मिशन साफसफाई

घर ज्याच्या नावावर त्यानेच साफसफाई करायची
दिवाळी जवळ आली की छान छान फराळ करायचा.. नुकतीच गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली असते. तेव्हा मऊ मऊ गोधडी घेउन झोपी जायचं मन करत असत.. तेंव्हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करायचं म्हणुन उठायच्या.. छान सुगंधी उटणे लावून.. सुगंधी तेलाची मालिश करायची आणि गरम पाण्याने अंघोळ करायची.. नवीन कपडे घालायचे..
आणि पहिला फटाका फोंडण्याचा मान पटकावयाचा..
असं रम्य ते बालपण...

काय सुंदर दिवस होते ना ते.. पण आपण मोठे झालो आणि त्या दिवाळीची मज्जा तिच पण त्या आधी एक जबाबदारी अंगावर पडली.. ती म्हणजे घरातली साफसफाई करण्याची ..

लग्नाच्या आधी जेव्हा शिकायला हॉस्टेल मध्ये होतो.. तेव्हाची गोष्ट.. दिवाळी जवळ आली की... परीक्षा संपली की सुट्टी पडायची.. घरी जायचं.. आईच्या हातचं मस्त पैकी फराळाच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा.. इतकचं.. काय दिवस होते ते.. हा आता त्या वेळी आईला मदत म्हणून भिंती पुसून देणं.. खिडक्या.. पंखे पुसून देणं.. वरच्या माळ्यावर असलेल्या वस्तू काढून देणं.. वगेरे काम करावी लागायची.. पण ते चालत होत .. आईला चिडत सांगितलं जायचं..

"काय ग आई.. मी दोन दिवस सुट्टी एन्जॉय करायला येतो
आणि तू काय मला काम करायला लावते..?.."

" आता तु उंच आहेस.. म्हणून सांगते ना.. " आई

" म्हणुन काय मी तुझ्या हाताखाली काम करणारा बारक्या आहे का..?.."

" आता बोलत आहेस.. पण उदया लग्न झालं की.. बायकोच्या हाताखाली बरा काम करशील.. काचकूच न करता..?.."

" मी कशाला काम करु.. ती तिची तिची काम करेल.."

" हम्म.. आता मोठया तोऱ्यात सांगत आहेस.. मी पण इथेच आहे.. आणि तु पण.. बघु तु काय करतो.. काम करतो.. की आता करतो तशी चिड चिड करतो.."

" बघच तु.."

" हो.. हो.. बघतेच आहे.. बर आता जास्त बडबड करू नकोस.. तो कोपरा पुसून झाला की दोन्ही खोल्यांचे पंखे पण पुसून घे... आणि वरच्या मळ्यावरच्या खोक्यातला चकलीचा सोऱ्या पण काढून दे.." असं म्हणत आई ने त्याला अजून दोन काम सांगीतली आणि ती आत निघुन गेली..

" आणि हो ss.. एक सांगायचं विसरले.. जे सामान काढशील ते पुन्हा जागेवर ठेऊन दे.."

आई हे सांगायला परत आली आणि पुन्हा किचन मध्ये निघुन गेली.. सौरभ आपला आईच्या म्हणण्याप्रमाणे सगळं आवरत बसला.

आता लग्न झालं.. तर नोकरी निमित्त.. आपल घर.. गाव.. सोडून शहराची वाट धरली.. संसाराची जबाबदारी अंगावर पडली.

"अरे सौरभ ... तो कोपरा पुसून झाला की दोन्ही खोल्यांचे पंखे पण पुसून घे... आणि वरच्या मळ्यावरच्या खोक्यातला चकलीचा सोऱ्या पण काढून दे.."

आताही तोच डायलॉग ऐकत.. भूत काळातली आठवण आठवत .. तो उंच स्टूलावर उभा होता.. खांद्या वर एक मळका टॉवेल घेउन.. हातात झाडू घेऊन.. साफसफाई करत होता. आणि प्रतिक्षाच्या आवाजाने आठवणीतून जागा झाला.

" अरे सौरभ.. काय करतो तु.. वरती स्टूल वर उभा राहून कसल्या विचारात आहेस.." प्रतीक्षा त्याला विचारत होती.

