मिस्टर आणि मिसेस:- भाग 6

Vihan And Namita Went For Lunch Date Together

स्वतःवर वैतागत तो तसाच झोपी गेला. सकाळी अलार्म वाजला तेव्हा तो उठला आणि फ्रेश व्हायला गेला. मनात सतत नमिता चा विचार होता...बाहेर येऊन कालचा कपड्यांचा पसारा त्याने पटकन आवरून बॅग पॅक केली. कारण ऑफिसमध्ये लवकर जायचे आणि परत येऊन या सगळ्याचा वेळ मिळेल का हे त्याला माहित नसल्याने त्याने आवरते घेतले.
बरोबर 7.45 ला गाडी पीक करायला आली आणि तो ऑफिसमध्ये निघाला...जाताना पुन्हा ती कशी भेटेल याच विचारात होता.

ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात वेळ भराभर पुढे जात होता, सगळे त्याला आवरते घ्यायचे होते त्या नादात त्याने ब्रेकफास्ट पण स्कीप केला. फक्त कॉफी पित त्याने काम पूर्ण केले, बाकीचे जे त्याला पुढे सेंड करायचे होते त्याबद्दल त्याने सूचना दिल्या. प्लांट उभारण्यासाठी जी बेसिक फॉर्मल तयारी होती याचा त्याने आढावा घेतला होता. पुढच्या महिन्यात एकदा त्याला टीम ऑफ आर्किटेक्ट बरोबर परत व्हिजिट करावी लागली असती.
तिथल्या मार्केटिंग हेड आणि प्रोडक्शन हेड ला तसे सांगून दुपारी 2 वाजता तो हॉटेल कडे निघाला.

ब्रेकफास्ट स्कीप केल्यामुळे त्याला जाम भूक लागली होती...थोडा थकवा पण जाणवत होता... हॉटेल लॉबी च्या आत तो शिरला तर त्याचा पूर्ण थकवा एक क्षणात दूर पळाला आणि त्या जागी मनापासून स्माईल चेहऱ्यावर आली ...त्याला लॉबीत नमिता बसलेली दिसली...

"हाय तू इथे?" उत्साहात त्याने विचारले. अनपेक्षितपणे त्याच्या समीर नमिता उभी होती. छानसा पिस्ता कलरचा वनपीस, त्यावर मोकळे केस त्याला साजेसा सिम्पल मेकअप मुळे ती त्याला परिसारखी भासत होती.

"हो का यायला नको होते का?"
"अगं... नाही...आपलं हो....येस! ऑफकोर्ज यायला हवे होते... केव्हा आलीस?" तिच्या हातात बॅग बघून तो म्हणाला.

"जस्ट 10 मिनिटे झाली....माझ्याकडे तुझा नंबर नाही आणि तुला भेटायला हीच एक जागा मला माहित होती ना आणि मी विचार केला की दी पण ऑफिसमध्ये आहे..तू जेवायला जरी नाही आलास तर बॅग घ्यायला तर नक्कीच इथे येशील. सो मी इथे आले..म्हणजे तुझ्या बरोबर इथून डायरेक्ट स्टेशन ला जाता येईल...." हसत ती म्हणाली

मनातून तर त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, अपेक्षित नसताना ती त्याच्या समोर त्याची वाट पाहत होती. तिचा नंबर हवा असलेला तो प्रत्यक्ष तिला समोर अनुभवत होता.

"ग्रेट! माझे जेवण व्हायचे आहे आणि चल इथे एक इन्फिनिटी रेस्टॉरंट आहे ...तिथेच लंच घेऊ यात. चालेल ना...?"
ती फक्त हसली...

तो तिला घेऊन इंफिनिटी रेस्तराँ ला गेला..इंफिनिटी ची कल्पना फारच अप्रतिम होती. एक राऊंड हट ला काचेची वॉल लावली होती. खालती विहंगम भाट्ये बीच आणि समोर अथांग अरबी समुद्र दिसायचा...हॉटेल छोट्याशा टेकडीवर वसलेले होते..भरपूर प्लॅंट्स लावून
तो टेकडी चा परिसर फारच सुशोभित केला होता...
थोडे ढगाळ वातावरण आणि समुद्रावरून येणारे वारे या दोन्हीचे फार सुरेख कॉम्बिनेशन जाणवत होते.
रत्नागिरीला हा व्ह्यू ती पहिल्यांदाच पाहत होती...या वातावरणात विहान आपल्या सोबत आहे हे तिला स्वप्नवत वाटत होते जणू.

"मॅडम, सो नाईस टू सी यू " हसत तो तिच्या समोर बसत म्हणाला.
"सेम हिअर" गोड हसत ती म्हणाली.
"कसा वाटला तुला हा व्यु?"
"स्प्लेनडीड..थँक्स फॉर ब्रिगिंग मी हियर"
तो फक्त हसला...
"विहान ऐक ना"
"बोल ना"
"आज तुझी चॉईस बघूयात. तू मेनू ऑर्डर कर" म्हणत तिने मेनू कार्ड दिले.
"हे बघ, मला आत्ता जाम भूक लागली आहे...त्यामुळे आत्ता समोर काहीही आले तरी मी खाईन..."
"तरीसुद्धा तूच ऑर्डर द्यायची..." ती म्हणाली...
त्याने क्लब सँडविच, व्हेज चीझ पिझ्झा, दाल तडका, कडक रोटी, कर्ड राईस असे ऑर्डर केले.
त्याची ऑर्डर पाहून तिला मनातल्या मनात हसायला आले...
"का हसतेस ग...?"
"अरे, काही नाही.....विहान तुझ्या हॉबी काय आहेत?"
" मला ना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. बुक्स वाचायला आवडतात आणि सगळ्यात छान म्हणजे म्युझिक!" उत्साहात तो म्हणाला.
ती मन लावून ऐकत होती.
"तुला?"
"मला वाटले तू माझ्याच हॉबी सांगतोय" असे म्हणत तिने त्याला टाळी दिली.
"चला काही तर कॉमन आहे म्हणायचे"
" हो नक्कीच"
" तुला समुद्र आवडतो की हिलस्टेशन?" नमिताने विचारले..
"समुद्र हा सकाळी आणि संध्याकाळी छान वाटतो पण हिल स्टेशनवर असलेला निसर्ग त्यातील हिरवळ,डोंगर हे कायम आणि कायमचंच असतात मग दिवस असो वा रात्र, सकाळ असो की संध्याकाळ. "

"खरे आहे" त्याचे बोलणे ती जणू इमॅजिन करत होती.
तिचा तो थोडा विचारातील चेहरा, त्यावर वाऱ्याने येणारे केस त्या गुलाबी लिपस्टिक ला टच करायची त्या केसांची चढाओढ त्याला खूप मोहवत होती. तिला एकटक बघण्यात तो गर्क होता तर त्याची ती नजर तिच्या गालावर लाली आणत होती.

"ए तुला स्विमिंग येते का?" अचानक तिने विचारले.
"नाही ग.....हा पण फक्त 2 वेळा नॅशनल गोल्ड मेडल मिळाले आहे" मिश्किल पणे तो म्हणाला.
"व्हॉव म्हणजे मी एका चॅम्पियन सोबत आहे तर" कौतुकाने ती म्हणाली तसे स्वतःबद्दल अभिमान त्याने क्षणात अनुभवला.

आज पहिल्यांदा न भांडता ते बोलत होते, एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते जो त्यांना मनापासून आवडत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद, उत्साह ओसंडत होता. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना जेवण आले तसे तिने "तुला सांगायचे राहिले...हे सगळे माझे फेव्हरेट आहे" ते ऐकून आनंदाने त्याचे डोळे चकाकले

"अमेझिंग टेस्ट आहे रे!" फूड टेस्ट करत ती म्हणाली तसे तिच्या खाण्याने समाधान मात्र ह्याच्या चेहऱ्यावर विलसले.

"मग काय प्लॅन आहे आता?" नमिता ने विचारले..
"तुझ्या बरोबर वेळ घालवायचा" अनावधानाने तो बोलून गेला पण क्षणात आपला वेंधळटपणा त्याला लक्षात आला आणि त्याला ठसका लागला तसे तीने पटकन उठून त्याला पाणी दिले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला.

तो काय बोलला हे तिला ऐकू गेले होते पण त्याला ठसका लागल्याने क्षणात काळजीपोटी ती उठून आली होती.
त्याच्या पाठीवर हात फिरवत ती गालातल्या गालात हसत होती आणि त्याची गडबड तिने अचूक हेरली होती.

