मिस्टर आणि मिसेस:-भाग 28

Vihan And Namita Went To Shopping Where Jai Was Irritated Due To Nisha's Behaviour
"बावनकशी सोनं" हा शब्द जय साठी निशाला बरोबर पटला...ती हलकेच हसली आणि तिच्याही नकळत तिची पावले जय च्या दिशेने वळली.

पाठमोरा जय, व्हाइट टी शर्ट, ब्लॅक जीन्स, ब्लॅक अँड व्हाइट स्पोर्ट्स शूज, थोडे कुरळे केस असा खरंच खूप छान दिसत होता.
निशा त्याचा जवळ गेली त्याचे लक्ष नव्हते, तिने त्याच्या करंगळीला मुद्दाम स्पर्श केला तसे त्याने एकदम मागे पाहिले.

निशा दिसताच त्याने एकदा तिच्या डोळ्यांत पाहिले ती डोळ्यातून बोलत होती आणि ओठावर स्माईल होते पण क्षणाचाही विलंब न करता जय तिथून बाजूला झाला आणि शॉप मध्ये शिरला.
हे सगळे विहान लांबून बघत होता...तो मनाशीच हसत नमिता होती तिथे गेला.

जय निशा ला टाळायला म्हणून उगीच तिथे असलेले कपडे हँगर वरून काढून बघत होता. निशा तिथे आली तर तिथून तो शर्ट च्या काऊंटर वर आला.

निशा आली तसे तो दुसऱ्या काउंटर वर निघाला... तो जायला निघाला तसे तिने त्याला हाताला धरलं. त्याने हात झटकायचा प्रयत्न केला पण तिने हात घट्ट धरला होता... मनात असूनही तो जाऊ शकत नव्हता.... काऊंटर वरचा माणूस हे सगळे बघत होता.

" जय हा बघ ब्लु चेक्स तुला छान दिसेल" तिने त्याच्या हातावर हात टेकवत म्हणले तसे त्याने त्याचा हात अलगद काढून घेतला.

तिने त्या काउंटर वरच्या माणसाला " हा पॅक करा, आणि तो रेड बघू" असे म्हणत आणखी काढायला लावले.
तिच्या वागण्यावर जय काहीच बोलत नव्हता.
तिने 5 शर्ट ट्रॉली मध्ये घेतले तसे वैतागून जय तिथून सरळ दुसऱ्या सेक्शनच्या खुर्चीवर जाऊन बसला तशी ही तिथे गेली ..." जय, तुला हे शर्ट छान दिसतील आता आपण ट्रॉउजर सेक्शन कडे जाऊयात " असे म्हणत तिने त्याचा हात धरायचा प्रयत्न केला तसे त्याने तिला एकदा नजर वर करून चिडून पाहिले आणि तिथून तो विहान होता त्या दिशेला गेला.

निशा ला मनातून खुप वाईट वाटत होते तर हिच्या या अशा वागण्यावर जय विचार करत होता. तिचे असे वागणे त्याला प्रश्नचिन्ह निर्माण करत होते... पण निशानेही मनाशी काही ठाम ठरवलेच होते त्यामुळे काहीही झाले तरी ती जयबरोबर हसून वागणार होती आणि त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार होती.

"विहान मला ठीक वाटत नाही आहे मी जाऊ का?" जय विहान पाशी जाऊन म्हणाला..

"का रे जय काय झाले तुला? तू तुझ्या विरुला एकटे सोडणार का?"

"विहान मला असह्य होत आहे इथे..त्या निशा ला बेड लागले आहे..मुद्दाम हात काय पकडते, शर्ट घे काय म्हणते... ट्रॉउजर घे असे म्हणते...प्लिज यार...हीचे वागणे असे आहे ना की तिला काही करायचे तर नाही बर उगाच असे दाखवायचे....ऐक ना...तिला सांग की हे असे वागणे थांबव म्हणून..."

"जय..जरा शांतपणे घे...नमिता, जरा जय ला इथल्या कॉफी काउंटर ला घेऊन जा.. मी आलोच हे ट्राय करून..आई ला दाखवून येतो..." विहान म्हणाला तसे नमिता त्याला घेऊन कॉफी कॉर्नर ला गेली.

