मितवा
( यावर्षी चा युवा व्यावसायिक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा)
जोरदार टाळ्यानी स्वागत करूयात,
आपले तरुण, तडपदार, व सगळ्यांचे चॉकलेट बॉय असलेले, खुप कमी वयात यशाची उतुंग शिखरे सर करणारे, मिस्टर सुजित आहुजा,
तो अँकर चा कानावर पडणारा गोड आवाज व टाळ्यांचा न थांबणार कडकडाट, माझ्या यशाचे स्वागत करत होते,
मी गर्दीतून वाट काढत स्टेज वर गेलो,
समोरील भरगच्च गर्दी व माझ्या यशाचे कौतुक करण्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या,
दोनीही माझ्यासाठी सुखावह होते,
मनात एकच विचार आला,
काय होतो मी
काय झालो मी,
पुस्तकाची पाने पलटावी तसा मी भूतकाळात गेलो,
मी एक इंजिनिअर,
लहानपणा पासून बोलण्यात तरबेज,
एक चांगला खेळाडू,
कुठलीही स्पर्धा असो माझा नंबर पक्का असायचा कारण अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी मला येत नव्हती,
डान्स करणे माझा आवडता छंद, क्रिकेट तर जिवाच्या आतले, भाषण स्पर्धा असो की वादविवाद माझे नाव स्पर्धकांच्या यादीत बघूनच अर्धे स्पर्धक कमी व्हायचे
लहानपणा पासून अभ्यासात हूशार असल्यामुळे,
न वारी करता एका झटक्यात इंजिअरिंग पूर्ण केलं,
दिसायला देखणा त्यात अभ्यासात हुशार त्यामुळे फक्त कॉलेज मध्ये च नाही तर कॉलनी मध्ये सुद्धा मी फेमस होतो,
प्रत्येकाला माझ्याशी बोलावं,
मैत्री करावी वाटायची,
आणि मी देखील त्याला साजेसा वागायचो,
माझ्या बोलक्या स्वभावामुळे मला खुप मित्र होते,
मला दुसऱ्यांना संकटकाळी मदत करायला खुप आवडायची,
"कारण आपण जेव्हा एखाद्याला संकटात मदत करतो त्या वेळी त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान आपण लाखो रुपये खर्चून देखील घेऊ शकत नाही ,
असे माझे मत होते,
कुणी मदत माघीतली तर मी कारायचोच पण कुणाला न मागता देखील करायचो म्हणजे फुकटचे सल्ले द्यायला खुप आवडायचे मला,
थोडक्यात सांगायचं म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्यामुळे मला एका मोठ्या कंपनी मध्ये जॉब लागला,
कंपनी खुप छान होती,
मी देखील मन लावून काम केलं,
पण त्यातच एका नवीन कंपनी ची ऑफर आली, ऑफर नाकारावी असे काहीच नव्हते,
कंपनी खुप मोठी व पगार देखील चांगला होता,
पण मला सध्याची कंपनी सोडायची नव्हती,
काय करावं ????
काय नाही ????
या विचारात मी नवीन कंपनी जॉईन केली,
कंपनी, माणसे, वातावरण सगळंच माझ्यासाठी नवीन होतं,
तिथली काम करण्याची पद्धत व माझी काम करण्याची पध्दत पूर्णपणे वेगळी होती,
सगळं काही माहीत असून,
सगळं काही येत असून
मी माघे पडत होतो,
काय होतंय मलाच कळतं नव्हते,
मी शून्यात जमा झालो होतो,
मला कुठलेच प्रेझेन्टेशन जमत नव्हते, माझा आत्मविश्वास तर कुठे गेला होता तेच कळत नव्हता,
मी चारचौघात बोलायला घाबरू लागलो, कुणी काही विचारले तर माहीत असूनही शांत बसायला लागलो,
कधी कधी तर एकटा असताना खुप राडायचो,
हो मी पुरुष असूनही राडायचो,
कसली तरी भीती वाटायची सतत,
मला कशातच रस वाटत नव्हता,
नेहमी निराश असायचो,
उत्साह या शब्दाचा व माझा संबध राहिला नव्हता,
मी रात्र रात्र, जागून काढायचो,
काय करणार झोपच येत नव्हती,
मी कशातच कमी नव्हतो तरी मी कुठेच नाही असे वाटायचे,
मी लपवत होतो स्वतः ला या जगापासून, सतत नकारार्थी विचार करायचो,
ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्यांचे देखील संबंध जोडायचो,
मला खुप त्रास होत होता पण काय होतंय तेच कळत नव्हते, शेवटी काय तर मी हरवून बसलो होतो स्वतः ला,
मी मला नैराश्याच्या गर्तेत ढकलून मोकळा झालो होतो,
नवीन सहकारी टोमणे मारायचे, हसायचे माझ्यावर, तरीही मी आपला शून्यात जमा,
फक्त जगायचे म्हणून जगत होतो........................
