Jan 19, 2022
नारीवादी

मोगरा फुलला

Read Later
मोगरा फुलला

मित्रांबरोबर रिसॉर्ट ला जायच... कशाला उंडारायलाच ना... निदान स्वतःच वय तरी बघावं.. साठी बुद्दी नाठी उगाच म्हणत नाही ... कशाला करायची असली थेरं ती पण या वयात .. भजन करत देव देव करण्याच्या वयात हे काय सुचतंय तुम्हाला..चालले आपले उठसूट .. कुठे जायची गरज नाही...आबांना खडे बोल सूनवुन रमाबाई  रागाने स्वयंपाकघरात निघून गेल्या...तसे आबा गोंन्धळून त्यांच्या या अवताराकडे बघतच राहीले...आणि त्यांचा मुलगा  विनय आणि सून विणा दोघेही पाहतच राहिले...

आबा ओशाळून काहीच न बोलता आपल्या खोलीत निघुन गेले.. बायकोने मुलगा आणि सुनेसमोर केलेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला... 

 

विनय मात्र गोंधळून आणि तोंड उघड टाकुन उभाच होता... त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता... हे कसं घडु शकतं त्याला कळतच नव्हतं...

बाजूला उभ्या असलेल्या विणाने त्याला चिमटा काढून भानावर आणलं..

 

" मी स्वप्नात तर नाही ना.. आज आई चक्क आबांवर ओरडली.. आजपर्यन्तच्या 28 वर्षांच्या संसारात आज पाहिलांद्याच आवाज चढवला होता आईने आबांसमोर"

 

म्हणजे काहीच न कळून विणा उत्तरली...

 

म्हणजे आबांनी आईला सगळ्यासमोर ओरडलेले मी बऱ्याचदा पाहिले आहे ... पण या घराच्या इतिहासात अस पहिल्यांदाच घडत आहे...

 

खरय रे ... मला फक्त चार महिने झाले आहेत येऊन.. आणि माझ्यावरही न ओरडणार्या आई चिडू ही शकतात हे आजच कळले मला...आणि इतिहास काय.. इकडे तुझी आई चिडली आहे त्याच तुला काहीच वाटत नाही.. बिचाऱ्या आबांनाही वाईट वाटले असणार...

 

वाटूदे.. खर तर मला अगदी आनंदाच्या उकळ्या फुटतायत... आईने नेहमीच त्यांचा राग सहन केला आहे आता आबांना करावा लागेल थोडं सहन..

 

आली रे आली आता आबांची बारी आली... आता आईची सटकली...

त्याच्या त्या नाटकांकडे बघून विणाही हसु लागली...

 

" कसा आहेस रे तू आईवडिलांच्या भांडणावर खुश होणार पहिला मुलगा तूच असशील..."

 

तसा विनय थोडा गंभीर झाला ...आणि सावरून म्हणाला हे बघ तस नाही आहे...कसं आहे आबा म्हणजे रघुवीर सरपोतदार याचं लग्न माझ्या आईशी झाले रमाबाई नाईकशी आणि ती या घरात आली... आबांचा स्वभाव तसा प्रेमळ पण एकच त्यांना जी गोष्ट आवडत नाही ती आईला आवडत असली तरी त्यांनी तिला करू दिली नाही.. पण आईने कधीही तक्रार नाही केली ...आपलं ते खरं करण्याचा त्यांचा हेका त्यांनी कधी सोडला नाही.. त्यात आजीची म्हणजे तुझ्या आजेसासूची त्यांना साथ आईला मनासारखं कधी वागताच आलं नाही.. पण आजच तीच वागणं अगदीच अनपेक्षित होत.  पण झालं ते चांगलच झालं...आज पहिल्यांदा तिने आबांना अडवले काहीतरी न करण्यासाठी... पण मला एक कळतं नाही हा दारुगोळा भरला गेला कसा.. म्हणजे अस काय झाल की आई अचानक अशी बदलली...

दोघांनाही या बदलाच कारण कळत नव्हतं...

 

विणाला राहून राहून आईचे शब्द आठवत होते.. इतक्यात तिच्या लक्षात आले.. अरे हे तर तंतोतंत आबांचेच शब्द जे तिने सकाळीच ऐकले होते...आणि तिने सकाळी घडलेला प्रसंग विनयला सांगितला...

 

आज तिने जॉगिंग वरून येताना .. एका गरीब मुलीकडून गजरा विकत घेतला.. खरतर तीची दया आली म्हणुन.. तिला गजरा आवडत नसतानाही आणि मग सहजच आईनं गिफ्ट दिला.. 

