मोह मोह के धागे भाग 11

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ११
क्रमश : भाग १०
नीरज " येस डिअर .. आय नो .. इट्स हार्ड टाइम फॉर यु .. पण तू हि आता बाहेर ये दोघीं मधून .. मोकळा हो .. तू फ्री बर्ड आहेस .. तुझ्या वर कोणती आणि कोणाची जवाबदारी नाहीये .."
अजय " इट्स नॉट रिस्पॉन्सिबिलिटी .. इट्स माय ट्रू फीलिंग्स .. मी प्रेम करतो रिया वर .. मी डॅड आहे तिचा .. मी प्रेम करतो मी... "
मीरा वर असे त्याच्या तोंडात येत होते पण थांबला तो
नीरज " आय नो .. अजय .. पण तू मृगजळाच्या मागे लागला होतास .. पण मृगजळ हे आभासी असते .. मोहाची उत्कट भावना असते .. तहान लागलेली असताना ,पाणी हवे असताना जिथे नाहीये तिथे पाणी दिसायला लागते .. तसाच तू मीरा आणि रियाला तुझी बायको आणि मुलगी मानू लागला होतास .. पण प्रत्यक्षांत तू अजूनही सिंगल आहे .. द मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेस "
नीरज " आय नो , मी तुला खूप वाईट मित्र आहे असे वाटत असेल .. पण बिलिव्ह मी .. माझे काम आहे तुला ह्या मोहाच्या जाळ्यातून बाहेर काढायचं .. मी बरोबर आहे हेच सत्य आहे "
अजय एकदम शांत झाला ..
अजय " नीरज , मला थोडा एकांत हवाय "
नीरज ने त्याच्या खांद्यावर रब आणि शांतपणे निघून गेला
अजय अल्मोस्ट कोलॅप्स झाला होता .. काय सत्य , काय आभास , काय मोह , सहा फुटी माणूस भावनेच्या आहारी जाऊन रियाची खेळणी हातात घेऊन ढसा ढसा रडला ..
रिया .. रिया हे नाव त्याने स्वतः तिला दिलं होते .. अचानक दैवाने त्याला पितृत्व दिले होते .. रियाचा जन्म झाला तेव्हा .. नर्स धावत आली आणि त्याला म्हणाली
अभिनंदन तुम्हांला मुलगी झाली .. आणि त्याच्या हातावर एवढंसं पिल्लू दिले .. थोडेसे ओठ काढून रडताना इतकी क्युट दिसत होती .. छोट्या रडणाऱ्या मुलीला हातांवर घेताना अजयचे हात थरथरत होते .. थंड गार पडले होते आणि डोळे पाण्याने भरले होते ..
मग त्याच नर्सने त्याला तिला कसे घ्यायचं .. दूध कसे पाजायचे .. अंघोळ कशी घालायची हे सर्व शिकवले .. पुढे त्याच नर्सला त्याने तिला सांभाळायला ठेवले .. दोन तीन महिने त्याने घरातूनच काम केले . जमेल तेवढ्या मिटिंग झाल्या कि सगळा वेळ रियाचा .. हळू हळू तिचा आई आणि बाबा दोन्ही बनला तो .. तिला अंघोळ घालण्या पासून डायपर बदलणे , मांडीवर घेऊन झोपवणे , वेळ पडल्यास अंगाई गायचा ..
रियाच्या रूम मध्ये एक फोटोंचा कोलाज होता अजय भावुक होऊन त्या फोटोकडे बघत होता
एक फोटोत .. अजय घरा बाहेरच्या गार्डन मध्ये पाईप ने रियाच्या अंगावर पाणी उडवत होता .. आणि ती खूप मन मोहक हसत होती .. कुरळ्या केसांचे टोपले .. आणि त्यावर नुकतीच चालायला लागलेली डायपर घातलेली रिया .. खूप क्युट दिसत होती .. एका फोटोत .. घोड्यावर बसावे तसे अजय च्या पाठीवर बसली होती .. आणि अजय तिच्या साठी ढोपरांवर चालत होता .. एका फोटोत .. बेबी रिया खेळणी तोंडात टाकून हसत होती .. तिने काही तोंडात टाकले कि तो तिला ओरडतो हे तिला माहित असायचं तरी ती वस्तू तोंडात टाकायची .. आणि खुदु खुद्द हसायची .. मग अजय तिला त्याच्या चेहऱ्याने पोटाला गुदगुल्या करायचा .. आणि म्हणायचा " बदमाश "
नंतर नंतर अजय ने विचारले ना कि बदमाश कोण आहे कि हि पठ्ठी " मी ... " असे म्हणायची
तिचे बारसे केले .. त्याने स्वतः हे नाव ठेवले .. तिला तिची आई भेटली पाहिजे म्हणून पाण्या सारखा पैसा टाकून त्याने मीराला वाचवले होते .. रोज सकाळी एकदा आणि रात्री एकदा मीराला बघायला रोज हॉस्पिटलला यायचा ..
