मोबाईल... शाप की वरदान

आजची पिढी आणि मोबाईल....
आज जगात चालू असणाऱ्या खूप समस्या पैकी एक समस्या... मोबाईल वापरणे... त्यात ही जर का मुलगी मोबाईल जास्त वापरत असेल तर... तर ते मग महापाप समजलं जातं..

सारखं मोबाईल बघणे... फोन वर गप्पा मारणे.. आपले व्हिडिओ.. फोटो सोशल मीडिया वर सतत टाकणे... हे म्हणजे वाया गेल्याचे लक्षण.. असं या समाजात मानले जाते...

मुलगी ऐकत नसेल.. काम करत नसेल.. तीला काही येत नसेल.. तर याचा अर्थ ती जास्त मोबाईल बघते.. त्यात ही जर प्रेम करून घरातून पळून गेली तर पहिला प्रश्न असतो.. ती जास्त मोबाईल मध्ये असायची का???

आताच्या जनरेशन मध्ये मोबाइल हे साधन राहिले नसून हत्यार झाले आहे..

मोबाईलला दोषी मानण्यापेक्षा त्याचा योग्य वापर आजच्या पिढीला शिकवला पाहिजे हेच कळत नाही कोणाला... मोबाईल देता मग लक्ष पण द्यावे.. चुक त्यांची नाही... आजच्या पालकांची आहे.. मोबाईल त्यांना सहज जीवन जगण्यासाठी आहे.. त्यांच्या चौकटीत बंदिस्त होऊन जगण्यासाठी नसते.. हे सांगायला हवं...

मुलांना सांगताना आपण किती मोबाईलचा वापर करतो.. कशासाठी करतो.. हे पण लक्षात घेतले पाहिजे...


🎭 Series Post

View all