मिशन मुंबई (भाग-७)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-७)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, सिड च्या बुटांच्या सोल मधून मेमरी कार्ड मिळालं आहे आणि एक कोड मिळाला आहे.... आता पुढे...)
***********************
"सर! आपण अजून ती बॅग चेक केलीच नाहीये... एवढ्या सगळ्या गोंधळात ती बॅग तेवढी तपासायची राहिली! त्यात जर या कोड बद्दल काही समजलं तर?" अभिषेक म्हणतो. 

"येस! हे तर डोक्यातून गेलंच होतं! सोनाली ती बॅग घेऊन ये.... बघूया तरी तपासून..." सुयश सर म्हणतात. 

सोनाली बॅग घेऊन येते..... सुयश सर बॅग ओपन करतात... त्यात मुंबई चा नकाशा, खूप ठिकाणचे फोटो आणि बऱ्याच माणसांचे सुद्धा फोटो असतात... 

"हे काय असेल सर? नकाशा वर कुठे मार्किंग नाहीये, मुंबई च्या जवळ जवळ सगळ्याच ठिकाणचे फोटो आहेत आणि हे माणसांचे फोटो आहेत ते सुद्धा गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या न कळत काढल्यासारखे आहेत..." सोनाली म्हणाली. 

"बहुदा आत्ता जो बॉम्ब असेल तो पूर्ण शहर उध्वस्त करू शकेल म्हणून सगळे डिटेल्स असतील यात.... आणि कदाचित म्हणूनच त्या निनामी माणसाचा फोन आलेला तेव्हा एवढ्या कॉन्फिडन्स ने तो बोलत होता..." विक्रम म्हणतो. 

एवढ्यात गणेश आणि निनाद फॉरेन्सिक लॅब मधून येतात आणि डॉ. विजय नि जे काही सांगितलं ते सांगतात... 

"आणि हा सर हि चिप सिड च्या बुटांच्या सोल मधून मिळाली." निनाद ती चिप सुयश सरांच्या हातात देत म्हणतो. 

सुयश सर ती चिप कार्ड रीडर मध्ये घालून ओपन करतात.... पण, ती पासवर्ड Protected असते! 

"गणेश! एका एक्सपर्ट ला बोलावं! तोच पासवर्ड क्रॅक करेल. उगाच चुकीचा पासवर्ड टाकला आणि चिप ब्लॉक झाली किंवा सगळा डेटा उडाला तर पंचाईत नको." सुयश सर आदेश देतात. 

गणेश एखाद्या एक्स्पर्टशी कॉन्टॅक्ट करायला जातो.... सगळे पुन्हा त्या ठिपक्यांच्या रुपात मिळालेल्या क्लु चा विचार करत असतात...

"सर! समजला क्लु... मला आत्ता लक्षात आलं, हि ब्रेल लिपी आहे.... मी काही वर्षांपूर्वी एकदा अंध शाळेला भेट दिली होती तेव्हा तिथे असे चार्ट पाहिले होते...." विक्रम घाई घाईत बोलतो. 

"ओके गुड! एक काम कर, नेट वरून एक अल्फाबेट्स चा चार्ट काढ त्यातून आपण हे कोड जुळवूया..." सुयश सर सांगतात. 

विक्रम नेट वरून ब्रेल लिपीचा चार्ट काढतो.... तो बघून सुयश सर बोर्ड वर एक एक अल्फाबेट लिहितात... कोड तयार होतो; 'GATE IN' 

"आता या गेट इन चा काय अर्थ आहे?" निनाद विचारतो. 

"कदाचित गेट वे ऑफ इंडिया?" सोनाली म्हणते. 

"असेलही..... कोणी कोड क्रॅक केला तरी पटकन कळू नये म्हणून असं अर्धचं लिहिलं असेल...." विक्रम सोनालीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणतो. 

इतक्यात गणेश ने बोलावलेला एक एक्स्पर्ट येतो.....

"जय हिंद सर! मी समीर... कॉम्पुटर एक्स्पर्ट... गणेश ने मला इथे बोलावलं." समीर स्वतःची ओळख करून देत म्हणाला.

"सर! हा माझा बालमित्र... लहानपणापासून याला या सगळ्या गोष्टींमध्ये भारी हौस! आता बघा एक मोठा कॉम्पुटर एक्स्पर्ट बनला आहे." गणेश म्हणाला.

