Oct 31, 2020
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेम कथा)

 (नामसकार वाचकांनो...ही माझी पहिलीच प्रेम कथा आहे...ह्या कथे मधील सगळीच पात्र काल्पनिक आहेत..मझी सगळ्या वाचकांस नम्र विनंती आहे..तुम्ही ही कथा वाचावी... आणि ही कथा आवडल्यास तुमचे मनोगत व्यक्त करावे... धन्यवाद)


पार्ट-1

आई (मधु):करुणा बाळा अग दार उघड बघु. आज 2 दिवस झाले तु दार नाही उघडले...असा नाही वागत बाळा...तु शाणी आहेस ना बाळा. चल उघडं दार बघु(आई साडीचा पदर डोळ्यांना लावुन आलेले पाणी पुसत बोली)

बाबा(दत्तात्रय):करुणा हे बघ मी आज काय आणलं आहे माझ्या पिल्लासाठी.
सांग पाहु काय गंमत आणली आहे.जाऊदे मीच सांगतो ...आज मी माझ्या बाळासाठी तिच्या आवडीचा खाऊ आणला आहे ओळख पाहु काय आहे ते(आतुन कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने बाबा पुन्हा बोलू लागले)जाऊदे मीच सांगतो ... मी आणला आहे माझ्या बेबी साठी तिच्या आवडीचे गुलाबजाम.चल ये आता ....बाळा ये ना ग...(बाबांनी सुद्धा आता तिला बाहेर बोलण्याचे प्रयत्न सोडुन मधुची(त्यांची पत्नीची समजुत काढुन निघुन गेले)

बाबा:मधु... करुणाला हवा तेवढा वेळ घेऊदे..आपण तिला जबरदस्ती नको करायला पाहिजे.. कारण जे घडला ते आपल्या सगळ्यांसाठी शॉकिंग आहे.तू पण तिला समजुन घे...आणि तिला हवा तेवढा वेळ दे

मधु(पत्नी):तुम्ही म्हणतायत ते योग्य आहे...परंतु ती अशी स्वतःला किती दिवस बंद ठेवणारे...

बाबा(दत्तात्रय):मी तुझ्या मनाची घालमेल समजु शकतो... पण एक विचार कर..आपल्या दोघांशिवाय आहे तरी कोण तिला समजुन घ्यायला...जर...आपणच असे वागलो तर कसा चालेल...

आई(मधु):बरोबर आहे तुमचं मी नक्की प्रयत्न करेन

@@@@@@@@@@@@@@@

आज तीसरा दीवस तरी पण करुणा
ने दार उघडलं नसतं...

असं काय घडलं तिच्या आयुष्यात चला मग जाणुन घेऊया...

@@@@@@@@@@@@@@@

करुणा:हॅलो ध्रुवी झाली का ग तुझी उदयाची साडी डे चि तयारी

ध्रुवी:नाय ग ..अजुन साडी चा पत्ता नाय...बाकीचा कसा होईल देव जाणे

करुणा:(हसतच बोलते)माझी सगळी तयारी झालीये.उद्या बघ मला मी कशी दिसते ते(मुद्दामुन ध्रुवी ला चिडवण्यासाठी बोलत असते)

ध्रुवी:तु मैत्रीण आहेस का दुश्मन.. माझी मदत करायचा सोडुन जोर जोरात हसतेस...

करुणा:सॉरी यार...मुदाम चिडवण्यासाठी हसले ग...अच्छा एक काम कर तू सकाळी लवकर माझ्या घरी ये आणि बघ माझ्या कपाटात कोणती साडी आवडते का...

ध्रुवी:अरे हो रे मी तर विसारलेच होते तुझ्या कडे तर स्टॉक असेना मोठा भरलेला...कारण तुझ्या वडिलांचा तर साड्यांचा बिझनेस आहे ना

करुणा:ये ध्रुवी म्हणुन काय झालं... तुला माझ्या बाबांचा नियम नाही माहीतका की जरी आपलं दुकान असलं तरी पण ते माझ्या आईसाठी दुसऱ्या दुकानातूनच साड्या घेतात...कारण लोकांनी बोलू नयेत.. की ह्यांनी कितीपण साड्या घेतल्या तर काय फरक पडतोय... दुकान आहे त्यांचं स्वतःच... शेवटी कायेणा माझ्या बाबाना त्यांचा स्वाभिमान खुप प्यारा(थोडा हसतच बोलते.)