 

" त्या खुप खुश झाल्या होत्या जेव्हा मी त्यांना गजरा दिला" पण नंतर आबा खूप रागावले त्यांना 

इतकी वर्षे गजरा कधी घातला नाही ,आता काय  हे वय आहे ही थेर करायची... देव देव करण्याच्या वयात नटायच काय सुचतंय तुला असंच काहीबाही बोलत राहिले..." तू आधी च ऑफिस ला गेलास नंतर मीही निघाले... उशीर झाला होता त्यामुळे आईशी काही बोलले ही नाही.. आबांच्या वागण्याने दुखावल्या त्या... आणि तेच उत्तर त्यांनी आता  त्यांना दुखवुन दिले आहे...कदाचित आपल्या दुःखाची सल जाणून देण्यासाठी.. 

 

 म्हणजे एवढे दिवस जे तिने सहन केले त्याचा बांध या गजऱ्याने मोडला म्हणायचा.. जखमेने जखमेची जाणीव करून दिली... . विनय विचारात हरवत म्हणाला..

 

आता एवढंच बघायचंय की आबा आता या लाटेला कस थोपवतात ... विरोधाने ही लाट शमणार नाही तिला प्रेमाने जिकायला लागणार त्यांना... आणि हा प्रवास त्यांचा त्यांनाच करूदे... विनय विणाला समजावत म्हणाला आणि विणानेही त्यावर मुकसमंती दिली ..

 

 

इथे आबाही आपल्या खोलीत  बसले होते...कधीही स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता की रमा त्यांना अस काही बोलेल... ती चिडली तेव्हा ते इतके गोंधळून गेले होते की...आधी खूप राग आला होता पण नंतर जाणवलं त्यांना .. अस रूप त्यांनी कधीच पाहिले नव्हतं .. आजचे शब्द तिचे नव्हतेच मुळी ...

त्यांना स्वतःचेच शब्द ऐकतो आहे ... असा भास झाला..

सकाळचं त्याचं तिला दुखवुन बोलणे आठवलं.. त्यांचं मन भूतकाळात गेले... मोगऱ्याच्या फुलांना हातात घेऊन पुरेपूर सुगंध घेणारी ती पहिल्यांदा भेटली होती... तिला पहिल्यांदा बघायला गेलं होतं तेव्हा  त्यांनी तिच्या हातात मोगरा पहिला तो आज इतक्या वर्षांनी तिच्या केसात दिसला...

 

आपल्याला मात्र मोगरा किंवा फुल कधीच आवडली नाही .. म्हणूच काय आईने मोगऱ्याच्या ऐवजी अबोली  माळायला दिली तिला लग्नांत... त्यादिवशी तिने मोगरा बाजूला केला तश्या तिच्या इच्छाही बाजुला सारल्या असतील का.. आपण मात्र आपल्याच तोऱ्यात तीच मन कधी जाणलच नाही.. आता सून घरात आली तिला आणि  मुलगा त्या दोघांनाही स्वातंत्र्य देतोच की ... पण ते हक्काच्या बायकोला कधी देता आलं नाही... आज इतक्या वर्षांनी तिने तोच मोगरा जवळ केला तर आपणच दुखावलं तीला... आज तिने त्यांना तिच्या दुःखाची जाणीव करून दिली... आज तिचे शब्द ऐकले तेव्हा त्यांना समजले जे आपल्याला आवडत ते करायला कोणी रोखलं तर किती त्रास होतो ते..

 

आता अजूनही वेळ गेली नाही आहे हे त्यांना जाणवत होतं.. त्यांनी ठरवले के जे त्यांना आधी देता आलं नाही ते आता त्यांना देणार होते...

 

त्यांनी लगेचच आपल्या मित्राला फोन लावला .. मित्रासोबतीची रिसॉर्टची वारी रद्द केली.. आणि छानपैकी ट्रिप बुक करायला सांगितली महाबळेश्वची ...

जे रमाचं आवडत ठिकाण पण त्याचं नावडत...

पण आता ते ते करणार होते जे रमा इतकी वर्षे करत आली होती... लगोलग बाहेर निघाले .. येताना मोगऱ्याचे गजरे आणले..

 

रमाला गजरा दिल्यानंतर तीच्या चेहऱ्यावर जो मोगरा फुलला ते पाहून आज मोगराही आवडता झाला होता...

आणि खऱ्या अर्थाने रमाच्या आणि त्यांच्या आयुष्यात मोगरा फुलला होता...

 

समाप्त

 

प्रतिक्षा नागवेकर

 

( साहितयचोरी हा कायद्याने गुन्हा आहे .  तेव्हा ही कथा आवडल्यास नावासकट share करावी ही विनंती... आणि आपले अभिप्राय कळवायला विसरू नका. तुमच्या likes आणि comments च्या प्रतीक्षेत...)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now