"या Mr. समीर... मुंबई पोलीस तुमचं सहर्ष स्वागत करत आहे..." विक्रम म्हणाला.

"थँक्यू! बरं.. ती चिप कुठे आहे? मी लगेच कामाला लागतो..." समीर म्हणाला.

सुयश सरांनी त्याला ती चिप दिली... समीर ने त्याच्या लॅपटॉप ला ती कनेक्ट करून काही कोडींग करून कसाबसा अर्ध्या तासात त्याचा कोड क्रॅक केला....

"सर! पासवर्ड क्रॅक झाला..." खुर्ची वरून उठत चिप मधला डेटा सुयश सरांना दाखवत समीर म्हणाला.

"थँक्यू सो मच समीर..." सुयश सर म्हणाले. 

"बरं झालं सर, तुम्ही या चिप च्या पासवर्डशी काही छेडछाड नाही केली... जर तुम्ही तीन वेळा चुकीचा पासवर्ड टाकला असता तर एक बॉम्ब फुटण्याची शक्यता होती... या चिप मधला डेटा बघून तरी असंच वाटतंय.... हि चिप साधीसुधी नाहीये... बॉम्ब चा ट्रिगर आहे..." समीर थोडं काळजीत येऊन बोलला. 

"काय? म्हणजे जर पासवर्ड चुकला असता, तर या स्फोटाला पोलिसच कारणीभूत ठरले असते!" सोनाली म्हणाली. 

"हम्म! हा जो कोणी आहे, अगदी फुंकून फुंकून पावलं उचलतोय.... विक्रम बॉम्ब स्कॉट ला बोलावून घे... यात अजून काही डेटा आहे तो बघून निदान बॉम्ब अजूनही जिवंत आहे की नाही ते तरी कळेल..." सुयश सर म्हणाले.

विक्रम बॉम्ब स्कॉट ला फोन करायला गेला...

"ओके सर! माझं काम झालंय... मी येतो आता... पुन्हा मदत लागली तर नक्की बोलवा." समीर म्हणाला. 

"हो! थँक्यू वन्स अगेन..." सुयश सर समीर ला हात मिळवत म्हणाले. 

समीर तिथून निघाला.... थोड्याच वेळात बॉम्ब स्कॉट टीम सिनिअर जय पोलीस स्टेशन मध्ये आला.....

"ये जय... हे बघ या चिप मध्ये काही बॉम्ब च्या निगडित डेटा आहे.... आणि हीच चिप त्या बॉम्ब चा ट्रिगर होती.... जरा एकदा बघून घे..." सुयश सर म्हणतात. 

जय तो डेटा पाहू लागतो.....
"सर! हा खूप डेंजर बॉम्ब आहे... आत्ता जरी तो ऍक्टिव्ह नसला तरी पूर्ण शहर एका क्षणांत उध्वस्त करू शकतो! याचा नक्कीच दुसरा सुद्धा ट्रिगर असणार! आपल्याला लवकरात लवकर बॉम्ब निकामी करावा लागेल... पण, कळणार कसं हा बॉम्ब आहे कुठे?" जय थोडं चिंतेच्या स्वरात म्हणतो. 

"कदाचित गेट वे ऑफ इंडिया ला... लवकर तुमच्या काही तुकड्या तिथे पाठवा आणि सगळा एरिया पिंजून काढायला सांगा त्यांना..." सुयश सर म्हणतात. 

त्यांच्या सांगण्यावरून जय बाकी टीम ला तिथे पूर्ण तयारीनिशी जायला सांगतात... पोलिस आणि जय सुद्धा तिथे पोहोचतात.... पूर्ण जागा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात येत आहे असं सांगून सगळा एरिया रिकामा करतात.... सगळीकडे नीट तपास करताना सोनाली ला एक बाबा गाडी दिसते.... एवढ्या लहान बाळाला कोणी कसं एकटं सोडू शकत म्हणून ती पहायला जाते तर त्यात बाहुली असते! ती पटकन सुयश सरांना फोन करून तिथे बोलावून घेते....

 "सर! या बाहुली मध्ये बॉम्ब आहे..." जय ती बाहुली चेक करून बोलतो.... 

"लवकरात लवकर हा बॉम्ब निकामी कर..." सुयश सर म्हणतात. 

