Login

मित्र?

Mitra?
©®विवेक चंद्रकांत...

"हॅलो,.."

"Happy women's day "

"Oh. Thank you."

"आजचा काय प्रोग्राम?"

"रोजच्यासारखे ऑफिस "

"आज मी रिकामाच आहे. काही प्रोग्राम करूया का?"

"कसला?"

"तू ऑफिसला दांडी मार. माझ्याबरोबर ये."

"म्हणजे?"

"म्हणजे घरून ऑफिसच्या वेळी निघ. मी तूला चौकातून घेतो माझ्या कारमध्ये."

"पुढे?"

" कुठंतरी मस्त नास्ता करू आणि अमेय थिएटरला एक छान सिनेमा लागलाय तो पाहू. साडेबारा ते अडीच. ते दूर असल्याने कोणी पाहणार नाही आपल्याला. "

"नंतर?"

"अर्थातच जेवण घेऊ शेजारच्या "भव्य पॅलेस" हॉटेलला. "

"अरे वा! नंतर घरी का?"

"नाही ग.. तिथे वरती रूम्स आहेत. तिथे थोडा आराम करू?"

"कायय? मी समजले नाही."

", एवढी भोळी नाहीये तू. तिथे तासभर थांबू.. सेक्स करू."

"तुझी हे बोलण्याची हिम्मत कशी झाली. इतकं चिप समजला का मला?"

"हे बघ.. उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस. आता या गोष्टी कॉमन झाल्यात. आपण चांगले मित्र आहोत. मी काही ही गोष्ट कुठे लीक करणार नाही."

" यू बास्टर्ड.. तूला चांगला मित्र समजत, होते मी. पण तू इतक्या खालच्या लेवलचा असशील असे वाटले नव्हते. तुला काय वाटले की तू खाउपिऊ घालशील, picture दाखवशील आणि मी लगेच... "

"तुला अजून काही पाहिजे असेल तर सांग. गिफ्ट? पैसे? सोन्याचे काही? खरेतर तुझी सुंदर काया कधी मिठीत घेऊ असे झाले आहे. आणि बेडवर मी स्त्रीला संपूर्ण सुख देतो."

"माझेच चुकले. मी तुला ओळखण्यात कमी पडली. मी तुला जवळचा चांगला मित्र समजत होते. जो मला मदत करतो, माझा आदर करतो, पण नाही... तुही शेवटी माझ्यातली मादीच बघत होतास. Anyway.. जास्त बोलली तर माझेच डोके फुटून जाईल आणि माणसांवरचा विश्वास उडेल. परत मला कधीही call करू नको आणि भेटू नको. मी तू समजतो तशी नाही... खरेतर कोणतीच स्त्री तशी नसते."

"अग.. पुष्कळ पाहिले तुझ्यासारखे. आधी नाही म्हणत नंतर हो म्हणणारे..अजूनही विचार कर. आजचा दिवस यादगार जाईल."

"शी... तुझ्याशी बोलणे म्हणजे गटारीत दगड मारण्यासारखे आहे. Enough is enough. परत माझ्या वाटेला गेलास तर याद राख."

तिने phone बंद केला आणि डोळ्यातला अश्रूना वाट करून दिली.ते अश्रू होते...

विश्वासघाताचे....

समजण्यात चूक होण्याचे....

आणि अजूनही स्त्रीला उपभोग्य वस्तू समजण्याच्या मानसिकतेचे......
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.