
दारावरची बेल वाजली. टींग...टॉंग..टींग...टॉंग..टींग...टॉंग
अरे ऋतू बघतोयस का जरा कोण आलय ते.....
हो आई बघतो मी
ऋतुराजने दरवाजा उघडला बघतो तर काय.. समोर पोलीस उभे. पोलीस आपल्याकडे कसे काय आले याचा विचार मनातल्या मनात सुरु असतांनाच...
mr. ऋतुराज कोण आहे?
मीच आहे ऋतुराज
mr. ऋतुराज तुम्हाला आमच्यासोबत पोलीसस्टेशनला यावं लागेल.
मला आणि पोलीस्टेशनला?? का बर? मी काय केल आहे इन्स्पेक्टर साहेब?
तुमच्याविरोधात फसवणूकीची तक्रार केली आहे. त्याच संदर्भात तुम्हाला चौकशीसाठी पोलीसस्टेशनला यावं लागलं.
फसवणूक आणि मी? कुणाची? कुणी तक्रार केली आहे?
हे बघा mr. ऋतुराज तुमच्या प्रश्नाचे सर्व उत्तर तुम्हांला पोलीस स्टेशनला गेल्यावरच मिळतील. आता तुम्ही आमच्यासोबत येत आहात की अटक करावी लागेल तुम्हाला.
आई-बाबा लगबगीने बाहेर येतात ... काय झालं म्हणून प्रश्नार्थक मुद्रेने पोलिसांकडे बघतात. पोलिसांना विचारायला गेले तेच पोलीस पुन्हा दरडाऊ लागले
पोलीस:- जे काही बोलायचं ते पोलीसस्टेशनला या आणि बोला...... असं म्हणून पोलीस त्याला घेऊन गेले.
त्यांच्यामागेच भावपळ करत आई-बाबा देखील पोलिसस्टेशनला पोहचले. तिथे गेल्यावर कळलं.
हे सगळं सुमेधाने केलेलं आहे.
सुमेधा म्हणजे ऋतुराजची मैत्रीण... आता x girlfriend होती ती.
इन्स्पेक्टर साहेब आतातरी कळेल का माझा काय अपराध आहे? मला इथे का आणलं?
हो... जरा शांत रहा. आवज चढवून बोलण्याची गरज नाही. आम्ही आमचं कर्तव्यच पार पडतोय. शेवटी आम्ही देखील कायद्याला अनुसरूनच वागतो.
तर mr. ऋतुराज तुम्ही याना ओळखता का?... सुमेधाकडे हात दाखवत पोलीस विचारतात.
हो... ही सुमेधा. माझी कॉलेज फ्रेंड.
कॉलेजफ्रेंड की त्याहून जास्त...
हे काय बोलताय साहेब तुम्ही... जरावरच्या आवाजात ऋतुराज बोलला.
mr. ऋतुराज आवाज खाली. हे तुमच घर नाही पोलिसस्टेशन आहे. इथे मी विचारेल त्या प्रश्नांची सरळ -सरळ उत्तरे द्यायची..
तर काय विचारत होतो मी.,. तुम्ही सुमेधला ओळखता का? आणि हो तर तुमच तिच्याशी नात काय?
अहो साहेब आम्ही एका कॉलेजमधे होतो. मैत्री होती आमची.
मैत्री की त्या पलीकडेही काही होत... इन्स्पेक्टर खोचकपने बोलले
ऋतुराज आणखी रागात येऊन....काहीही काय बोलताय साहेब तुम्ही
पोलिसी खाक्या नको दाखवायला लाउस आम्हाला नीट उत्तर दे.
mr. ऋतुराज तुमच्यावर सुमेधाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्याचीच चौकशी करण्याकरिता तुम्हाला इथे आणलं आहे.
सुमेधा आणि तिचे आई-बाबा देखील तिथेच होते.
हे असले घाणेरडे आरोप ऐकून ऋतुराज स्वतःच भांबवला... त्याच्या आईला तर चक्करच आली.... ऋतुराजच्या बाबाने त्याच्या आईला सावरत बेंचवर बसवलं आणि पाणी तिच्या डोळ्यावर शिपडलं. डोळे थोडे किलकिले करत त्या बोलल्या.. "अहो हे काय बोलताय पोलीस? आपल्या ऋतुवर कसले आरोप करत आहेत? आपल लेकरू नाही हो अस. माझा विश्वास आहे माझ्या पोरावर." त्या रडायला लागल्या.
स्वतःला कसबस सावरत ऋतुराज म्हणाला आई तू ठीक आहेस न? तू काळजी नको करू.. मी आहे न बघतो काय झालं ते. तू सावर स्वतःला.