तेवढ्यात ती भेटली मला,
माझ्या सोबत काम करायची ती,
ती खुप हुशार
दिसायला सुंदर,
सगळ्यांना आपलंसं करणारी, सगळ्यांची लाडकी,
कंपनी मध्ये माझ्या वरच्या पोस्ट वर काम करणारी,
तिच्या बद्दल अगोदरच इतकं ऐकलं होतं की माझी तिला बोलायची हिम्मत होत नव्हती,
त्यामुळे मी आपला दूरच राहायचो,
कधी कधी कामा निम्मित
बोलणे होत असे
पण मी आपला दूरच राहणे पसंत करायचो,
खुप वेळा ती न मागता मला मदत करायची,
ती मदत करायची म्हणून मी पण मदत मागायला लागलो तिला,
रोज थोडं थोडं बोलणे चालू झाले,
शुभ सकाळ
शुभ रात्री
च्या मेसेज ची देवाण घेवाण चालू झाली,
मेसेज करता करता मग कॉल चालू झाले,
पाच मिनिटं, दहा मिनिटं असे करत करत कॉल एका तासांवर पोहोचला,
ती आता मला इतकी ओळखायला लागली की
माझ्या आवाजावरून ती माझा मूड ओळखायची,
तिने मला माझ्या अस्तित्वा ची जाणीव करून दिली,
तिने मला हसायला शिकवलं,
तिने मला जगायला शिकवलं,
तिने मला पुन्हा उभं केलं
या जगासमोर .....
तिनं मला लढायला शिकवलं....
ती माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली होती,
आता मला सवय झाली होती तिची
मला ती सोडून दुसरे काहीच दिसेना,
तिच्यासाठी मी चांगलं राहायला लागलो,
वाहवत होतो मी तिच्यात
तीच काळजी करण,
मला आपलं मानन
मी प्रेम मानून बसलो,
तसा तिचाही प्रतिसाद असायचा
पण ती कधी मनमोकळे व्यक्त च झाली नाही,
छान दिवस जात होते
त्यातच अशा काही घटना घडल्या की ती नकळत दूर गेली....... माझ्यापासून ती कायमचीच,
मी खुप ओरडायचो तिला,
भांडायचो, सतत तिच्यावर लक्ष ठेवायचो, तिने कुणाला बोलूच नये असे मला वाटायचे,
मला ते सहनच होत नव्हते,
ती ऑफलाईन असताना मनाला वाटेल ते बोलायचं मग ते बरोबर असो की नसो
फक्त मला समाधान वाटावे म्हणून,
एक तर बोलायचे नाही व बोललो तर फक्त भांडण
माझं अस वागणं तिलाही आता नकोस झालं होतं,
तिने खुप वेळा समजावले पण मी व माझ्या मनाचे खेळ कुणाचेच ऐकत नव्हतो,
मी माझेच खर समजयचो
व वाद घालायचो,
आता तिने बोलणेच बंद केलं,
ती लक्षच देत नव्हती
माझ्या वागण्याकडे,
मी पुन्हा नैराश्याने वेधले गेलो
रात्र रात्र जगायचो,
तिला कॉल व मेसेज करायचो,
पुन्हा तेच नाही नाही ते बोलणे,स्वतः ला त्रास करून घेणे, स्वतः च रडणे व तिला दोष देणे,
असेच दिवस जात होते
माझे वागणे काही बदलत नव्हते,
पण मी जेव्हा जेव्हा संकटात असायचे ती मदतीला धावून यायची,
बोलणे नव्हते तरी सतत सावली सारखी सोबत असायची,
तिला माझे लिखाण आवडायचे म्हणून मी लिहायला लागलो,
लिहता लिहता
मी माझ्यातल्या मला भेटलो,
माझ्या क्षमता ओळखू लागलो,
बोलण्यापूर्वी विचार करू लागलो,
तिला दोष देण्यापेक्षा तिच्या जागेवर स्वतः ला ठेऊ लागलो,
तेव्हा प्रत्येकवेळी ती बरोबरच भासू लागली,
मी इतका त्रास देऊनही
तिने कधीच मला दूर केलं नाही
तिने मला पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकवलं,
तिने मला झेप घ्यायला शिकवलं,
तिने मला स्वतः वर प्रेम करायला शिकवल
माहीत नाही ते प्रेम होत की नेमकं काय पण तिने मला जगायला शिकवलं,
मैत्रीच्या पलीकडले व प्रेमाच्या अलिकडले नाते होते आमचे,
व ते असेच निरंतर राहील.....
