मलाच नकोय तुमचा मुलगा

Nkoy Tumchaa Mulga
अनघा college मध्ये जाणारी छान सुंदर, सुशिक्षित मुलगी, आई वडिलांची एकुलती एक, लाडाची मुलगी, खूप जीव होता तिच्यावर, उंचीने फक्त कमी पण कोणाच्या घरी सून म्हणून जाईल त्याचं आयुष्य आणि घर स्वर्ग करून टाकले.
संस्कार तर खूप छान होते तिच्यावर, घसातला घास, कोणाला जर दिला नाही तर तिच्या घशाखाली घास उतरत नसे, गरीब दिसला की हातातले पैसे दिल्याशिवाय पुढे जात नसे. देऊळ दिसले की इतरांसाठी ती प्रार्थना करत, मग तिच्यासाठी, साधी होती, जसे आई वडील त्यांच्या ऐपतीती ठेवत तशीच ती रहात होती. इतर मैत्रिणी कश्या रहातात किती छान कपडे घालतात याची तुलना करून आई बाबाला कधी अवाजवी मागणी करत नसे.
तीच एकच ब्रीद, मी छान दिसते ना, छान कपडे आहेत, घर आहे, दोन वेळच खायला आहे आणि सगळ्यात वर आई बाबा आहेत माझ्या नशिबात हे काय कमी आहेत का. मग आंनद आंनद ,सुख सुख नक्की काय असत या पलिकडे, मी खुश आहे मला अजून काही नकोय. हे विचारांच्या अनघाला सगळे खूप प्रेम करत .

एकदा जोशी काकू घरी आल्या होत्या, त्या अनघाचे हे संस्कार बघून खूप खुश झाल्या. तिच्या आईकडे तिचे खूप गुण गाण गायले, अशी सून मिळावी असे बोलून गेल्या.

जोशी काकूला दोन मुले दोन्ही मोठे doctor, समाजात खूप नाव लौकिक, घर गाडी, माणसेही समजदार, सुशिक्षित अशी होती.
जोशी काकू अश्या बोलल्या आणि आईच्या मनात आनंदाची लहर उठली, त्यांना त्यांच्या बोलण्यातून अनघा त्यांना खूप आवडली आणि म्हणूनच त्या घरी आल्या असाव्या आणि म्हणूनच अनुचे खूप कौतुक करून गेल्या.

त्यांना वाटले त्या त्यांच्या मुलासाठी आपल्या लेकीचा हात मागायला आल्या असाव्यात.
पण कोणी मध्यस्थी करायची म्हणून राणे वहिनीला त्यांनी लग्नाची बोलणी करायला विचारले, तर वहिनीनी जोशी काकूकडे सहज त्या अनघाच्या स्थळाबाबत विषय काढला, त्यांच्या मुलांविषयी आणि त्यांना अनघा पसंत आहे हे फार छान वाटले. मुलगी खूप गुणी आहे हे तुम्ही ओळखले, ती तुमचं घर स्वर्ग करेन आणि सचिनचे आयुष्यही.
काकू इतक्या वेळ ऐकून घेत होत्या. त्यांना समजेना काय बोलत आहेत ह्या राणे वहिनी, मग त्यांची tube पेटली, की काल मी अनघाचे अति कौतुक केले आणि त्याचा तिच्या आईने असा अर्थ घेतला की मी त्या मुलीला आपली सून म्हणून पसंत केले की काय. मी तर फक्त खूप दिवसांनी त्यांच्या घरी गेले आणि मुलगी दिसली म्हणून उगाच बोलून गेले, मला कश्याला मी अशी सून पसंत करेन आणि माझा मुलगा तरी कसा तयार होईल अशा मुलीसाठी. किती साधी ती, रहाते कशी, तीच शिक्षणही कमी. त्यात ते आमची बरोबरी करूच शकत नाही आणि आमच्या standard ला ती शोभुच शकत नाही, ती काय माझे घर स्वर्ग करेन, माझे घर आधीच स्वर्ग आहे.

इतके मनात बोलून त्यांनी, मी तर फक्त कौतुक केले म्हणजे त्यांची मुलगी सून म्हणून हवी अस समजायचे कारणच नाही.
राणे काकू घरी आल्या त्यांचा चेहरा पडला होता, त्यांनी लगेच जाऊन सांगणे योग्य समजले नाही, पण दुसऱ्या दिवशी ही हकीकत सांगितली. अनघाच्या आईचा आंनद मावळला, ती खूप उदास झाली होती.
काही वर्षांनी जोशी काकू घरी आल्या होत्या, त्या झाल्या प्रकाराबद्दल माफी मागत होत्या, त्यांना आता आपल्या मुलासाठी अनघाचे स्थळ हवे होते, मनापासून पण आता अनघाच्या आईने त्यावेळी प्रेमापोटी आपल्या मुलीखातर ही अपेक्षा केली होती, रादर ती त्यांच्या मनात जोशीकाकू त्या एका शब्दामुळे रुजली होती. त्यात त्यांची काय चूक होती. जोशी काकूला समजले होते की आता आपल्या मुलाला मुलगी मिळत नाही आणि अजूनही अनघाचे लग्न झाले नाही, तर त्यांना आपल्या मुलाचे स्थळ हवे होते म्हणजे अजूनही त्या तयार होतील ह्या स्थळासाठी आणि त्यात आपण स्वतःहून मागणी करत आहोत म्हणजे त्यांच्यावर आपलेच उपकार होतील.
आता एकदा नाकारून पुन्हा ह्या स्थळाला हो म्हणणे अनघाच्या आईला आवडणार नव्हते. आधी परीक्षा पाहून झाली होती आता परत कितीही चांगले स्थळ असू मी माझी मुलगी तुमच्या मुलाला देणार नाही हेच मनोमन ठरवले होते. त्या जोशी काकूला म्हणाल्या, आम्ही साधे जरी असलो तरी आम्हालाही मान सन्मान आहे  "असे बोलून आई मनात साठलेला राग बोलून मोकळी झाली.

जोशी काकूला थोडक्यात अर्थ कळला, जणू अनघाची आई म्हणत होती, तुम्ही काय नकार देताय, मलाच तुमचा मुलगा नकोय.
काही दिवसांनी अनघालाही छान स्थळ आले, तिचे लग्न झाले आणि तिला हवा तसा मुलगा मिळाला होता. सुखाने नांदत होती घराला खऱ्या अर्थाने स्वर्ग रूप आले होते.