मित्र मैत्रीणी वेडेच असतात

Friends forever...

नाते हे जीवनातील फार महत्त्वाची भूमिका बजावतात .आपण सर्वच आयुष्यात नात्यांच्या संपर्कात  जगतो .मानवी जीवन हे सदैव नात्यांच्या वर्दळीतच असत. आणि हो ,हेही तेवढंच खर आहे की हल्ली स्वत;ला सुरक्षित ठेवणे किंवा जपण अवघड आहे, तर नात्यांचा विचारच बाजूला असतो.नात्यांची अनेक रूपे असतात ,जसे काही बोलकी ,काही अबोलकी,काही परिचित,काही जवळची,काही औपचारिक.नाते हे जीवनाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात. आणि त्याच नात्यांमध्ये विलक्षण व अजब,सोन्याहूनही पिवळ म्हणजे मैत्रीच नात. अश्याच नात्यासाठी ही छोटीशी कविता                                              मित्र.मैत्रिणी वेडेच असतात !!

   केंव्हाही येतात केंव्हाही जातात
   मनाची दारं उघडीचं टाकतात  
आपल्या सुखात खळखळून हसतात
आपल्या दुःखात पिळवटून रडतात
मित्र मैत्रिणी  वेडेच असतात.!!

     जवळची नातीसुद्धा परकी होतात 
      दिलं ,घेतलं हिशाोबातअडकतात
      तिथं हेच सावरायलाच असतात
  सावरलंकी अलगद बाजुलाही सरकतात
मित्र मेैत्रिणी वेडेच असतात.!!

         रक्ताच्या नात्याचे नसतात .
       अग्निसमक्ष जोडलेले नसतात
       एखाद्या अवचित हळव्या क्षणी
       अद्वैत साधून मनात शिरतात
   मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!

       सारे माझे तयांना ठाऊक असते
      सारे तयांचे मला ठाऊक असते
      कोठे काय बोलायचे उमजलेले असते
      काय ओठांच्या आत हवे माहित असते.
मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!

        बालपणीचे निरागस बंध
         तारुण्यातील उनमत्त  गंध
          ‌प्रौढपणीचा समजदार संग
          अवघे आयुष्य माझे रंगारंग 
   मित्र मैत्रिणी  वेडेच असतात.!!

मैत्री  खरंच अशी अनमोल असते. 
प्रत्येक जीवाने अनुभवायाची असते.
पण....पण.....
खुळ्या सोनेरी उन्हासारखी
आयुष्यात मैत्री जुळावी लागते.

अरे मित्र आणि मैत्रिणींनो मैत्री हि कोठेही विकत मिळत नाही , तेंव्हा आपल्या जवळच्या मित्रांना  मैत्रिणींना जपा .