नर्सला सांगून मीराचे केस धुवायला सांगायचा .. तिचे रोजच्या रोज कपडे बदलायला सांगायचा ..
तिच्या शेजारी बसून रियाचे व्हिडीओ बघत बसायचा .. जेणे करून रियाचा आवाज तिच्या काना पर्यंत जाईल आणि ती कोमातून बाहेर येईल .. कधी कधी मुद्दामून तिच्याशी गप्पा मारायचा .. पण जेव्हा रिया २वर्षांची झाली तेव्हा त्याच्या आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले .. रिया चा डॅडा तर तो आधी पासून बनला होता .. कागदोपत्री हॉस्पिटल मध्ये मीरा तुमची कोण ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला न विचारता वाईफ म्हणून अपडेट केले गेले होते .. शिवाय रोज तो न चुकता तिला भेटायला येतो हे सर्व स्टाफ ला माहित झाले होते .. तो तिचा नवरा आहे हेच सर्वांना सत्य वाटू लागले होते .. कदाचित अजय ला सुद्धा कोमात असलेल्या मीरा बद्दल नुसतीच सहानभूती नव्हती .. त्याही पलीकडे खूप काही वाटत होते .. त्याला तिची ओढ लागली होती .. रोज तिला पहायला यायचा तो .. बंद डोळे असलेल्या त्या शरीरात मंद श्वास चालू आहे हे त्याला माहित होते .. कुठेतरी तो बोलतोय हे मेंदू ऐकतही असेल पण रीस्पॉन्ड करत नाही .. तेवढी ताकद तिच्या शरीरात नव्हती .. खूप वेग वगेळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट , आणि थेरपीज डॉक्टर ट्राय करत होते .. आणि एक दिवस मीरा शुद्धीवर आली .. किती आनंद झाला होता त्याला .. धावत जाऊन तिला मिठीत घ्यावे असे वाटत होते .. पण नेहमी एक सत्य जे त्याला ठाऊक होते ते नेहमी आड यायचं ..
प्रेमात तर तो आधीच पडला होता .. पण मीरा जेव्हा शुद्धीवर आली आणि ती त्याच्या घरात एका पत्नी सारखी वावरू लागली त्याची ओढ वाढतच जाऊ लागली होती .. तिला आपली पत्नी बनवून घ्यायची अशी त्याची ईच्छा होत होती .. नुसते कागदोपत्री नाही तर ते नातं प्रत्यक्षांत उतरवायचे होते .. म्हणून त्याने रियाचे डॉक्युमेंट्स बनवताना आई चे नाव मीरा अजय सरपोतदार असे टाकले होते .. रियाचे दत्तक घेण्याची प्रोसिजर अल्मोस्ट झालीच होती .. पण मॅरेज सेंटिफिकेट बनवण्यासाठी त्याला मीराच्या सहीची गरज पडणार होती .. पण मीराची तब्बेत जरा नाजूक असल्यामुळे तो हळू हळू पाऊलं टाकत होता .. डॉक्टरांचा सल्ला घेत घेत हळू हळू सत्य तिला सांगणार होता .. कि हे मध्ये असे घडले होते ..
नक्की ह्या दोघी कुणीकडे गेल्या असतील ? काय आहे ह्या मागचं सत्य हे त्याला शांत बसू देत नव्हतं .. एव्हाना रात्रीचे बारा वाजले होते .. अजयच्या काय डोक्यात आले तो सिक्युरिटी केबिन कडे गेला आणि तो इथे नसताना चे सगळे CCTV फुटेज पाहू लागला ..
जे काही घडलेय त्याची सुरवात इथूनच झाली असणार ? आणि ते त्याला शोधून काढायचं होते ?
शोधायला सुरुवात तर त्याने नक्कीच केली होती ..