" अग हो ग.. करतो आहे ना काम.. एक दिवस सुट्टी आहे.. ती पण एन्जॉय करू देऊ नको.."

" तु चिड चिड करू नको.. मी पण कामच करत आहे ना.." प्रतीक्षा चिड चिड करत म्हणाली.

" बर.. चिडू नको.. मी करतो.. हे सगळं.. तो पर्यंत तु मला मस्त पैकी फक्कड चहा करून दे ना ...!.." सौरभ तिला लाडी गोडी लावत म्हणाला..

" सौरभ हा तिसरा कप आहे सकाळ पासूनचा.." ती एक हात कमरेवर ठेवून त्याला विचारते.

" ए .. मी करतो आहे ना हे काम.. मग तू दे ना चहा करून... म्हणजे काम करायला जरा एनर्जी मिळेल." सौरभची लाडीगोडी..

" बर.. करते.. इतका काही मसका लावायची गरज नाही.." ती त्याच्या आर्जवाला बघुन पाघळते.

" तु हे सगळं आवर.. तो पर्यंत मी चहा करून आणते.."

अस हसत म्हणून ती चहा घेऊन येते काही वेळात.. दोघ मिळून चहा पितात.. तो पर्यंत सौरभ ने पंखा पुसून घेतला होता.. आणि आता तो कपाट उघडून पुसत होता.

" ओ.. सौरभ.. यू आर सो स्वीट... तु प्लिज मला हेल्प कर ना.. मी फराळ बनवत आहे.." ती चहा पिता पिता म्हणाली.

" थँक्यू.. चहासाठी.. मला याची गरजच होती.." तो म्हणाला..

" तु खुप छान.. नी .. स्वच्छ काम केलं आहे.." ती त्याचं कौतुक करत म्हणाली. त्याने पण हसुन ते मान्य केलं.

" खरं तर त्या व्हॉट्स ॲप वरच्या व्हायरल मॅसेजला थँक्यू म्हणायला हवं.."

" कोणत्या..?.."

" ज्याच्या नावावर घर त्यानेच साफसफाई करायची.. ते.." ती हसुन म्हणाली.. तो पणं हसला..

" बरं मला जरा तो वरच्या खोक्यातला चकलीचा सोऱ्या काढून दे ना.." ती चहाचे रिकामे कप उचलत म्हणाली..

" हो.. लगेच देतो.."
त्याने त्या उंच स्टूल वर चढून तिला चकलीचा सोऱ्या काढून दिला..

" थँक्यू... हा बॉक्स परत जागेवर ठेवून दे.."

ती आनंदात तो सोऱ्या घेऊन किचन मध्ये गेली. तो पर्यंत सौरभ ने वरच्या माळ्यावरची खोकी खाली काढलीं होती. सगळा माळा पुसून स्वच्छ केला होता. कपाटातील सामान पण बाहेर काढून ठेवलं होत. कपाट पण स्वच्छ केली होती. त्याने तो चकलीचा सोऱ्या असलेला बॉक्स परत जागेवर ठेवून दिला होता.

आता तो निवांत पणे सोफ्यावर बसला होता.. पाणी पित होता. त्याचं काम होई पर्यंत तिने चकलीचा पहिला घाणा तळला होता. कौतुकाने तिने त्याला एका डिश मध्ये टेस्ट करायला आणून दिल्या.

" वा.. छान झाल्या आहेत.. एकदम उत्तम .!.."

तो चकलीचा तुकडा खात म्हणाला. ती आत निघुन गेली. त्याने डिश मधील सगळ्या चकल्या संपवल्या. आणि फ्रेश व्हायला गेला.. गाण गुणगुणत तो त्याचं आवरत होता. त्याने त्याचं आवरलं.. आणि गाडीची किल्ली खिशात ठेवली.

" प्रतिक्षा.. माय डार्लींग .. मी जरा बाहेर जावून येतो.." किचनच्या दरवाज्यात उभा राहून तो तिला म्हणाला. ती चकल्या बनवण्यात बिझी होती.

