Jan 26, 2022
नारीवादी

मलाच सगळ करायच असत....

Read Later
मलाच सगळ करायच असत....

मलाच सगळ करायच असत....
.... 

©️®️शिल्पा सुतार 


रमेश सीमा एक सुखी कुटुंब, घरात सासू सासरे दोन मुल, नवरा ही व्यवस्थित कमावता, घरात कसल्या गोष्टीची कमी नाही, सीमा ही खूप हुशार, प्रत्येक कामात तत्पर, हाच तर गुण तिचा घातक होता, सगळ तिला च करायच असत, घरात अगदी सगळ्यांना परावलंबी करून ठेवलं होतं....... 

रमेश ऑफिस हून आला, मूल आई बाबा जेवत होते, तो फ्रेश होऊन आला, 

"हे काय? आज जेवायला एवढ्या भाज्या का केल्या आहेत", ?........ बाबा 

"बाबा अभी खात नाही वांगी म्हणून आईने त्याच्या साठी बटाट्याची भाजी केली आहे, आजी-आजोबांना दोन्ही भाज्या चालत नाही म्हणून त्यांना पालक केला आहे",........ पूजा 

" सीमा अग तू  अभिला लाडावून ठेवल आहेस ",....... रमेश 

" नाही बाबा मी बोललो होतो आईला, मी वांग्याची भाजीच सार खाईन, तरी आईने माझ्यासाठी वेगळी भाजी केली",...... अभी 

" खाऊ द्या हो त्याला, हेच तर वय आहे, आता आपल्याला कुठे काही खावसं वाटत, नाही आवडत त्याला वांग्याची भाजी, मग तो नीट जेवत नाही ",....... सीमा 

"रमेशने हात जोडले, सीमा तुला काही सांगण्यात अर्थ नाही,  तू उगाच दमत बसते, आणि मुलांना सगळ खायची सवय हवी",...... रमेश 

हो हे खरं आहे घरच्या सगळ्यांचं काहीही म्हणण नसतं, सीमा खूप काम अंगावर ओढून घेते आणि मग  दमते, पूर्वी तिच्याकडून काम व्हायची, आता वयामानानुसार खुप लवकर थकते ती, काय करणार पण, तिने घरच्यांना अशी सवय लावून ठेवल्या होत्या, घरातल्या लोकांच तिच्याशिवाय पान हलत नाही, घरात कपडे कुठे ठेवले आहेत, सामान कुठे ठेवलं आहे, हे कोणालाही काहीही माहिती नाही, सगळे आपले सारखे सीमा सीमा करत असतात, 

आजी बाबा उठले की त्यांनाही सीमा लागते, तीलाच माहिती ते कसा चहा घेतात, साखरेचा का बिनसाखरेचा, त्यांच्या काय गोळ्या आहेत, पथ्यपाणी आहे, डॉक्टरांकडे कधी जायचं, काय टेस्ट आहेत, कपडे कुठे ठेवलेत, धुतले की नाही, ते सीमालाच माहिती, 

पूजाला तर घरात काहीच सापडत नाही,  वही पुस्तक कपडे सगळे सीमालाच नीट ठेवावे लागतात आणि शोधूनही द्यावे लागतात,  शाळेत जातांना पूजा च कधीच आवरलेल नसत, कधी बस चुकते मग सीमा आहेच स्कूटर ने सोडून यायला, 

अभी लहान आहे त्यालाही ही शाळेचा अभ्यास करतांना, खेळायला जातांना सीमा लागते, सायकलची चावी, बॉल, काहीही हवं असलं की आई तू दे अस सुरू असत त्याच 

नवरा रमेश ऑफिसला जाईपर्यंत सीमा त्याच्या आजूबाजूलाच असते, चहा, नाष्टा, रुमाल, गाडीची किल्ली, घड्याळ, मोबाईल, सगळं त्याला हातात द्यायचं असतं, त्याचं काही म्हणणं नसतं सीमालाच उरक आहे एवढा कामाचा, 

"थांबा जाऊ नका ऑफिस ला मी लंच बॉक्स पॅक करते",... सीमाने फोन वर बोलत असतांना सांगितले 

