्या लाइफला धोका होता .. तिला मारायचे होते त्यांना.. पण मी तिथे अचानक गेल्यामुळे ती आणि रिया वाचली ..तेही रोहन मुळे .. त्याने मला कॉल करून बोलावून घेतले म्हणून "
राधिका " तरी पण ? "
अजय " तरी पण मी माहिती काढायला पाहिजे होती हो ना ?"
राधिका " हो .. म्हणजे कदाचित माहिती काढली असतीस तर आता ती कुणीकडे आहे हे आपल्याला लगेच कळले असते ... "
अजय " तुला काय वाटत मी हे मी केलं नसेल ?"
राधिका " सांग ना मग "
अजय " माझी उद्या सकाळची फ्लाईट आहे .. मी इटलीला जातोय .. आय नीड सम रेस्ट .. बाकीच्या गप्पा आपण नंतर मारू कधीतरी "
राधिका " अजय , सांग ना .. "
अजय " बरं .. चल शॉर्ट मध्ये सांगतो .. दोघांनी पळून लग्न केलं होते .. मीराच्या घरचे श्रीमंत होते .. आणि रोहन गरीब आणि वेगळ्या कास्टचा होता .. मीराच्या घरच्यांना हे लग्न म्हणजे अपमान वाटत होता .. आणि त्यांनीच दोघांना मारायचा कट केला होता .. भाड्याचे दरोडखोर आणून .. आणि केस पैसे देऊन मिटवून टाकली .. पण यात गंमत अशी आहे कि .. मीरा मेलीय असेच त्यांना वाटत होते .. मग मी तिच्या भूतकाळातल्या लोकांना तिच्या समोर न आणायचे ठरवले.
मीरा हे नाव मी ठेवलंय .. तिचे खरें नाव मीनाक्षी आहे .. पण कोमातून बाहेर आल्यावर जणू तिचा नवा जन्मच झालाय .. म्हणून मी तिचे नावच बदलून टाकले .. आणि ती जिवंत आहे हे कोणाला कळू नये यासाठी तेच चांगले होते ..

🎭 Series Post

View all