मितवा होती ती माझा,
मि-मित्र
त-तत्वज्ञ
वा- वाटाड्या
तिलाही तिच्या जबाबदाऱ्या आहेत,
तिलाही तिच्या मर्यादा आहेत,
तिलाही तिचे बंधने आहेत,
हे आता मला समजलं होत,
एखादी व्यक्ती आपली होण्यापेक्षा
तिची साथ आयुष्यभर टिकावी हे आता कळले होते मला,
आता आयुष्यात काहीही झाले
तरी मी पुन्हा नैराश्यात जाणार नाही कारण तिचा हसरा चेहरा मला त्याची परवानगी च देत नाही
तिचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर
ती तिच्या वाटेनं गेली ,
थांबली तीही नाही
अडवले मीही नाही
आजही तिची आठवण आली की मन व्याकुळ होते,
पण ती आजही मला संकटकाळी तशीच मदतीला धावून येते,
मनातल्या मनात उजाळा मिळतो
कधी आठवणींच्या क्षणांना
नकळत ओलावा कवटाळतो
या नयनांना
क्षण हा आनंदाचा असाच
साठवून ठेऊ
कधी हसत कधी रुसत
आयुष्यभर साथ देऊ
नको कधी दुरावा नको
कधी वाद
माझी हाक येता मिळू
दे तुझ्या प्रीतीची साद
अनमोल क्षण सारे
हे नयनरम्य सोहळे
प्रत्येक क्षण डोळ्यात साठवत
हृदयई हे बंध जुळे
या ओळी तिच्यासाठी
डोळ्यातील दोन अश्रू ढाळून,
तिने जगण्याची शिदोरी बांधून दिली होती मला,
पुन्हा उभं करून गेली
जगण्यासाठी मला,
नैराश्याने ग्रासलेला होतो जरीही
तरीही तिने शिकवले आयुष्य खुप सुंदर आहे
एकदा जगून तर बग,
तिने माझ्यासाठी लिहलेल्या या चार ओळी मला आजही प्रेरणा देतात,
दमला असशील
थकला असशील
अन्यायाने गंजला असशील
तरीही उठ व कामाला लाग
कारण .................
बदल तुलाच घडवायचा आहे
बोलणारे बोलतील
हसणारे हसतील
जवळचे पण कधी पाट फिरवतील
तरीही यांचा तू सामना कर
कारण.............
बदल तुलाच घडवायचा आहे
मन खचले
स्वप्न विरले
विचारांना देखील इथे जातीवादाने घेरले
तरीही तुझे विचार तू समाज्यात रुजव
कारण..............
बदल तुला घडवायचा आहे
क्षितिजापालिकडे आशेचा
किरण दिसेल
जे वाटे,भासे मनी
ते प्रत्यक्षात असेल
असा समाज तू निर्माण कर
जिथे असत्याला थारा नसेल
यासाठी उठ व लढ
कारण .........
बदल तुलाच घडवायचा आहे
खरच
मला मिळालेल्या तिच्या अनमोल साथीने
मी माझ्या नैराश्यावर मात केली ती कायमची ...................
समोर जोरदार वाजणाऱ्या टाळ्यानी मी पुन्हा भानावर आलो, अरे आपण कुठे हरवलो होतो,
माझे मलाच हसू आले व मी स्टेज वरून पायउतार झालो,
शेवटी एक कळले
माणूस एकदा का आतून तुटून स्वतः हुन सावरला ,
त्या नंतर त्याला आयुष्यात सावरण्यासाठी कधीच कुणाची गरज लागत नाही,
कथा कशी वाटली नक्की कळवा आपल्या लाईक व कमेन्ट च्या प्रतीक्षेत ........
आपला प्रतिसाद लेखकाला लिहिण्यास प्रोत्साहन देतो,
@कथेचे सर्व अधिकार लेखिका गीता सूर्यभान उघडे यांच्याकडे राखीव आहेत, कथा शेअर करायची असल्यास नावानिशी करू शकता, पण साहित्य चोरी नको कारण लेखन हे लेखकाचा आत्मा असते,
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा