मला ओळख भाग 2

Mla Olkh


आनंद च्या ह्या जिव्हारी बोलण्याने प्रणाली पुरती दुखावली गेली होती,हादरली होती जवळपास ,तिला ते शब्द जणू टोचल्या सारखे वाटत होते... मला काही काम नाही ,मी काम करत नाही ,मी आयते खाते ,हा हे बोलूच कसा शकतो ,म्हणजे घरकाम म्हणजे काहीच नाही याच्या लेखी.. ठीक आहे ..तिने ठरवले होते आता फक्त काम करायचे पण त्याच्या सोबत बोलायचे नाही...आता हा अबोला तेव्हाच मिटेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल.

असे जवळपास 7 दिवस तिने आपले काम करत राहिली, त्याचा डबा वेळवेवर देत होती ,त्याला हवे नको ते त्याच्या समोर ठेऊन आपल्या खोलीत जाऊन बसत होती, बोलणे बंद केले असल्याने आनंद ही थोडे बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्या बोलण्याला जुमानत नव्हती..

हे असे झाले कसे हे कोणाला ही कळत नव्हते... इतके दिवस प्रणाली राग धरत नसत पण हे अति होत होते..

सासूबाई आणि सासऱ्याने ही हे आता हळूहळू जाणवत होते, जरी त्यांचे भांडण झाले तरी ह्या दोघांकडे तिने कधीच दुर्लक्ष केले नव्हते ,पण त्यांच्यासोबत ही तिचे बोलणे तुटक होत आहे हे समजत होते..

सासू, " प्रणाली अग असे तुटक नको वागू ग, आता तुझा अबोला मला आणि ह्यांना सहन होत नाही ,असे वाटते इथे आता न राहता लेकीकडे जाऊन यावे ,आणि तू परत बोलती झालीस की परत यावे..तू हे असे करणे योग्य नाही ग, मुलांना जरी जाणवत नसेल तरी थोडे ते ही अबोल झाले आहेत ,आनंद चे वागणे आणि तुझे अबोला धरणे हे वागणे ते टिपत आहे हो ,जे काही असेल ते मोकळेपणाने बोलून टाक,जर आनंद चुकला असेल तर मी समजवते, पण तू अशी भरल्या घरात उदास राहू नकोस बरं ."

प्रणाली, "हो मी प्रयत्न करेन, पण सांगता येत नाही मी त्यांच्यासोबत कधी बोलले ,तुम्ही मात्र ह्याचे अजिबात टेन्शन घेऊ नका ,आणि इथून कुठे ही जायची भाषा करू नका, माझे हे वागणे म्हणजे तुमच्यावर माझा काही रुसवा आहे असे नाही आई ."

इतके बोलून प्रणाली आईच हात हातात घेत पुन्हा आपल्या खोलीत जाते..

असे का घडले असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रणाली ही करत होती ,का त्यांनी त्या दिवशी घरी आल्या आल्या माझ्यावर राग राग करायला सुरुवात केली असेल ,असे तर त्याने या आधी कधीच केले नव्हते मग त्या दिवशी असे का वागला तो ,आणि त्याचा त्याला काहीच पछतावा झाला नव्हता..

तिने त्या दिवशीच्या सकाळ पासून सर्व क्रम डोळ्या समोर आणले,

तो दिवस साधारण दिवसा सारखाच होता, प्रणाली मस्त तयार होऊन छान साडी नेसून तयार झाली होती..तिने आनंदाचा वाढदिवस आहे म्हणून त्याचा आवडत्या रंगाची साडी घातली होती ,परवा आणलेला मोगऱ्याचा गजरा मळला होता.. आज नेहमीपेक्षा लवकर उठून त्याला आवडेल असा खास बेत केला होता ,प्रसादाचा शिरा, पुलाव, पुरी, मठ्ठा, गाजर हलवा ,टोमॅटो चटणी ,आणि बऱ्याच गोष्टी ,आणि ते ही जास्त प्रमाणात केल्या होत्या. जेणेकरून आनंद च्या ऑफिस मधील सर्व मित्रांना ही पुरतील अश्या..ही तयारी करण्यासाठी ती खास सकाळी 4 वाजल्या पासून उठली होती..

तिने आनंद चा साग्रसंगीत डबा तयार करून ठेवला होता, त्याला ही छान शर्ट गिफ्ट केला होता, त्यावर तिचे आवडते perfume स्प्रे केले होते, आणि ते स्प्रे करताच तो तिच्यावर थोडा चिडला होता, पण त्याने स्वतःला आवरले ..तिला त्याचा तो राग जाणवला होता..

तिला माहीत होते की आनंदला perfume आवडत नव्हता तरी एक आपला हक्क म्हणून ती इतके तर करू शकते म्हणून तिने त्याला perfume आवडत नसला तरी तिने तो फवारला होता..

आणि त्याच्या बिघडण्याला इथून थोडी थोडी सुरुवात झाली होती..

तिने त्याला सावरले ,तसेच तिच्या दुखावलेल्या भावनेला ही आवरले होते.. जणू काही समजलेच नाही असे..

