मला ओळख भाग 4

Mla Olkh


आनंद बॉस च्या आदेशाला न जुमानता ती महत्वाची file आणायला घरच्या दिशेने निघून जातो.. त्याला आता फक्त ती फाईल दिसत असते आणि हाती असलेला तो महत्वाचा वेळ ..घड्याळाकडे लक्ष असते तर कधी गाडी चालवण्यावर.. रस्त्यात ट्रॅफिक वाढलेली असते. त्यातूनच कशी बशी गाडी काढायचा प्रयत्न करत तो घरच्या दिशेने चालत असतो..डोक्या फक्त बॉस आणि तिला नमते करण्यासाठी त्याच्या परफेक्ट प्रेसेंटशन ची गणिते चालू असतात..

तो घरी पोहचत असतोच तोच बॉस चा परत एक फोन वाजून कट होतो..त्याच्या कडे त्या फोन ला बघायला ही वेळ नसतो.. तितक्यात तो गाडीला एका बाईक चा धक्का लागतो आणि तो बाईक वाला त्याला सॉरी म्हणून पुढे निघत असतो तो हा आपल्या गाडीच्या खाली उतरून तिला काही नुकसान तर केले नाही हे बघत असतो..आणि त्या बाईक वाल्याला जोरात रागावतो..

"अरे इतकी घाई असेल तर दुसरी गाडी बघायची ना ,माझीच गाडी सापडली का..जिवा पेक्षा घाई महत्वाची का तुला...ऑफिस तर थांबू ही शकते ना..तुझा जीव गेला तर कोण भरून देईल..आणि तू सुटशील रे ,पण आमच्यावर केस होईल भावा.." आनंद

तो गाडीवाला समजून गेला, हा गडी स्वतःच घाईत आहे आणि हा मला येऊन धक्का मारतो उलट मलाच अक्कल शिकवतो, स्वतःच चूक करून रुबाब ह्याचा , " अहो तुम्हीच धक्का मारला मला, मी तर सिग्नल पाळत होतो, तुम्ही कोणत्या घाईत होता की तुम्हाला गाडी ही दिसली नाही ,आणि त्या उपर मला ज्ञान शिकवत आहात का , आधी तुमचा जीव सांभाळायला शिका ,म्हणजे आमचे जीव जाणार नाहीत "

आनंद ला आता त्याची चूक लक्षात आली ,आणि त्याने त्या बाईक वाल्याची माफी मागितली,आता परत एकदा घड्याळात पाहिले ,फक्त अर्धा तास हातात शिल्लक होता.. समोर घरी जायला 10 मिनिटे शिल्लक होती.. ह्याच काही मिनिटात खेळ संपवायचा होता... नाहीतर आज खेळ संपणार होता..


इकडे प्रणाली ती file घेऊन घरात येते ,तेव्हा तिचा चेहरा पडलेला असतो ,टेन्शन ने भरलेला चेहरा पाहून सासू बाई तिला एक घडलेली गम्मत सांगून हसवण्याचा प्रयत्न करत असतात.. पण तिचे त्यांच्या बोलण्याकडे ही लक्ष नसते..

"अग प्रणाली आज काय म्हणाल्या तुझ्या सगळ्या कळ्या ,त्या खुलल्या का, की अजून ही खुलायच्या बाकी आहे? " सासूबाई तिला बोलते करत होत्या...

--------------


आज एकंदर ऑफिस चे वातावरण गरम होते, सगळ्या स्टाफ ची आता काही खैर नव्हती खास करून मीटिंग ची वेळ ज्यांनी पाळली नाही आणि उशिरा आले होते.. त्या सगळ्यांना फोन करून बोलावले होते. मॅडम आता चिडल्या होत्या. कोणाची ही कोणती ही कारणे ऐकून घेत नव्हत्या.

आज तर पारा टोकाचा चढला होता मग तिने तावात सांगितले,"जे हजर नाहीत त्यांना एक तर नौकरी वरून काढून टाकणार " त्या धमकीच्या स्वरात बोलत होत्या.. तर बॉस चा आवाज बाहेर पर्यंत जात होता. सगळे आज जास्तच टेन्शन मध्ये होते..

तसे ती सांगत होती , "आणि ते उशिरा आले आहेत त्यांना लास्ट वॉर्निंग द्या ".

बॉस च्या बोलवण्यावर ही कोणाची तिच्या समोर जायची हिम्मत नव्हती. सगळे दारात उभे होते. आत जायला कोणी धजत नव्हते. कोणी ही बोलावून अजून आले नाही कसे.?? त्यांना माझ्या मताचा सन्मान ही करता येत नाही हे समजून तीच बाहेर आली आणि सगळ्या स्टाफ ला आवाज देणार इतक्यात तिने पाहिले स्टाफ तर दारातच उभा होता ,आणि तिला पाहताच चिडी चुप झाला होता ,सगळ्यांच्या माना खाली झाल्या होत्या...

