मला कधी सपोर्ट कराल... भाग 2

लोकांना वाटतं सेपरेट राहते ही किती छान आहे सगळं, नवरा मोठ्या पोस्टवर आहे, इंजिनियर आहे, मजेत चाललं आहे आयुष्य,



मला कधी सपोर्ट कराल... भाग 2

तुम्ही माझी बाजू का समजून घेत नाही
©️®️शिल्पा सुतार
.........

"अहो सांगा ना काय करू या दादाचा उद्या फोन येईल, त्याला त्याची सुट्टी प्लॅन करायची असेल",.. अश्विनी.

"कश्याला उगीच जा ये दोन दोन ठिकाणी, त्यापेक्षा सुट्टीत तू तुझ्या आईकडे जाऊन ये, आठ दिवसात वापस ये, माझी गैरसोय होते, तशी आता गेली होती तू मागच्या सुट्टीत गावाला, तेव्हा भेट झाली ना सगळ्यांची",.. श्रीकांत.

" ते सहा महिन्यापूर्वीना, दादा दुसर्‍या गावाला आहे ना नौकरी साठी, तो आठवण काढतो आहे आणि तो स्वतः कार घेवून येणार आहे ना घ्यायला, प्लीज याच्यावर विचार करा",.अश्विनी.

"बघु सांगतो नंतर, तस तुम्ही सगळे एका जागी भेटू शकतात ",..श्रीकांत.

मी दादा कडे जायच म्हणते तर हे मला आई कडे पाठवता आहेत, कधीच मी म्हणते त्या गोष्टीला एका झटक्यात होकार देत नाही, काय हे.

अश्विनीने स्वयंपाक करून घेतला, मुलींच जेवण झाल, त्या झोपायला गेल्या, श्रीकांत आणि ती जेवायला बसली,

" झाला का सोना मोनाचा अभ्यास",.. श्रीकांत.

हो

"गणित कडे लक्ष दे त्यांच्या",.. श्रीकांत.

हो,

"आज केला होता का तू आपल्या घरी फोन",.. श्रीकांत.

"हो केला होता ठीक आहेत आई बाबा " ,.. अश्विनी.

"कधीच भेटलो नाही त्यांना, आठवण येते" ,.. श्रीकांत.

हो.

" जावून येवू आपण पुढच्या आठवड्यात गावी ",..श्रीकांत.

किती इकडच तिकडच बोलता आहेत हे, फक्त मी जे विचारल ते सोडून सगळ बोलतात मुद्दामून, आत्ताच तर भेटलो पंधरा दिवसापूर्वी यांच्या घरच्यांना, तिकडे महिन्यातून एकदा दोनदा जातो नेहमी, तरी यांना त्यांची आठवण येते आणि मी माझ्या घरच्यांना सहा सहा महिने भेटत नाही तरी मी जायचं नाही गावाला,

मला मन नाही का? माझ्या नातेवाईकांची मला आठवण येत नाही का? मी पण माझ्या घरची एकुलती एक मुलगी आहे ,माझे आई बाबा भाऊ माझी आठवण काढतात, माझा नंबर कधी लागत नाही.

यांना सगळे नातेवाईक लागतात , मला नको का कोणी?, हे अस वागतात तर राग येतो मला, काय अस आपण ऐकुन घेतो तर जास्त करतात हे, खरच यांना अजिबात समजत नसेल का काही, माझ्या बद्दल काहीच वाटत नसेल का, थोडा ही सपोर्ट नाही मला, इतक्या वर्षात एवढच ओळखल की यांनी मला, माझ मन जपत नाहीत हे.

तिने झोपून घेतल, काही विचारण्यात अर्थ नाही यांना ,नाही जावू देणार ते मला, रात्री ती रडत होती .

मागच्या वर्षी अस केल होत यांनी, आई आजारी होती तेव्हा कशी तरी मागे लागून मी माहेरी गेले, दोन दिवस नाही झाले तर लगेच सासुबाईंना ताप आला, त्या काही म्हणत नव्हत्या , श्रीकांतने किती घाई केली, जा पटकन तिकडे आई एकटी आहे, तिला घेवून डॉक्टरांकडे जा, मला फोन कर मी पैसे पाठवतो,

लगेच निघाली होती मी तिकडून टॅक्सीने, सासरी गेली तर सासुबाई ठीक होत्या,.. "कश्याला आली ग एवढ्या धावपळीत, त्या ही बोलल्या" ,

तरी जबरदस्ती डॉक्टर कडे नेल त्यांना, तीन चार दिवस राहिली तिथे मग घरी आली होती मी, तो पर्यंत तिकडे आई एकटी होती, बाबा कसतरी काम करत होते, दुसर्‍या दिवशी दादा वहिनी आले, माझा काही उपयोग होत नाही आई बाबांना, माझ पण मुलगी म्हणून काही कर्तव्य आहे की नाही, की नुसत सुट्टीत मजा करायला कपडे घ्यायला आहेत माझ्या घरचे, त्यांना गरज असल्यावर मदत नको का करायला आपण, मी आता नाही सहन करणार हे, थोड तरी बोलायला हव.

सकाळी श्रीकांत ऑफिसला जायला रेडी होता. अश्विनीने त्याला चहा नाश्ता दिला, विचारू का परत जाऊ का मी दादा कडे ? काय माहिती काय म्हणतील, जावू दे मी जात नाही, हे असं नेहमीच होतं, कुठे जायचं म्हटलं की यांच्या विनवण्या करून करूनच अर्ध व्हायला होतं, तेव्हा ते कधीतरी त्यांना वेळ मिळाला की आपला विचार करतील, होकार देतील उपकार केल्यासारखा,

लोकांना वाटतं सेपरेट राहते ही किती छान आहे सगळं, नवरा मोठ्या पोस्टवर आहे, इंजिनियर आहे, मजेत चाललं आहे आयुष्य, दोन मुली तर आहे छोट्या सोबत, आरामात उठायचं, काही टेन्शन नाही, राजा राणीचा संसार.

पण इथे माझं काय होतं माझं मलाच माहिती, नुसता भावनांचा कोंडमारा होतो, त्रास होतो मला यांच्या अश्या वागण्याचा.


🎭 Series Post

View all