तिने त्याचा हात आपल्या हातात घेत त्याला एक किस दिला होता,आणि त्याला ओवाळायला ताट आणले होते.
ओवाळून झाल्यावर तिने टिळा लावायला हात वर करता च त्याने तिचा हात अडवला होता ,तिला टिळा लावायला मान नकारार्थी हलवून  तो उठून उभा राहिला होता.
तिचा चेहरा पडलेला पाहून त्याने आपल्या कपाळावरील केस बाजूला सावरत पुन्हा तिला टिळा लावायला सांगितला..
आनंद,"प्रणाली टिळा लाव पण अगदी छोटा ,पुसत सा जो इतरांना दिसायला नको. "

तिने त्याला ओवाळले आणि त्याची खास आवडती मिठाई त्याला खाऊ घातली होती.. आणि त्याच्या समोर तिने आणलेले खास टायटन चे घड्याळ त्याला दिले ..

त्याला जणू आवडले नाही असे त्याचे भाव टिपत प्रणाली त्याच्या कडे बघत होती ,त्याने तिच्याकडे पाहिले आणि हाताने खुणावले , " वा मस्तच "

इतके असून ही त्याने तिने दिलेले ते घड्याळ तिच्या समोर घालावे ही तिची अपेक्षा होती, ती म्हणाली ही होती, "अरे आवडले असेल तर घालून बघ ना, मला खूप बरं वाटेल, फक्त माझ्या समाधानासाठी घाल निदान माझ्या समोर घाल, तुला वाटले तर तू ऑफिसमध्ये जाताच तू तुझे ते जुने घड्याळ घाल..पण माझी इच्छा पूर्ण करशील.."

तो, "आत्ता मला वेळ नाही पण मी तुझ्यासाठी काही करेन, हो पण आत्ता म्हणशील तर आता खूप उशीर झाला आहे allready, आणि मी आहेच ना इथे..तुला ते मी आत्ताच घालावे असे काही आहे का..ही वेळ काय ते तर बघ, मी promise करतो की मी नक्की घालणार, तुझा मान संभाळावाच लागेल ना मला ,ते ठाऊक आहे मला पण तुझा हट्ट मी नाही जस्ट पूर्ण करणार."

तिला थोडे वाईट वाटले होते,त्याने असे बोलणे अपेक्षित नव्हते. जितकी ती सहज घेत जात होती तितका तो तिचा मान दुखावत होता.. तिने आज ठरवले होते निदान आजचा दिवस तरी माझ्या मुळे खराब झाला याचा ठपका स्वतःवर घेणार नाही.. ती त्याने बोललेले सगळे ऐकून घेत होती.. मान हलवून त्याच्या हो ला हो म्हणून त्याला बाहेर सोडवायला बाहेर आली होती.

तो तिला जुजबी निरोप देऊन ऑफिसला निघून जातो,त्याच्या गाडीच्या आरशातून प्रणाली दिसत होती, तो लांबपर्यंत जात होता आणि ती तरी तो ओळून पहिल यासाठी काही वेळ दारावर उभी होती..पण तिचा अपेक्षा भंग झाला..

काही वेळ प्रणाली आत न जाता बागेतील फुललेल्या सर्व कळ्यांना भेट देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत मनातल्या गुज गोष्टी सांगण्यासाठी गेली होती,जवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली बसली होती..ती जेव्हा दुखावलेली असत तेव्हा ती हमखास साठलेले दुःख ह्या जागी येऊन रिते करत..थोडे अश्रू तर थोडे हुंदके असत ... आज ही तेच झाले होते..जे बोलता येत नाही ते कुठे तरी कोणाला तरी सांगून मोकळे होणे तिला आवडत नव्हते आणि खास करून जेव्हा ती अनबन मनातील दुरावे, खंत आनंद सोबत झाली असेल तेव्हा तर अजिबात नाही.

ती नेहमीच आनंद ची आणि तिच्या प्रेमाची गोड बाजू इतरांना दाखवत असत,आम्ही किती छान संसार करत आहोत, किती अलबेल आहे आमचे नाते,कुठे कटुता नाही..ना कुठे वाद ,म्हणूनच तर सगळ्यांना हे जोडपे एक आदर्श होते..

आनंदला तर कधी कधी तिच्या ह्याच स्वभावाचा राग ही येई, त्याला वाटत असत की तिने कधी तरी राग वैताग, चिडचिड व्यक्त करावी,पण ती तसे कधीच करत नसत. तिला नेहमी वाटत प्रेमाने संयम राखून मन जिंकता येते,त्यावर राज्य करता येते..कधीकधी ह्या तिच्या अति संयमी स्वभावाची तर त्याला कमाल तर वाटे पण मनावर दडपण ही येई...तो म्हणत ही, "अग कधी तू इतर बायकांसारखे भांडून चिडून तुझा वैताग काढत जा ग, नाहीतर मनात असंख्य गोष्टी दाबून ठेवशील तर त्याच कधी तरी भडका ही उडेल, मग तो मला आवरता आवरता ,आवरणार नाही ."

आनंद जरा कुठे पुढे गेला नव्हता तोच प्रणालीचा त्याला फोन आला , तो नेमका सिग्नल मध्ये सापडला होता, आणि त्यात सिग्नल ही सुटायची वेळ झाली होती,मग फोन घ्यावा की आधी गाडी traffic मधून बाहेर काढीव ह्याचा विचार करत असताना,त्याने तिच्या प्रत्येक येणाऱ्या फोन कडे दुर्लक्ष केले होते. चार रिंग वाजल्या आणि अजून ही वाजत होत्या..पण त्याने ते फोन घेतले नाही..

काय काम असेल तिचे इतके urgent की प्रणाली फोन वर फोन करत होती, तिला काही सांगायचे होते की त्याचे काही विसरले होते ..


क्रमशः.....

************************************

🎭 Series Post

View all