बॉस, "आज तुम्ही एक तर चांगला परफॉर्मन्स द्या किंवा आज तुमचा राजीनामा तयार ठेवा ,तुम्हाला इतके दिवस मी म्हणून सहन करत आहे, पण मला तुमच्या सारखा गैर जीम्मेदार आणि कामात हलका अश्या स्टाफची अजिबात गरज नाही"

-----------

तश्यात तिला बाहेरून आनंदाच्या गाडीचा आवाज आला आणि तशी ती पुन्हा दरच्या दिशेने पळतच गेली ,तिला समजले होते की तो ह्या file साठीच आला असेल, आणि त्याला ही file हवी असेलच, आणि तो ती शोधण्यासाठी घरात न येता मला फोन करेन...त्याने फोन करण्याच्या आत मी बाहेर जाऊन त्याला file हातात देते..

ती बाहेर येत असते तेव्हा आनंद तिला फोन करून बाहेर बोलावणार इतक्यात ती समोर दिसते तिच्या हातात ती file असते.. ती घेऊन येते... तो ती file घेतो आणि त्याला हाय से वाटते..

तिच्या चेहऱ्याकडे बघून तो एक हस्य देऊन परत न काही बोलतच निघत असतो, परत एकदा हातात किती वेळ शिल्लक आहे हे त्या तिने दिलेल्या घड्याळात बघत असतो..तिला त्याने आपण दिलेले घड्याळ पाहून खूप छान वाटते..


त्याने तिला जवळ यायला सांगितले," प्रणाली जरा जवळ ये ,ती कोपऱ्यात ठेवलेली बॅग घेऊन ये,मी नेमकी तीच घ्यायला विसरलो आहे, त्यात आजच्या मीटिंग चे कागद पत्र आहेत, ह्यासाठी मला परत यावे लागले..आणि मी तर विसरलोच पण तू ही ह्या ओवाळणीच्या नाद कशी विसरून गेलीस.. माझ्या सगळ्या वस्तू माझ्या हातात देणे ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे हे कशी विसरतेस तू.."

तसाच तिला वाईट वाटले असावे हे जाणवल्या वर त्याने तिने खूप प्रेमाने दिलेले घड्याळ घेऊन निघाला आणि तिला बरे वाटावे म्हणून त्याने मुद्दाम जुने घड्याळ काढून तिने गिफ्ट दिलेले घड्याळ हातात घातले होते.

ती बघत होती, आंनद ने आपण घेतलेले घड्याळ घातले ह्यात खूप बरे वाटले होते..

तो तिला बाय करत असतो ,तोच ती त्याला म्हणते ," आनंद थांब जरा "

तो.. "का काय झाले"

ती ," तू घाईत आहेस,वेळ कमी आहे ,तर मीच गाडी चालवते, तू नको चालवू "

ती येते आणि त्याला बाजूला बस म्हणून इशारा करते,तसा तो तिचा आवेग बघून खरंच तिच्या म्हणण्याला मान देत बाजूला बसतो..

ती गाडी चालवत असते तर तो तिच्या कडे बघत असतो, त्याला छान वाटले होते की, माझ्या ह्या घाईच्या वेळी तिने प्रसंगावधान साधून मला ऑफिस ला सोडवण्याचा निर्णय घेतला, आणि खरंच त्याची मला स्वतःला ही जाणीव नव्हती की ह्या घाईत ,कुठे गाडी ठोकली ही जाऊ शकते.. जी जाण तिला आहे त्याचा विचार ही मी करू शकत नाही..

ती खूप सांभाळून गाडी ड्राईव्ह करत ऑफिस पर्यंत आणते, आणि त्यात त्याला कळले ही नाही ऑफिस कधी आले..

तो " thanks dear "

तो तिच्या हाताला धरून , " आता तुझे लक ही दे माझ्या सोबत, त्याची ही खूप गरज आहे म्हणत ,बाकी सगळे doccument घेतो ,आणि निघत असतो ,तोच ती बाहेर येते आणि त्याच्या डोळ्यात पाहून त्याला एक hug देते त्याला ,छोटा flying किस देते..

तो लांब जातांना ती बघत असते..

मग काय आठवते तिला आणि ती पुन्हा
त्याला हाक मारत,"अरे ज्या file साठी तू घरी धावत आलास ,आणि जिच्यासाठी मी तुला सोडवायला आले ती file तू पुन्हा विसरतो आहेस. "

तो तिच्या कडे बघत होता ,ती वाट बघत होती की तो निदान म्हणेल , तू संध्याकाळी तयार हो आपण बाहेर जेवायला जाऊ..

बराच वेळ ती कार मध्ये बसून होती,विचार करत कसला तरी ,आणि अचानक त्याचा फोन येतो ,
" अग मी आलो आहे वरती ,तू निघून जा ,थांबून राहू नकोस ,आणि हो गाडी ही घेऊन जा, आणि वाटल्यास आज जशी छान सफर झाली तुझ्यासोबत तशी संध्याकाळी ही हवी आहे, तू तयार होऊनच येशील इकडे , जमले तर आज लवकर ऑफिस मधून घरी येईल meeting संपल्यावर ,आपण दोघेच आज बाहेर जेवायला जाऊ ."

प्रणाली त्याच्या ह्याच कॉल ची वाट बघत होती ,आणि त्याचा कॉल येताच ती खूप खुश झाली होती...ती आता घराकडे निघाली होती..


पुढे पाहू ,आनंदला ऑफिस मध्ये कसल्या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते, बॉस ने काय वाढवून ठेवले होते...


लेख कसा वाटला ते जाणून घ्यायला नक्की आवडेल..

क्रमशः...

🎭 Series Post

View all