" अरे.. कुठे चालला आहेस..? ." ती त्याचं बोलण ऐकुन त्याच्या कडे वळुन बघते.. तर हा फ्रेश होऊन मस्त पैकी तयार झाला होता.

" अरे हे काय.. तु फ्रेश होऊन पण आला.. तुझ आवरून पण झालं इतक्यात.. साफसफाई झाली पण..!.." ती आश्चर्याने विचारते.

" हो मग.. साफसफाई.. झाली.. सगळं काही घासून पुसून स्वच्छ केल आहे.. एकदम लख्ख.. चकचकित केल आहे बघ.." तो हॉल मध्ये जात म्हणाला. ती पण त्याच्या मागे गेली.

त्याने हॉल मध्ये वरची कपाट आवरायला काढलीं होती. सगळं आवरून ठेवायला . तिच्या अजुन चकल्या पण झाल्या नाहीत.. आणि याच सगळं आवरून झालं.. ते पण इतक्या कमी वेळात..!.. कस काय शक्य आहे..!

याच विचारात ती त्याच्या मागे चालत हॉल मध्ये आली.

" सौरभ.. हे सगळं काय आहे..!.."

" तु म्हणाली ना.. घर ज्याच्या नावावर त्यानेच साफसफाई करायची.. मग मी केली की साफसफाई.."तो हातातली किल्ली बोटावर फिरवत कुल अंदाजात म्हणाला.

" मग हे सगळं बाकीचं काम कोण करणार..?.." ती धास्तावलेल्या आवाजात विचारते.

" तु मला साफसफाई करायला सांगीतलं होत. घर लावायला नाही.

साफसफाई करायचं काम माझं होत. ते मी केल. आता ते सगळं लावायची जबाबदारी तुझी..

तु आहेस माझ्या घराची स्वामिनी.."

सौरभ म्हणाला.. आणि तिच पुढचं बोलणं न ऐकता दरवाज्याच्या दिशेने पळून गेला. आणि प्रतिक्षा समोरच दृश्य बघून मटकन खालीच बसली.

सौरभ ने साफसफाई करायची म्हणुन कपाटात ठेवलेलं सामान कपाटातून बाहेर काढलं होतं. कपाट झाडून पुसून स्वच्छ केली होती. पण बाहेर काढलेल सामान परत जगाच्या जागी लावलं नव्हत.. हॉल मध्ये पसारा होता. फक्त भिंती खिडक्या कपाट पुसून स्वच्छ केली होती.. बाकी काहीही नाही.

" सौरभ.. मग हे सगळं जागेवर लावयच काम कोण करणार..?.." ती चिडून त्याला विचारते.

" घराची साफसफाई करायच काम माझं.. आणि ते सगळं जागेवर लावायच काम तुझं.." तिचा चिडलेला आवाज ऐकुन तो जागेवरच थांबला.. आणि तिच्या कडे बघून म्हणाला.

" तु मला साफसफाई करायला सांगीतलं होत. काढलेलं सामान परत ठेवायला नाही.."

" सौरभ sss.. साफसफाई म्हणजे फक्त झाडण.. पुसण .. इतकच नसत रे..

काढलेलं सामान परत जागाच्या जागी लावणं पण आवश्यक असत रे..

सौरभ.. हे सगळं जागेवर ठेऊन जा ss..!.." प्रतिक्षा जोरात ओरडत म्हणाली.

पण ते ऐकायला सौरभ तिथे थांबलाच नव्हता. तो कधीच पार्किंग लॉट मध्ये पोचला होता... आणि प्रतिक्षा त्याच्या नावाने ओरडत.. हा सगळा पसारा कसा आवरायचा.. याचा विचार करत बसली होती..

सौरभ तर प्रतिक्षाच काम वाढवून निघुन गेला. पण तो पर्यंत प्रतिक्षा काय करेल..?. सौरभ घरी परत आल्यावर काय होईल..?..

एक सूचना..
अस वागल्यास परिणामाची जबाबदारी त्या व्यक्तीची असेल..

सौरभ घरी आल्यावर काय चित्र असेल घराचं..?
कॉमेंट करुन सांगा..

--------------------------------------------------------------