"ठीक आहेस ना?" तिने त्याच्या समोर बसत विचारले.
"हो! थँक्स"
"काय झाले रे अचानक? "भोळेपणाचा आव आणत त्याची फिरकी घ्यायला ती म्हणाली.
"काही नाही, आईने आठवण काढली बहुतेक" म्हणत त्याने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण ती मात्र खळाळून हसत होती त्यामुळे तो थोडा लाजला.

तोवर जेवण आटोपले होते...सरप्राईज डेझर्ट म्हणून त्याने साजूक तूप घातलेले उकडीचे मोदक, मँगो श्रीखंड आणि काजू अंजीर आईसक्रिम मागवले होते.
"अरे किती गोड खायचे?"
"अग खा गं, तू जाड नाही होणार" तिला हसवायला तो म्हणाला.
हसत खेळत मध्येच एकमेकांना लूक देत त्यांच्या भरपूर गप्पा सुरु होत्या.

" नमिता, 4 वाजत आलेत, मी रूम चेक आऊट करून बॅग घेऊन येतो मग सोबतच जाऊयात स्टेशन ला चालेल?"
"येस बॉस!" हसत ती म्हणाली ...तोपर्यंत तिने समुद्राच्या व्ह्यूचे काही फोटो काढले आणि लॉबी मध्ये वाट बघत बसली.

पुढच्या 10 मिनिटात तो बॅग घेऊन आला, बाहेर कार त्याची वाट पाहत होतीच.
कार निघाली...ते वेळेत होते..12 किमी चे अंतर ते 25 मिनिटात कव्हर करणार होते...
गाडी शहरातून जात असताना एका सिग्नल ला थांबली...तसे अचानक एक लहान मुलगा पैसे मागायला आला तेव्हा याने पटकन खिशात हात घातला आणि जे आले ते दिले.
तिने आश्चर्याने विचारले " अरे 200 रुपये होते ते!"
"असू देत ग, आपण आपल्या खाण्या वर हजारो खर्च करतो मग ज्यांना मिळत नाही त्यांना दिल्याने वाईट का वाटून घ्यायचे.... उलट मला तर अशांना भविष्यात खूप मदत करायला आवडेल."

त्याच्या या विचाराने ती एकदम इम्प्रेस होऊन त्याच्याकडे कौतुकाने बघत होती तसे त्याने तिच्या डोळ्यासमोर हात फिरवत तिला भानावर आणले आणि नजरेनेच "काय झाले"विचारले तसे लाजून ती "काही नाही" म्हणाली.

स्टेशन मेन गेट वर जसे ते पोहचले तसे तेजस ची अनाउनसमेन्ट होत होती...गाडी 20 मिनिटे उशिरा होती.
ते दोघे ब्रिज वरून त्या साईड च्या प्लॅटफॉर्मवर आले...
कोच पोझिशन चेक करत त्या ठिकाणी येऊन थांबले...

"वेळेच्या आधी पोचलो ..." तो तिच्याकडे बघत म्हणाला..
"तू असल्यावर मला ती काळजी नव्हती...आपण वेळेवर पोचणारच होतो"
तो हलकेच हसला..
"एक एक कॉफी..?" त्याने विचारले...
"अरे, गाडीत मिळेल ना.."
"ती पण घेऊ नंतर..."
"तू कितीही कॉफी पिऊ शकतोस ना...?"
"अनडाऊटेडली..."
"ओके...."

प्लॅटफॉर्मवर मागेच कॉफी काउंटर होता...त्याने दोघांसाठी कॉफी घेतली...
"कॉफीची मला एक मजा वाटते..."
"काय...?"
"स्ट्रॉंग असो वा माईल्ड ...प्रत्येक वेळेला ती मला जवळची भासते"
त्याच्या या बोलण्यावर ती हसली...

तेवढ्यात ट्रेनचा हॉर्न ऐकू आला...

"आज विचार आहे का डोअर बंद होणाच्या वेळीस बाहेर राहायचा..?"
"नाही...नो...नेव्हर....मी डायरेक्ट दादरलाच उतरेन आता..."
त्याच्या या बोलण्यावर ती खदखदून हसायला लागली...
तिच्या या हसण्यावार प्लॅटफॉर्म वर आलेली तेजस एक्सप्रेस सुद्धा हॉंकिंग करत दुजोरा देत होती..

क्रमशः
©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all