मिशन मुंबई (भाग-६)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, मॉन्टी ची चौकशी झाली पण त्याने काही या मागच्या सूत्रधाराचे नाव सांगितलं नाही..... आता आपण पाहूया सिड ची चौकशी....)
*************************
विक्रम आणि निनाद चौकशी ला सुरुवात करतात.... 

"बोल! रिपोर्टर च्या नावाखाली हे कोणते धंदे करतोयस?" निनाद सिड ची कॉलर पकडून बोलतो... 

सिड फक्त त्याच्या कडे बघतो आणि एक स्माईल देतो.... बाकी काही बोलत नाही.

"ए बोलतो का देऊ दोन ठेवून?" विक्रम हात उगारून बोलतो.

"कधीच नाही सांगणार! कितीही काही झालं तरी." सिड अगदी मॉन्टी सारखं बोलत असतो.

निनाद आणि विक्रम दोघं मिळून त्याची चांगलीच खातीरदारी करतात..... 

"कितीही मारा! मी जिवंत असे पर्यंत तुम्हाला कधीच कळू देणार नाही आमचा बॉस कोण आणि पुढचा काय प्लॅन आहे..." असं म्हणत तो हसत असतो.

दोघं आता काय करावं हा विचार करतच असतात की अचानक सिड मान टाकतो. त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येत असतं! निनाद आणि विक्रम ला काही कळतंच नाही, नेमकं असं कसं झालं? निनाद त्याची पल्स बघतो..

"सर! He is no more." निनाद म्हणतो.

"काय? कसं? आपण याला एवढं मारलं नाहीये कि हा मरेल... नंतर पण किती बडबडत होता..." विक्रम म्हणतो.

बाहेरून सुयश सर हे सगळं पाहत असतात. ते सुद्धा आता आत येतात... 

"सर! आम्ही याला मरेस्तोवर नाही मारलं.... हा असा अचानक कसा गेला माहित नाही..." निनाद म्हणतो.

"हो! मला माहितेय... चला आपण रेकॉर्ड झालेला व्हिडिओ बघूया त्यात कळेल हा अचानक कसा मेला..." सुयश सर म्हणतात.

सगळे बाहेर येतात... रेकॉर्ड झालेलं फुटेज सगळे पाहू लागतात... 

"सर सर एक मिनीट रिवाईंड करा..." सोनाली म्हणते.

सुयश सर पुन्हा फुटेज रिवाईंड करतात..... 

"हे बघा सर! त्याचे हात बांधलेले आहेत तरी तो सारखा पायाला हात लावायचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा त्याचं बोट मांडीला टच झालंय तेव्हा लगेच त्याने प्राण सोडलेत!" सोनाली म्हणते.

"हो खरंच कि! पण, त्याच्या हातात काही नव्हतं.... मग हा......" गणेश म्हणतो. 

"त्याची नीट झडती घ्या.... काही मिळतंय का बघा आणि बॉडी फॉरेन्सिक लॅब ला पाठवा... डॉ. विजय च सांगतील आता काय झालं ते! अभिषेक आणि गणेश तुम्ही पुन्हा त्या मॉन्टी ला विचारायचा प्रयत्न करा... बघा बोलतोय का... तोवर मी आणि सोनाली त्या दोघांचं सामान चेक करतो!" सुयश सर म्हणतात. 

विक्रम आणि निनाद त्याची झडती घेतात.... तो मरेल असं काही त्याच्या कडे नसतं! अँबुलन्स ला फोन करून त्याची बॉडी फॉरेन्सिक लॅब ला पाठवतात... 

गणेश आणि अभिषेक मॉन्टी ची चौकशी करायला आता एक नवीन पद्धत शोधून काढतात.... त्याच्या सेल मध्ये गेल्यावर गणेश त्याचे हात मागे बांधून टाकतो.... जेणेकरून तो सिड सारखं काही करणार नाही... थोड्याच वेळात नियती तिथे येते.... लाय डिटेक्टर टेस्ट करून त्याच्या कडून सगळं काढून घ्यायचं ठरलेलं असतं! नियती येऊन सगळा सेटअप लावते.... मॉन्टी ला एक इंजेक्शन देते आणि त्याच्या डोक्यावर त्या मशीन चे फिटिंग करून अभिषेक ला प्रश्न विचारायला सांगते!...

