मला तुझ्यापासून दूर जायचं नाही भाग 3 अंतिम

Sang kadhi kalnar tula

मला तुझ्यापासून दूर जायचं नाही भाग 3 अंतिम


सांग कधी कळणार तुला


क्रमशः भाग 2


सकाळचं सगळं आवरून प्रेरणा ऑफिसला जायची. दिवसभरासाठी घरी बाई लावलेली होती. बाई घरी येऊन मिथिलाचं सगळं करायची. दुपारचा चहा, संध्याकाळचा नाश्ता सगळ ती करून संध्याकाळी घरी जायची. त्यानंतर दहा-पंधरा मिनिटात प्रेरणा घरी येत होती.

एकदा तर हद्द झाली, मी मिथिलाला सांभाळणारी बाई दुपारीच घरी गेली. तिने प्रेरणाला फोन करून सांगितलं होतं की तिला अर्जंट काम आहे म्हणून ती घरी जात आहे. पण प्रेरणाची मीटिंग होती त्यामुळे ती तिथून निघू शकली नव्हती. प्रेरणा घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली. दुपारपासून मिथिलाचे रडून हाल झाले होते पण तिच्या सासूने वाटी चम्मचने तिला दूध सुद्धा पाजून दिलेले नव्हतं. घरी आल्यानंतर प्रेरणाने आधी तिला दूध दिलं, त्यानंतर ती सासूशी बोलायला गेली.

“आई मिथिला इतकी रडत होती मग तुम्ही का नाही तिला कडेवर घेतलं? का नाही तिला बघितलं?”

“हे बघ एकतर तुझी बाई लवकर गेली, तिला सांगून ठेवत जा तू घरी येईपर्यंत तिने जायचं नाही. आम्ही इथे रिकामी बसले आहोत का तुझ्या मुलीला सांभाळायला? आम्हालाही आमची कामे असतात. आम्ही घरी असतो म्हणून काही रिकामटेकडी नसतो.”

“आई अहो मी तसं म्हणत नाहीये. पण मिथिला इतकी रडत होती, तुम्ही तिला दूध तरी द्यायला हवं होतं ना.”

“हे बघ तू मला अक्कल शिकवू नकोस मला काय करायला पाहिजे काय नाही. ऑफिसला जातेस ना मग घेऊन जात जा तुझ्या मुलीला. का ठेवतेस घरी?”


त्या दिवशी दोघींचा खूप मोठा वाद झाला. निखिल घरी आल्यानंतर सासूने सगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या. निखिलला सगळं माहिती होतं त्यामुळे तो प्रेरणाला काही बोलला नव्हता. तो फक्त प्रेरणाला एवढेच बोलला.

“प्रेरणा आय एम सॉरी.”

“तू का सॉरी बोलतोयस?” 

“मला माहितीये आई तुला खूप बोलली. प्रेरणा जाऊदे ग, सोडून दे त्या गोष्टी. त्यांचे किती दिवस उरलेत ग. होऊ दे त्यांच्या मनासारखं. आपलेही चांगले दिवस येतील.”

“आपणचं मन मारून का जगायचं निखिल? प्रत्येक गोष्टीत मला त्रास होतो, त्या बोलून मोकळे होतात. आपली मिथिला किती छोटी आहे. तिला असं रडताना बघून त्यांच्या मनाला त्रास झाला नसेल का? त्यांच्या ममतेला पाझर फुटला नसेल का? किती कटूतेने वागतात त्या. तिला साधं कडेवर सुद्धा घेत नाहीत. साधे तिला अंगा- खांद्यावर खेळवत सुद्धा नाहीत. इतकी का कटुता आहे त्यांच्या मनात? माझ्या मनाची व्यथा तुला नाही कळणार निखिल.” असं म्हणून प्रेरणा खोलीच्या बाहेर गेली.

बघता बघता मिथिला दोन वर्षाची झाली, प्रेरणाने तिला प्ले-स्कूलला टाकलं. प्रेरणा तिला घेऊन जायची आणि येताना सोबत घेऊन यायची. दिवस, महिने सरत होते पण गोष्टी सगळ्या तिथल्या तिथेच होत्या.
प्रेरणाच्या मनाची घालमेल ती तशीच होती आणि तिला पडलेले प्रश्नही तेच होते. तिच्या मनात निखिलला विचारण्यासाठी फक्त एकच प्रश्न असायचा सांग कधी कळणार तुला?


समाप्त:


कित्येक घरात हे असे प्रकार सर्रास घडत असतात. सासू सुनेची नोकझोक सुरू असते. कधी किरकोळ वाद असतात तर कधी मोठे वाद असतात यात बरडला जातो तो निखिल सारखा पुरुष. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होऊन जाते. प्रेरणा सगळं सांभाळून घेतेय हे निखिल समजून घेतोय. पण तिच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात, ती बोलून दाखवत नाही आहे पण मनात घालमेल सुरू आहे. तिच्या मनाची व्यथा सांगणारा एकच प्रश्न समोर सांग कधी कळणार तुला?..

🎭 Series Post

View all