"सर! सॉरी पण, हा बॉम्ब निकामी नाही होऊ शकत..... कितीही काही झालं तरी हा जिवंत बॉम्ब आहे, तो फुटेल तेव्हाच संपेल...." जय सांगतो. 

"ठीक आहे!" असं म्हणून विक्रम जय च्या हातातून तो बॉम्ब घेतो आणि समुद्राच्या दिशेने पळत जातो.... 

सगळे त्याच्या मागे जातात... 
"सर.... तुम्ही थांबा...." निनाद विक्रम ला थांबवत असतो! 

कोणाचंही काहीही न ऐकता विक्रम एका इंजिन  बोटीत जातो.... स्वतः ती बोट चालवत समुद्राच्या मध्य भागी जातो.... 

सगळे इथे किनाऱ्यावर विक्रमच्या काळजीत असतात.... सोनाली आणि गणेश तर अक्षरशः रडत असतात.... एवढ्यात एक मोठा स्फोट झाल्याचा आवाज येतो, लाटा उंच उंच उडतात आणि धूर येताना दिसतो.... आता सगळ्यांचा धीर खचतो.... सगळे विक्रम आता या जगात असेल की नसेल या विचाराने दुःखी असतात... थोड्याच वेळात विक्रम पोहत पोहत येताना त्यांना दिसतो.... सुयश सर आणि निनाद मिळून त्याला बाहेर काढतात.... सगळे आनंदी असतात... विक्रम ला बऱ्याच जखमा सुद्धा झालेल्या असतात... त्याला हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात येतं.... 

एवढ्यात सुयश सरांच्या फोन वर एका प्रायव्हेट नंबर वरून कॉल येतो....
"या वेळी जिंकलास म्हणजे प्रत्येक वेळी जिंकशील असं नाही.... आमच्या गँग च जाळं खूप खोल आणि दूरपर्यंत पसरलेलं आहे... त्यातले दोन तीन विंचू गेले तरी बिच्छु गँग कधीही संपणार नाही.... हा हा हा...." एवढं बोलून फोन कट होतो.

फोन स्पीकर वर असल्यामुळे सगळ्यांनीच हे ऐकलं होतं... 

"याच्या सारखे कित्येक आले आणि गेले जास्त वेळ हा मोकाट नाही राहणार.... आत्ता तरी संकट टळलं आहे.... चला आपण विक्रम ला भेटून येऊ..." सुयश सर म्हणतात. 

सगळ्यांना आता मुंबई वरचं संकट टळलं असतं म्हणून आनंद झालेला असतो! सगळे विक्रम ला भेटायला जातात... सुयश सरांना बघून तो उठून बसत असतो...

"अरे अरे... उठू नकोस... आराम कर.... तुझ्यामुळे आज सगळी जनता सुरक्षित आहे..." सुयश सर त्याला पुन्हा बेडवर झोपवत म्हणतात. 

"तुमच्या कडूनच शिकलोय सर! ड्युटी फर्स्ट... आज थोडक्यात वाचलो... मी जस्ट ती बाहुली पाण्यात उडवली आणि जोरदार स्फोट झाला. पण, सर या मागचा सूत्रधार कोण आहे?" विक्रम म्हणाला. 

"नाही माहित! आत्ता तरी आपण त्यांची नांगी ठेचली आहे... एव्हाना ते लोक देश सोडून पळून गेले असतील... पण, एक ना एक दिवस नक्की ते आपल्या तावडीत असतील." सुयश सर म्हणाले. 

पोलिसांच्या या पराक्रमाचे सगळ्या चॅनल वर रेपोर्टींग गेले... जनतेमध्ये पोलिसांविषयी आदर आणि सन्मान अजून वाढला... शेवटी त्यांनी स्वतःच्या जीवावर खेळून मुंबई ला वाचवलं होतं!
समाप्त.
*********************
(मिशन मुंबई तर यशस्वी झालं..... पण, बिच्छु गँग च जाळं खूप पसरलेलं आहे... त्यांना पकडणं सहज शक्य नाहीये... आत्ता जरी ती गँग शांत झाली असली तरी भविष्यात नक्कीच डोकं वर काढणार.....)

तुम्हाला हि कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा... पुढे येणाऱ्या काही थरारक कथांमधून लवकरच तुम्हाला बिच्छु गँग चा खात्मा पाहायला मिळेल.... 

🎭 Series Post

View all