ध्रुवी:हो ते तर आहेच ग...नाहीतर लोक एकदा बोलायला लागलेना मग बघत नी मागे पुढे...अच्छा ऐकणं उद्या तु शार्प 11 ला पोहोचशील ना म्हणजे म्हणजे बाकीच्या प्रोग्रामचिपन तयारी बघायची आहे ना...

करून:अरे हो..वेडा बाई मी नक्की येईन वेळेत ओके ...चल मग बाय...गुड नाईट... सी यु टुमारो
ध्रुवी:ओक चल बाय गुड नाईट
@@@@@@@@@@@@@
कारुणा दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठुन तयारीला लागली..आज साडी डे आहेना तिचा

करुणा:अग आई जरा मला मदत करणा बघावा तेव्हा किचन मध्ये असतेस...तुला महितीयेणा आज माझा साडी डे आहे(जरा नाराज होतच बोली)

आई(मधु): काय आहे सकाळी सकाळी... ह्या मुलीचा... नेहमीचा प्रॉब्लेम..फंक्शन ह्या मुलींचा आणि कामाला आम्हाला लावायचा... दे इकडे तुझी साडी (आई जरा हलक्या रागातच बोली)

करुणा हसत हसत आईचे गाल ओधु लागली...आणि मधीच आईची समजुत काढु लागली
आईला सुद्धा तिचा असा मनवन आवडायचा...म्हणुन तर मुद्दाम रागवायची

आई: झाली एकदाची तयार ...बघु बरं काशी दिसते आमची बाबु
करुणाला बघुन नकळत का होईना आईच्या डोळ्यात पाणी आलं...आणि मनातच बोलु लागली... किती मोठी झाली आमची चिऊ... दिवस किती लवकर जतातना... कळतच नाही... एवढीशी होती...जेव्हा तिला...आणि अचानक आईने मनातुन आलेले विचार झटकुन टाकले...(काय नेमका होता आईच्या मनात)
आई.... आई...अगं आई...(करुणाच्या आवाजाने आई तंद्रीतुन बाहेर आली)

आई:हा बोल ना बाळा

करुणा:आगं कसला विचार करतेस एवढा
सांगना मी कशी दिसते...आज मला सगळ्यात भारी दिसायचंय

आई: (मुद्दाम चिडवण्यासाठी)बाबु तू ना ही साडी ना घालायलाच नव्हती पाहिजे...हा रंग तुला खुलुन नाय दिसत..(मुद्दामुन चेहऱ्यावर नाराजगीचे भाव आणत)

करुणा: काय? अगं... आई तू आशिकाय बोलतेस... अगं तुच तर दिलीस ना मला ही साडी... आणि आता बोलतेस की साडी शोभत नाय...आता मी काय करु... मला आधीच खुप उशीर होतोय...त्यात तु अशी बोलतेस...(करुणा जरा नाराज होतच बोलते)

आई:(आईला तिची अवस्था बघुन जोरात हसायला येतं... अगं माझं पिल्लु मी तुझी मस्करी करत होते...आज माझं बाळ खुपच सुंदर दिसतंय बरका... जसं राजकुमार्यांच्या कहाणी मध्ये असते ना एकदम तशीच

करुणा:अरे वा आई तु पण माझ्या बरोबर मस्ती करायला शिकलीस वा...दोघीपन खळखळून हसल्या...आणि करुणा निघाली कॉलेज ला...

@@@@@@@@@@@@@@@

आता आपण पाहुया पुढे काय होतंय ते पुढच्या भागात

@@@@@@@@@@@@@@@

कशी वाटली तुम्हाला माझी स्टोरी नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे