मोबाईल.. एक काळाची गरज..? (लेख )

कोरोना मुळे काळाची गरज मोबाईल हा किती महत्वाचा झालाय हे थोडक्यात लिहलंय.. ??

मोबाईल फोन चा शोध जर लागला नसता तर! कदाचित जगाचा चित्र आज उलट दिसलं असत. मोबाईल फोन च्या जागी दुसरं काही असत. आणि जगात कसल्या न कसल्या गोष्टींचा शोध हा लागतंच असतो ना?

आपल्या सर्वांनाच माहित आहे की मोबाईल फोन चा शोध कधी लागला, आणि तोह कोणी लावला ते!  सन 1973 मध्ये मार्टिन कुपर ह्यांनी मोबाईल चा शोध लावला, मला माहित आहे हे सगळ्यांना माहित असेल पण तरीही मी नमूद करते.
आता च्या इलेक्ट्रॉनिक च्या शोधात खुप बदल झालाय, नव नविन यंत्रण यांचा शोध लागला. त्यात मोबाईल ही खुप पुढे गेलंय, मोबाईल मध्ये असणारे बदल, नव नविन सुविधा यांचा शोध लागला. आणि त्या मुळे माणसांन मध्ये खुप बदल झाला, जणू काही माणुसच इलेक्ट्रॉनिक झालाय.



मार्टिन कुपर नंतर अनेक संशोधक आले. Social media सारख्या नवनविन गोष्टींचा शोध लावला. एका देशा मधुन दुसऱ्या देशांन मध्ये घडणाऱ्या घडामोडी, तिकडंच राहणीमान समजु लागलं. तिकडच हवामान तापमान ह्या साऱ्या गोष्टी कळु लागल्या. आपल्याला आपल्या माणसांच्या संपर्कात राहता आलं नसत, जर मोबाईल फोन नसता तर.
आज पुर्ण जगभरात घातक विषाणूच्या च्या संसर्गा मुळे देशांची परिस्थिती, जगभराची परिस्थिती बिकट आहे. अनेक कुटुंब उध्वस्थ झाली, कित्येक लोकांचे जीव गेले.

आज मोबाईल च्या इंटरनेट मुळे घरबसल्या तासा तासाला, मिनिटा मिनिटा ला परिस्थिती कळतेय. आज जर मोबाईल चा शोध नसता तर कदाचित हे अशक्य असत.
कित्येक शाळा, कॉलेज, ऑफिस गेले 2 वर्ष बंद आहेत. त्या मुळे सरकार प्रशासनाने ऑनलाईन हा पर्याय शोधुन काढला. कित्येक लोकांचे रोजी रोटी बंद होत्या. आपली आजची पिढी शिक्षण कस घेणार? जर शाळा बंद आहेत तर. म्हणुन ऑनलाईन हा पर्याय शोधला. हा पर्याय शोधला कारण आज मोबाईल आहे म्हणुन, जर मोबाइलचा शोध लागला नसता तर. आपली उद्या ची पिढी घडणार कशी.


हिच परिस्थिती काही वर्षां आधी उलट होती, मोबाईल म्हटलं की घरचे ओरडायचे, शाळेत जरा ही चालायचं नाही. पण आज मोबाईल हा गरजेचा झाला आहे. आज आपल्या ला आरोग्य चिकित्सक ऑनलाईन भेटतात !  तेही मोबाईल मुळे शक्य आहे. मोबाईल आपल्या ला किती गरजेचा झाला आहे. जरा विचार करून बघा की मोबाईल नसता!  तर किती तरी प्रश्न हे उभे राहिले असते.

.......

एक लहानसा लेख.. मांडला तुमच्या समोर.

समाप्त...