Feb 23, 2024
नारीवादी

मनातला पाऊस भाग 3

Read Later
मनातला पाऊस भाग 3
मनातला पाऊस भाग 3

©️®️शिल्पा सुतार

सुरवातीच्या काळात ती नोकरी करत होती. रोहितला सासूबाईंन जवळ सोडून जात होती. तेव्हा त्या कंटाळा करायच्या. इतके वर्ष केलं आम्ही. आता परत तुमचे मुलं सांभाळा. सारख्या बोलायच्या. नंतर रोहित खूप आजारी पडायला लागला.

" आपल्याला काही गरज नाही तुझ्या नोकरीची घरी लक्ष दे." आकाश बोलला.

तिची नोकरी सुटली. सपोर्ट नाही कोणाचा. काय करणार? आधी ठीक असत. मुलांना आपली गरज असते. मुल मोठे झाले की ते बिझी होतात. स्त्रियांना या वयात नोकरी मिळत नाही. करमत ही नाही. सगळ्यांना वाटत आपण काहीच करत नाही. आता हल्ली तिने ही गोष्ट मनाला लावुन घेतली होती.

" आई भूक लागली आहे जेवायला दे. " रोहितने आवाज दिला.

आकाश ऑफिसहुन आले होते. ते पण फ्रेश होऊन आले. रोहित आणि आकाश बोलत बसले. नेहमीचा विषय पुढच शिक्षण घ्यायच.

मुलगा दूर जाणार परत तिच्या हृदयात कालवाकालव झाली. याची तर आशा आहे. हा घरी येतो म्हणून मी सगळ करते. हा ही चालला जाईल. काय करू मी. तिने स्वतः वर कंट्रोल ठेवला. मुलाच्या प्रगती आड यायचं नाही. शिक्षण महत्वाचं.

आजी-आजोबा आले. सगळे जेवायला बसले. निशाने आधी रोहितच ताट केल. पालक पनीर बघून सासूबाई बोलल्या. " अग निशा आम्हाला पनीरने त्रास होतो . माहिती नाही का?"

"निशा, आई बाबांना पनीर आवडत नाही." आकाश लगेच बोलला.

सगळ्यांनी एकदम तिच्यावर हल्ला केला. निशा शांत होती.

"बाबा प्लीज शांत व्हा. आजी नको बोलूस आईला. " रोहित बोलला. तिने त्याच्या कडे प्रेमाने बघितल.

"रोहित जेवण कर."

तिने आजी आजोबांना डाळ पालक वाढली. ते सगळे गप्प बसले.

इतके वर्ष झाले या लोकांचं करते मी अजूनही या लोकांना माझ्यावर विश्वास नाही. कोणाला काय आवडतं हे तोंडी पाठ आहे. कामच काय आहे मला. या लोकांचं बघायचं असतं दिवसभर.

"कोणती डाळ आहे ग? तुरीची का मुगाची?" सासुबाई बोलल्या.

"आई मला माहिती आहे तुम्हाला तुरीची डाळ चालत नाही जरा तरी विश्वास ठेवा माझ्या वर." निशा बोलली. जस काही मला काही लक्ष्यात रहात नाही अस करतात. इतक करूनही अस.

त्या जेवायला बसल्या. आकाशला ही डाळ वाढली. तिने स्वतःला पालक पनीर घेतला.

सासुबाई तिच्या ताटाकडे बघत होत्या. "बघू ग थोडी पालक पनीर. "

" नको आई तुम्हाला त्रास होईल. "

त्यांना राग आला होता. एक तर पथ्य म्हणून तिला भरपूर पदार्थ करावे लागत होते आणि स्वयंपाक झाल्यावर सगळेजण सगळं खात होते. याला काय अर्थ आहे? चालत नाही तर खायलाच नाही पाहिजे. परत त्रास झाला तर तिला त्यांना दवाखान्यात घेऊन जा. किती धावपळ होते.

आकाशचा काही उपयोग नव्हता. त्याने स्वतःवर बिझी लेबल लावून घेतलेलं होतं. ते तो समोर जसं काम असेल तसं काढत होता. त्याला जर एखाद्या ठिकाणी जायला आवडत असेल तर बिझी नाही. इतर वेळी खूपच बिझी.

जेवण झालं ती त्यांच्या रूम मधे आराम करत होती. आकाश आई बाबांशी बोलत होता. रोहित अभ्यास करत होता.

आकाश आत आले. "निशा आई बाबा दवाखान्यात न्यायच आहे."

"हो माहिती आहे मला. तुम्ही घेवून जा." ती बोलली.

"मला जमणार नाही मीटिंग आहे." आकाशने तेच सांगितल.

"सुट्टीच्या दिवशी जा." निशा बोलली.

"तुला काय प्रॉब्लेम आहे? "

"एक तर आम्ही एका रिक्षात बसत नाही. तिथे दवाखान्यात खूप धावपळ होते. मला आता हल्ली जमत नाही." तिने अंग काढून घेतल.

करा काहीही. आई बाबा तसेच. आपण डॉक्टरांशी बोलल तरी त्यांना माझ्या वर विश्वास नाही. डॉक्टर समोर म्हणतात आकाशला फोन लाव तो बोलले डॉक्टरां सोबत. त्या पेक्षा त्यांच्या सोबत जा. मला ना आता खूप कंटाळा आला आहे. सगळे अगदी तुटक वागतात.

"काय झालं निशा तू आता हल्ली अस का वागतेस?" आकाशने काळजीने विचारल.

"माझ्या कडून होत नाही आता. तुम्ही ही घ्या थोडी जबाबदारी." ती तिची तिची मोबाईल मधे बघत होती.

ही खूप कोरडी वागते माझ्याशी. पूर्वीच प्रेम ओलावा कुठे गेला काय माहिती?

रोहित रूम मधे आला. आई हे बघ मी तुला सांगत होतो ना माझा फ्रेंड त्याच चॅनल." तो निशाशी खूप प्रेमाने बोलत होता. ती पण त्याच्याशी खूप छान वागत होती. बोलत होती.

" अरे म्हणजे माझ्याशी ती नीट वागत नाही. काय कारण असेल. की मीच नीट वागत नाही. " आकाश विचार करत होते. ते रोहित कडे आले." रोहित तुझी आई विशेष बोलत नाही माझ्याशी. "

" मग तुम्ही बोला तिच्याशी. आपण चांगल तर ती चांगली. तिला वेळ द्या. तिच्या आवडत्या विषयावर बोला. ती खूप साधी छान आहे बाबा. आता काय हे मी तुम्हाला सांगायचा का? "

" बरोबर बोलतो आहेस तू मी प्रयत्न करेन." आकाश रूम मधे आले. निशा झोपली होती. त्यांनी तिला नीट पांघरुन दिल.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//