मिस्टर आणि मिसेस :- भाग 24

Vihan Helps Jay To Know His Feelings About Nisha


ट्रेन ने रत्नागिरी स्टेशन सोडले तसे दरवाज्यातून आतमध्ये येऊन जय, विहान च्या बाजूला येऊन बसला.
तो बसला आणि त्याने सुस्कारा सोडला..

त्याचा सुस्कारा ऐकून नमिता त्याच्याकडे बघायला लागली ...या क्षणाला तो खूप वेगळा भासत होता. नेहमीच माकड चाळे करणारा, हसणारा आणि हसवणारा जय एकदम शांत बसून होता.
तिने नजरेनेच विहान ला "काय झाले?" असे विचारले तेव्हा बघतो असे त्याने खुणावले.

" जय, कसा गेला आजचा दिवस?" विहान ने बोलण्याला सुरवात केली.
"चांगला गेला" इतके बोलून तो पुन्हा गप्प झाला.
"तुला आम्ही आणले हे चांगले केले ना..?"
"का असे विचारत आहेस? "
"तू सकाळी ट्रेन पाहून नाचला होतास जय आणि आता बघ जरा तुझ्याकडे.."
तो उदास हसला..
"तुला काय वाटते, तू आणखी थांबायला हवे होते का आज?"
"नाही विहान, बरेच झाले थांबलो नाही"
"का रे..."
"जिथे आपल्याला किंमत नाही तिथे न थांबणे चांगलेच..."

विहान काहीच बोलला नाही...
नमिता ने जयच्या खोड्या काढायचा प्रयत्न केला पण तो थोडासा हसायचा आणि बाहेर बघायचा..

इकडे निशा ला जयचे असे शांत असणे, थंड नजरेने बघणे हे तिच्या मनाला लागले होते.
आपल्याच विचारात ती केव्हा घरापर्यंत पोचली तिला कळलेच नाही.
आतापर्यंत गेलेला वेळ आणि या क्षणीची शांतता यात तिला खूप तफावत जाणवत होती. आज पहिल्यांदा तिला एकटेपणा जाणवत होता आणि ती शांतता खायला उठली होती. मनाच्या कोपऱ्यात खूप रिकामे, रिकामे असे वाटत होते, आणि त्या क्षणी जय चे ते वागणे आठवत होते.
बेडवर धपकीने अंग टाकून ती वर फिरणाऱ्या पंख्याकडे बघत होती.

यांच्या ट्रेन मध्ये एव्हनिंग स्नॅक्स विहान ने ऑर्डर केले...
फ्रेंच फ्राईज, कचोरी आणि खारी पॅटिस ! जय घे...सगळे तुझे फेव्हरेट आहे" विहान म्हणाला.

जय फक्त हसला.

नमिता ने मोबाईल मधून त्यांचे आजचे काढलेले फोटो ओपन केले आणि ती मुद्दाम जय आणि विहानला निशा चे फोटो दाखवत होती.

फोटो बघताना त्याची नजर स्थिरपणे एकटक तिला बघत होती तर त्याचे चेहऱ्यावर असलेले हावभाव हे दोघे टिपत होती.
आज ते दोघेही फक्त जयसाठी आलेले होते त्यामुळे ते त्याच्याशीच याबद्दल बोलत होते.

"जय काय झाले आहे आज ? तू असा अजिबात शोभत नाही. तुझे सतत बोलणे हे जिवंतपणा वाटते पण ही शांतता खायला उठते आहे. बोल !" विहान त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ खेचल्यासारखे करत म्हणाला.

"काही नाही रे...आपण कितीही छान असलो तरी प्रत्येकाला आवडतो असे थोडीच असते..?" इमोशनल होत जय म्हणाला.

" कोण म्हणत असे..?"
"आता बघ ना..मी कसाही वागलो तरी निशा च्या दृष्टीने मी एक माकडच ना.."

"अरे सोड ते, असे वाटून घ्यायचे नसते आणि आपण स्वतःची ओळख विसरायची नसते ती साबीत करायची असते."

नमिता शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती, आज तिला हवे होते की जय आणि विहान मध्ये संवाद व्हावा..

"ओके...सोडले ते...हा जय खूप खुश आहे कारण माझ्या विरुचे लग्न होणार आहे...तो सेटल होणार आहे..मला आनंद आहे... नमिता, तु माझ्यासाठी वीरू साठी खरंच छान आहेस...