आता ऋतुराजणे आपला मोर्चा सुमेधा कडे वळवला. सुमेधा तू हे जे काही केलंस ते तुला योग्य वाटत आहे का? तुझ मन धजावल कस असे घाणेरडे आरोप करायला.
निदान मैत्रीची लाज ठेवायची होतीस.
अग माझं प्रेम होत तुझ्यावर. तुहीतर माझ्यावर प्रेमच करत होतीस ना.. नाही -नाही तू तर टाईमपास केलास माझ्यासोबत. तुला श्रीमंत आणि तुझ्यावर वाटेल तेव्हढे पैसे खर्च करणारा बॉयफ्रेंड हवा होता. थोडेदिवस कमिटेड राहिलीस माझ्यासोबत आणि नंतर मात्र तुला विनीत आवडू लागला. कदाचित त्याच्यापेक्षा त्याची श्रीमंती आवडली होती तुला.. गेली सहा महिने तुझा माझा काहीच संबंध नाही. साध फोनवर बोलण देखील नाही. मग हे असे खोटे आरोप का करतेयस. मी तुला सोडल नव्हतं... तू मला सोडून गेली होतीस. सरळच बोलायचं झालं तर हे त्या विनीतच पाप तू माझ्यावर का लादतेस.
सहा महिने झाले आपल ब्रेकअप होऊन. मग हे प्रेग्नसी आणि बलात्कारचे खोटे आरोप का करतेयस? कायद्याचं संरक्षण मिळालं म्हणून असा कायद्याचा गैरवापर करू नकोस. अग प्रेग्नसी सारखा मोठा आरोप करण्याआधी विचार करायचास न की DNA चाचणी केली तर मी निर्दोष सिद्ध होईल.
इन्स्पेक्टर साहेब असे तकलादू आरोप घेऊन तुम्ही आमच्यासारख्या सज्जन माणसाच्या घरी येऊन आमची जी बदनामी केली त्याच काय?
सुमेधा माझ्याकडे देखील पुरावे आहेत. तुझे आणि विनीतचे अफेअर किती दिवसापासून सुरु आहेत आणि या तुझ्या प्रेग्नसीला कोण जबाबदार आहे ते. आणि हो इन्स्पेक्टर साहेब मी DNA चाचणी करायला देखील तयार आहे.
ऋतुराजचे हे सडेतोड बोलणे ऐकून पोलीस देखील चकरावले पोलीस सुमेधाला रागावू लागले. महिलांना कायद्याचं संरक्षण मिळालं म्हणून तुम्ही मुली अशा खोट्या पोलीस कम्प्लेंट करून तुमच्यासोबत आम्हालाही खाली बघायला लावता. चोर सोडून सन्यासाला फाशी देण्यासारखं झाल या केसमधे.
सुमेधाला तिची चूक कळली.. खूप रडत होती. अशा परिस्थितीत काय करावं हेच तिला सुचेना म्हणून तिने असा अयोग्य निर्णय घेतला.
तिचे आई -बाबा देखील खूपच खजिल झाले होते. त्यांनी
पोलीस कम्प्लेंट वापस घेतली.
या सगळ्याला विनीतच जबाबदार आहे पण तो आता जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि आता तो तिला ब्लॅकमेल करतोय. अबोर्शन करणं शक्य नाही त्यामुळे बाळाची जबाबदारी तू घ्यावी कारण तू खरच माझ्यावर प्रेम कारायचास म्हणून मी हे सगळं नाटक केल....हे सुमेधाने मान्य केल.
तूझ्या अशा वागण्याने एका मुलाचं आयुष्य वाया गेलं असत... पोलिसांनी तिला ताकीद दिली आणि त्या विनीत विरोधात कम्प्लेंट करायला लावली. त्यांच्यानी होईल तितकी मदत ते तिला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी करतील अस आश्वासन दिल घर.
पोलिसांनी ऋतुराजच्या आई -बाबाची माफी मागितली... आम्ही कायद्याने बांधलेलो आहोत. कम्प्लेंट आली की आम्हाला कार्यवाही करावीच लागते अस म्हणून त्यांना जायला सांगितले.
समाप्त... ??
कायद्याचा असा गैरवापर बरेचदा होतो आणि चूक नसतानाही निष्पाप मुलं याला बळी पडतात. स्त्रियांना कायद्याचं संरक्षण मिळालं आहे त्याचा योग्य वापर करा. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. आवडल्यास like करा. कशी वाटली ते कमेंट मधून सांगा. शेअर मात्र नावासहितच करा. धन्यवाद ??
©जयश्री कन्हेरे -सातपुते