बराच वेळ cctv फुटेज आणि सिक्युरिटी ला खूप सारे प्रश्न विचारून फार काही सापडले नाही .. आणि हीच एक गोष्ट त्याला त्रास देत होती .. खूप शोधून एखादी कडी सापडत नाहीये याचाच अर्थ कोणीतरी फुलप्रूफ प्लॅन करून केलेलं आहे .. आणि संशयाची सुई नीरज आणि भाऊ साहेब यांच्याकडेच जात होती ..
बेड वर पडून विचार करता करता त्याला झोप लागली .. सकाळी जाग आली ते माईंच्या आवाजाने .. माई काहीतरी खाली बोलत होत्या .. नोकरांकडून घर साफ करून घेत होत्या ..
अजय तसाच धावत खाली आला
अजय " माई ... आलात तुम्ही ?"
माई " हो दादा ... रिया आणि मीरा कुणीकडे गेल्यात .. दिसत नाहीयेत त्या ?"
अजय " माई .. " त्याच्या आवाज जरा रडवेला झाला
अजय " माई .. तुमचा मुलगा कसा आहे ?"
माई " काय सांगू दादा .. जीवावर बेतलं त्याच्या .. केवढा मोठा ऍक्सीडेन्ट झाला त्याचा .. ढोपरातल्या वाट्या बदलाव्या लागल्या .. "
अजय " कधी आणि कसा कुठे ऍक्सीडेन्ट झाला त्याचा ?"
माई " काय सांगू दादा .. त्याच्या गाडीला मेल्या एका ट्र्क वाल्याने उडवले .. माझ्या पोराचा दुसरा जन्मच झालाय जणू .. पण आता गाडी नाही कधीच चालू शकणार तो ? आता त्याचा संसार कसा चालायचा मोठा प्रश्न आहे ?"
अजय " काय ... काय करायचा तो "
माई " तो ना रिक्षा ड्राइव्हर आहे ... आहे म्हणजे होता .. आता नाही रिक्षा चालवू शकणार माझा लेक " माईंनी डोळ्यांना पदर लावला
अजय " थोडे दिवस आराम करू द्या त्याला .. आपण त्याला कुठंतरी बसकि नोकरी लावून देऊ .. नका काळजी करू ?"
माई " दादा .. रिया आणि मीरा कुणीकडे आहेत ?"
अजय " माई , जरा आल्याचा कडक चहा आणि पोहे बनवा .. मी आलोच आवरून "
माई मान हलवत किचन मध्ये गेल्या .. आणि अजय आवरायला गेला ..
अंघोळ करून खाली आला ..
अजय " माई , रिया आणि मीरा बाहेरगावी गेल्यात .. मीरा तिच्या भावाकडे गेलीय .. थोडे दिवस माहेरी राहील आणि मग येईल "
माई " अरे वाह !! दादा .. तिला आठवलं का सगळं .. माहेर , भाऊ . सगळे "
अजय " हो .. आणि म्हणूनच मी तिला जाऊ दिले .. "
माई " दादा , तुम्हीं लै केलं तिच्यासाठी .. एवढं कोण कोणासाठी करत नाही आजकाल "
अजय " मी माझ्या मुली साठी केलं .. आणि जरी मीराला तिच्या भावाकडे राहायचं असलं तरी तो तिचा निर्णय असेल पण रिया ला मी घरी घेऊन येणार म्हणजे येणार "
माई " दादा , तुमच्या पेक्षा रियाला तिची आणि तिला रियाची गरज आहे .. अख्ख उभे आयुष्य कसे काढलं ती .. नवरा बी नाही या जगात "
अजय " माई .. मी काय सांगतोय ते लक्षात ठेवा .. मीरा आणि रिया या घरातून कुठेही गेल्या नाहीयेत .. ह्या घरातल्या त्या कायम मेम्बर असणार आहेत .. कोणी विचारलं तर सांगायचं कि मीरा माहेरी गेलीय "
माई " हो दादा .. "
अजय " बाकी कोणत्याही चर्चा मला इथे नकोयत .. कळलं .. मीराचा भूतकाळ सारखा सारखा काढायची गरज नाहीये .. मीरा आता माझि पत्नी आहे .. आणि माझ्या मुलीची आई आहे .. कळलं " अजय जरा चढ्या आवाजातच बोलला
माई " दादा .. काही चुकलं का माझे ? आज एकदम परक्या सारखे बोलताय माझ्याशी ?"

🎭 Series Post

View all