"जय तू ठीक आहेस ना? नमिता ने काळजीने विचारले.
"हो" तो थोडे तुटक तो म्हणाला तेवढ्यात निशा मागून आलीच.

"काय झाले नमूं?"
"जय ला बरं नाही वाटत आहे म्हणून आले"

"जय काय झाले तुझी तब्येत तर ठीक आहे ना" तिने पटकन त्याच्या मानेला हात लावून पाहिले की ताप आहे का.. तसे तो पटकन उठून उभा राहिला.

तो तिथून जाणार तेवढ्यात समोरून निशा चे आईबाबा, विहान ची आई आणि विहान आले.
ते आल्याने त्याला तिथून जाता येत नव्हते आणि हेच तर निशाला हवे होते
"जय, बेटा कुठे होतास तू दिसलाच नाहीस?" विहान ची आई म्हणाली
"काकू होतो इथेच विहान सोबत"

"हो का...बरं!... तुम्ही मुले तुमच्या आवडीने जे हवे आहे ते घ्या. विहान, जय साठी सुद्धा तुला सगळे घ्यायचे आहे..."

"काकू लग्न विहान चे आहे माझे नाही" तो हसत म्हणाला...

"माझ्या एका मुलाचे आज आहे तर दुसऱ्याच होईल की लवकरच. आपण विहान च्या लग्नात तुझ्यासाठी मुलगी बघू, चालेल का?" त्याची पाठ थोपटत त्या म्हणाल्या.

जय आणि विहान ने एकमेकांकडे बघितले...

" मुलांनो आम्ही इथेच बसणार आता या कॉफी काउंटर वर... जरा गरम कॉफी घेतो....खूप थकलोय! तुम्हीच पुढचे बघा ...चालेल न हो ताई?" तिची आई म्हणाली

तसे त्यांनी पण दुजोरा दिला.

"निशा..तुझे काही घेऊन झाले का..?" तिच्या आईने विचारले तसे विहान, नमिता ने एकदम निशा कडे पाहिले तर ती जय कडे बघण्यात गर्क होती.

जय ला पाहून तिचे बाबा म्हणाले, "जय तू बोलताना, हसताना छान दिसतोस रे काय झाले तुला?"

"काका थोडे बरं नाहीय मला...म्हणून शांत बसलोय" तो कसाबसा हसत म्हणाला आणि तेवढ्यात फोन चा बहाणा करत जय बाजूला झाला.

सगळ्यांसाठी कॉफी आली...कॉफी टेस्टी होती...एक कॉफी निशा जय साठी घेऊन गेली...त्याने कॉफी घ्यायला सुरुवात केली...
कॉफी पिताना निशा ने जय ला ढोपराने धक्का दिला,त्याची कॉफी कप मधून हिंदळून त्याच्या कपड्यावर सांडली.

"ओह..जय...सो सॉरी.. आपण तुझ्यासाठी एक नविन टी शर्ट घेऊया का?"

"नो थँक्स..." असे म्हणून त्याने सांडलेल्या कॉफी च्या इथे थोडे पाणी लावले..

नमिता सुदधा हे सगळे बघत होती तिने विहान कडे पाहिले तर त्याने नजरेनेच "चालू दे त्यांचे" असे म्हणाला.

विहान कॉफी झाल्यावर सगळ्यांना घेऊन साडी शॉप ला गेला.
तिथे साड्या पाहणे चालू होते...नमिता आणि निशा दोघी साड्या बघत होत्या...
निशाने जय ला इंप्रेस करायला मुद्दाम "जय हा रंग कसा आहे?" असे ती विचारात होती तर तो काहीच बोलत नव्हता.

"दी, ही बघ आकाशी रंगाची साडी किती सुंदर आहे.." नमिता म्हणाली

"अरे जय तुझा हा फेव्हरेट रंग आहे ना.." विहान पटकन बोलला तसे निशा ने ती साडी पॅक करायला सांगितली.. हे तिघेही तिच्याकडे बघायला लागले ...
निशा फक्त हसली.