" असू दे तू मी घेतो तु बोल फोन वर",..... रमेश 

तरी सीमा उठलीच लंच बॉक्स पॅक केला, 

कोणी मदतीला आल तरी तिला चालत नाही, भाजी किराणा सगळ सीमा तिला हव तस घ्यायची 

बँकेचे काम सीमा करायची, डॉक्टरांन कडे सासू सासरे याना नेण, नातेवाईकांकडे कार्यक्रम असो सीमा गिफ्ट आणण्यापासून तिकडे मदतीला उभी असायची 

त्यामुळे सिमाला कुठेही चार दिवस बाहेरगावी जाता येत नाही, अगदी एक दिवस जरी ती कुठे गेली तरी घरचं सगळं ताळतंत्र बिघडुन जायच,  बाहेर जातानाही तीला सगळ्यांच  आवरुन जाव लागायच, आल्यावर सगळं करावं लागायच, 

आताशा सीमाच्या कमरेत आणि पाठीत खूप त्रास व्हायला लागला होता, नेहमी धावपळ शरीर तरी किती साथ देणार, घर कामाला बाई लावून घेतली होती आता , सीमा थोडं पडली की कोणी न कोणी आवाज द्यायच, माझे कपडे कुठे आहेत? मी कुठल्या गोळ्या घेऊ? शाळेला उशीर होतोय , वही नाही मिळत आहे? त्यामुळे सीमाला आराम व्हायचं नाही, तिचा त्रास वाढायला लागला 

एक दिवस उठता बसता येत नव्हत तिला, 

"रमेश आज लवकर येशील का ऑफिसमधून, मला दवाखान्यात जायचं आहे, पाठ कंबर खूप दुखते आहे" ,..... सीमा 

"चालेल आपण आता जाऊन येऊ दवाखान्यात, मग मी दुपारून ऑफिसला जाईल",..... रमेश 

दोघेजण दवाखान्यात गेले, डॉक्टरांनी पाठ दुखी चे कारण विचारलं, दिनक्रम विचारला, अजिबात आराम नसल्याचं डॉक्टरांना समजलं, यापुढे तुम्हाला एवढी धावपळ  करता येणार नाही,  सगळ्यांना सगळं काम त्यांचे त्यांचे करायला सांगा, आणि कोणी काम करत असले की तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्ही घरच्यांना परावलंबी करून ठेवल आहे , त्यात त्यांचा जेवढा दोष आहे त्यापेक्षा जास्त तुमचा दोष आहे, 

सीमाला हे पटलं,  सीमा आणि रमेश दोघेही दवाखान्यातन घरी आले,  मावशींना थोडे दिवस स्वयंपाकासाठी ही लावून घेतलं, आजी-आजोबांना त्यांचे कसं जेवण लागत, पथ्यपाणी काय आहे  हे स्वयंपाक करणार्‍या बाईंना समजून सांगितलं, पूजा आणि अभिला त्यांच  रूम आवरायला सांगितल आणि वही पुस्तक नीट ठेवा कोणी शोधून देणार नाही अस सांगितलं, रमेशचा प्रश्नच नव्हता तो नेहमी घरात मदत करायला तयार असायचा, 

सीमाला ही आता वाटत होत की मी आधी या सवयी मुलांना लावल्या असत्या तर बरं झालं असतं, मीच मुलांना परावलंबी करून ठेवलं, पण अजूनही वेळ गेलेली नाही होईल नीट, शिकतील हळूहळू, बरं झाल्यानंतर सुद्धा मी स्वयंपाकचं बघेन, मुलांना त्यांचे काम स्वतः करू देईन 

मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आपल्या आधाराची मदतीची गरज असते, पण मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचे काम त्यांनाच करू द्यावे, प्रत्येक वेळी आपणच पुढे धावू नये, याने मुलं परावलंबी होतात, त्यांना काहीही काम येत नाहीत, काही काही मुलं तर स्वतःच्या हाताने जेवत सुद्धा नाहीत, सगळ्या गोष्टीला आई लागते, हा दोष या मुलांचा आहे तेवढा आईचा सुद्धा आहे,..... विचार करा मैत्रिणींनो. ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now