"तू याला वीरू का म्हणतो रे..?" नमिता मुद्दाम विचारत होती.

"का म्हणजे...शोले आम्ही 16 वेळा एकत्र पाहिला आहे...मी जय हा वीरू... .आणि हा शोले आमच्या बाबतीत खरा ठरतोय..." तो हसत म्हणाला.

"ते कसे काय.."

"शोले मध्ये पण जय ला कोणी मिळाले नाही आणि इथेही असंच होणार असे दिसतंय " त्याने वर पहात हात हलवले...

"ए चल..काय उदास होतो...सांग मला...तुला दी आवडली का खूप..?"

" खरं सांगू....निशा भेटल्यानंतर मलाही वाटायला लागले की मी पण आता सेटल व्हावे. निशा खरच छान आहे.."

"तुझे तिच्याबद्दल पक्के आहे का?" विहान म्हणाला..

"माझे पक्के आहे रे... पण तिला मी आवडत नाही आणि मलासुद्धा स्वतःला कोणावर लादायचे नाही. पण हे मान्य, आयुष्यात पहिल्यांदा मला मनापासून कोणी तरी आवडले."

"तू बोल दिया ना जय...अब ये तेरा वीरू कब काम आयेगा. तू नॉर्मल राहा बघू, तू खोड्या काढणारा हसवणाराच चांगला वाटतो, हो ना नमु?"

"हो ना! मी सुद्धा तुला आधी चुकीचे समजले होते पण आता तर तू मला मनापासून आपला वाटतोस" नमिता त्याला म्हणाली आणि त्याला मस्त हायफाय दिले तसे त्याचे दात दाखवत तो हसला.

त्याने कॉफी मागवली... गरमागरम कॉफीचे घोट घेत त्याने नमिता, विहान ला चिअर्स असे केले आणि नॉर्मल गप्पा मध्ये तो सामील झाला.

11.15 वाजता ट्रेन दादर स्टेशन ला पोचली.
विहान ने कॅब बुक केली, जय आणि त्याने तिला अंधेरी ला ड्रॉप केले आणि पुढे ते बोरिवली ला आले. बराच उशीर झाला होता त्यामुळे बाहेरूनच जय त्याच्या घरी दहिसरला निघून गेला.

घरी पोचल्यावर विहान ने निशा ला " आम्ही सगळे नीट पोचलो घरी "असा मेसेज केला त्यावर तिने "ओके" रिप्लाय केला.

जय घरी पोचला आणि चेंज करून बेड वर बसला. हातात मोबाईल घेतला तर निशा च्या नंबर वरून मेसेज आला होता

"हाय...घरी पोचलास का?"

"हो... " म्हणून जय ने रिप्लाय केला.

"तू निघताना बोलला का नाहीस माझ्याशी? रागावला आहेस का ?"

"नाही असे काही नाही" त्याने तुटक उत्तर दिले..

"आपले फोटो पाहिलेस का खूप छान आले आहेत"
"हो " तो जेवढ्यास तेवढे बोलत होता.

"आजचा दिवस माझ्यासाठी छान होता जय."

"छान, चल,बोलू नंतर,गुड नाईट!"
"गुड नाईट" त्याच्या या तुटक पणाने ती थोडी चकित झाली होती.

सकाळी सकाळी नमिता चा फोन वाजला.
"काय दी, झोपू पण देत नाहीस" तिच्या फोनने जागे होत नमिता म्हणाली.

"ए घोडे, 8 वाजलेत.… पहाट नाही आहे आता आणि मी थोड्या वेळाने ऑफिसमध्ये जाईन."

" जा की मग..बाय"
"अगं नमूं ऐक ना"
"बोल दी.."

"काल जय काही बोलला का माझ्याबद्दल"
आता नमिता उठून बसली. " दी काय म्हणालीस"

"जय.. तो म्हणजे काही बोलला का माझ्या बद्दल??"
"तू जय बद्दल बोलते आहेस दी?"

"हो...मी जय बरोबर रूड वागले का गं खूप?"
"नुसती वागली नाहीस तर तू त्याला वाटेल ती नावे पण ठेवली आहेस.."

"हो...पण ते न मला.. म्हणजे.."

"दी, तुला सॉरी वाटत आहे का त्याबद्दल?"
"हो "
"मग बोल त्याच्याशी,तो चांगला आहे"

"हो मला वाटते की मी ते करावे....आणि...."
"आणि काय दी..?"