"दी..तुला आवडली का साडी..?"
"खूप छान आहे..का ग..?"
"काही नाही...छान आहे साडी...तू पहिल्यांदा असा रंग घेत आहेस ना म्हणून..."
" नमूं, आपल्याला कधी काय आवडेल असे सांगता येत नाही ना..?" ती जय कडे पहात म्हणाली.

जय विहान ला घेऊन तिथून निघाला आणि दुकानाच्या बाहेर आला..."वीरू, मी नसतो आलो तर चालले असते...तुझ्यासाठी मी आलो आणि ही महामाया बघ कसे वागवत आहे मला..हिला थांबाव यार..."

"जय, तुला दिसत नाही आहे का...ती तुझ्याशी बोलायचे प्रयत्न करत आहे..."

"का करत आहे ती असे....तिला जे वाटते ते तिने मी रत्नागिरी मध्ये असताना वागून दाखवले आहे..आता काय मलम पट्टी करते आहे का? ...मला ही खोटी सिपंथी नको आहे...ते ना मला भावनांशी खेळणे वाटते..मी तिला मुद्दाम टाळतो आहे...मला उगाच त्रास होतो या गोष्टीचा..."

"जय तू असा का नाही विचार करत की तिला काही गोष्टींचा प्रश्चाताप होत असेल..."

"कसला प्रश्चाताप...असे असते तर बोलून दाखवले असते तिने...तिला मला हे सांगायचे आहे की, जय तू आणि मी आपण छान फ्रेंडस म्हणून राहुयात..आपले बाकी काही होऊ शकत नाही...पुढे काय झाले नाही तरी चालेल...पण आपण छान फ्रेंड्स राहायला काय हरकत आहे..आता मला सांग..मला तिच्या बरोबर नुसते फ्रेंड्स म्हणून नाही राहायचे आहे...तर मी कशाला तिच्या बरोबर काही कॉन्टॅक्ट ठेवू...सोड ना वीरू...मी तिचा नाद सोडला आहे..."

"मला वाटते जय की तिचा तुझ्यात इंटरेस्ट डेव्हलप होत आहे.."

"या माकडात इंटरेस्ट..? सॉरी नॉट ओन्ली माकड, चिंपांझी, ओरंगुटन, गोरिला अजून काय काय.."

"सोड ना जय, तू अजून कशाला धरून ठेवले आहेस..."

"मी नाही धरले.. त्या बोलण्याला ही नाही आणि त्या मुलीला पण नाही..."

विहान ने जय च्या खांद्यावर थोपटल्या सारखे केले..
तेवढ्यात सगळे जण दुकानाबाहेर आले..

"सगळी शॉपिंग चे पॅकिंग चालू आहे.…तोपर्यंत आपण जेवण करून घेऊयात..." तिचे बाबा म्हणाले..

तिथे जवळच प्युअर व्हेज डायनिंग हॉल होता तिथे सगळे जण जेवायला गेले..

जेवताना सगळ्यांच्या छान गप्पा सुरु होत्या.. निशा चे लक्ष जयकडे आहे हे विहान आणि नमिता च्या लक्षात आले होते...

"दी..तू जय कडे का पाहत आहेस सारखे..?" नमिता ने तिच्या कानात हळूच विचारले....

"तुझ्या लक्षात आले का..." निशा एकदम चपापात म्हणाली.

"दी, बहुतेक तूला सोडून सगळ्यांना कळत आहे.."

"त्या येड्या जय ला कुठे कळत आहे पण...?" ती मान डोलवत म्हणाली..

"दी, तू आधी जय ला हर्ट केले आहेस...आता त्याला पहिल्यांदा नॉर्मल तर कर त्याशिवाय तो तुझ्याशी नीट कसा बरं वागेल?"

"मी ट्राय करत आहे नमु, मला जे जमत आहे ते मी सगळे करत आहे..पण त्याला काही आवडत नाही आहे..."

"आपले जेवण झाल्यावर तू एकदा विहानशी बोलून घे..तो तुला मार्ग सांगेल नक्की.."

बासुंदी खात खात तिने मान डोलावली, त्या बासुंदी ची चव तिच्या मनाच्या विचारात पोचली होती.

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all