"काही नाही मला थोडावेळ हवा ..."
तसे नमिता च्या काही लक्षात आले आणि ती म्हणाली, "नक्की काय दी....?" तसे निशा हसली आणि फोन ठेवला.

नमिता ने लगेच विहान ला फोन लावला, " विहान"
"गुड मॉर्निंग,बोला मॅडम सकाळी सकाळी खुष वाटते आहेस"
"विहान ऐक ना, दी चा कॉल आला होता"
" काय म्हणाली?"
"मला वाटते आहे की दी च्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे..."
"कोणाबद्दल?"अधीरतेने विहान ने विचारले.
"आपला जय रे!"
" मस्तच!"तो म्हणाला तसे नमिता ने त्याला काय बोलणे झाले ते सांगितले.

"नमु, आपण आत्ता अजिबात काही बोलायला नको..त्यांचे त्यांना ठरवू दे...त्यांना काय करायचे आहे ते आपल्याला कळेलच..तू विषय पण काढू नकोस..."

"ठीक आहे...ऐक ना...."

"काय...?"
"आज भेट ना मला..."
"नमु, काल अख्खा रविवार आपण एकत्र होतो थोडे काम पण करू दे ना मला.."

"कर की काम, की कुठे नाही म्हणते...संध्याकाळी भेट..."

"ऐ बाई..."
"कोण बाई.."
"सॉरी..ए मुली...तुला भेटायच्या नादात मी आजकाल घरी उशिरा जातोय..आई काही म्हणत नाही म्हणून ठीक आहे...पण मला काहीतरी बघितले पाहिजे ना..."

"बघ ना मग काय करता येईल ते..."

"बघणारच आहे आणि तेच करणार आहे.."
"काय...?"
"एका मुलीला कायमचे घरी घेऊन येणार आहे..म्हणजे मी तुला पण भेटेन आणि घरी लवकर पण येईन..."

"ईश्श... विहान.."

"काय ईश्श... लग्न करायचा विचार आहे ना...का बदलला?"

"दुष्ट.. असे बोलावते तरी कसे तुला विहान ...?"
"कसे म्हणजे..तोंडाने..." तो हसत म्हणाला..

"त्या तोंडाला बंद करायचा मार्ग आहे माझ्याकडे..." ती मिश्कीलपणे म्हणाली...

"आणि तो मार्ग काय आहे..?"त्याने अधीरतेने विचारले..
"तू भेट मग सांगेन..."
"सांगेन का करून दाखवेन...?" त्याने अजून ताणत विचारले..
"आधी भेट तर..मग पुढचे..." ती खदखदुन हसत म्हणाली..

"हा मार्ग नक्की कोणता हे जाणून घेण्यासाठी तरी भेटले पाहिजेच..." तो आवाजात सॉफ्टनेस आणत म्हणाला..

"मग आज संध्याकाळी...6.30 वाजता..स्टारबक्स, इंफिनिटी ला..."
"येस मॅडम..."
तिने हसत फोन ठेवला तेव्हा तो आज यायला उशीर का होणार याचे आईला कारण काय द्यायचे हे शोधण्यात मग्न होता...!

दिवसभरात जयच्या मोबाईल वर चार वेळा सॉरी चा मेसेज आला होता.. त्याने एकदाही रिप्लाय केला नव्हता आणि आत्ता फोन वाजला...
त्याने फोन कट केला..परत आला आणि परत त्याने कट केला...

थोड्या वेळाने विहान चा कॉल आला त्याने लगेच उचलला..."बोला प्रेमवीर...काय म्हणताय...?" त्याने विहान ला विचारले...
विहान ने मल्टी कॉल सुरू केला..
"जय, निशा आहे कॉल वर...तू फोन उचलत नाही म्हणून तिने मला कॉल केला आहे..."

"विहान, ज्या मार्गावर जायचे नाही ती बस कशाला पकडायची..? मला काहीच बोलायचे नाही या विषयाबद्दल... तुला काही दुसरे बोलायचे असेल तर सांग नाहीतर मी फोन ठेवतो... "

त्याच्या या बोलण्यावर विहान शांत बसला तर निशा काही बोलूच शकली नाही...
कोणी काहीच बोलत नाही पाहून जय ने कॉल कट केला होता..!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all