"बोल! तू कोणत्या गँग साठी काम करतोस?" अभिषेक विचारतो.

"बिच्छु" मॉन्टी सांगतो.

"तुमचा बॉस कोण आहे?" अभिषेक पुढचा प्रश्न विचारतो.

"माहित नाही." मॉन्टी उत्तर देतो.

"तिसरी बॅग कुठे ठेवली आहे?" अभिषेक विचारतो. 

थोडा वेळ जाऊनही काही उत्तर येत नाही... म्हणून तो पुन्हा विचारतो... तरीही काही उत्तर येत नाही... 

"हा काही बोलत का नाहीये?" गणेश विचारतो.

"बहुतेक या लोकांकडून पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली आहे लाय डिटेक्टर टेस्ट ची! म्हणून हा काही बोलला नाही...." नियती म्हणाली.

"म्हणजे बिच्छु गँग हे पण खोटं बोलला आहे का?" अभिषेक विचारतो. 

"वाटत तरी नाहीये...." नियती म्हणाली. 

"सर! ती बिच्छु गँग म्हणजे टॉप मोस्ट वॉन्टेड दहशदवादी गँग आहे ना...." गणेश ने विचारलं. 

"हो! त्या गँग च्या काहीही खुणा मागे राहत नाहीत आणि बॉस च नाव सांगायला नको म्हणून पकडले गेलेले सगळे आत्महत्या करतात." अभिषेक म्हणाला. 

सगळे त्या खोलीतून बाहेर आले.... नियती पुन्हा लॅब ला गेली.... आणि जे काही घडलं ते सगळं दोघं सुयश सरांना सांगतात.... 

"हे बघा या दोघांच्या सामानात हे एक विंचवाच्या प्रिंट च कार्ड मिळालं आहे... हे दोघं बहुतेक बिच्छु गँग चे मेंबर आहेत!" सोनाली म्हणते. 

"आणि त्या सिड च्या पाकिटात हा एक कागद मिळाला आहे...." सुयश सर म्हणाले. 

त्या कागदावर काही ठिपके असतात; 
"::  ° t  °• ,  • °  n"... 

सुयश सर व्हाईट बोर्ड वर तसेच्या तसे सगळे काढून घेतात. सगळे विचार करायला लागतात आता हा कोणता कोड असेल..... 
एवढ्यात विक्रमला त्याच्या खबऱ्याचा पिंट्या चा फोन येतो.... तो त्याच्याशी फोन वर बोलून घेतो. 

"सर! आत्ता पिंट्या चा फोन आलेला त्याच्या माहिती नुसार हि बिच्छु गँग प्रत्येक वेळी नवीन नवीन कोड मार्फत एक मेकांशी कॉन्टॅक्ट करतात.... आणि महत्वाचं म्हणजे ही गँग आपला विस्तार वाढवायला नेहमी अति गरजू माणसांना टार्गेट करून बरोबर त्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात आणि त्यांच्याकडून असली कामं करून घेतात...." विक्रम सांगतो. 

"ठीक आहे! एवढी मोठी गँग आहे म्हणल्यावर हे असंच अपेक्षित होतं...." सुयश सर म्हणतात. 

इतक्यात पोलीस स्टेशन च्या लँडलाईन वर फोन येतो.... सुयश सर फोन उचलतात... ते काही बोलणार एवढ्यात समोरून तो माणूस बोलू लागतो...

"ए.... ए.सी.पी. तुला काय वाटलं माझ्या दोन कबुतरांना पकडून तुला काही सगळी माहिती कळेल का?..... हा गैरसमज पण लवकरच दूर होईल.... शेवटचे बारा तास आहेत तुझ्या हातात... एकदा तर मी स्वतःच खोटा बॉम्ब लावला होता, दुसरा तू फुटू च नाही दिला पण आता तिसरा बॉम्ब फुटणार एवढं नक्की.... हा हा हा हा...." एवढं बोलून फोन कट होतो.... 

फोन कट झाल्यावर सुयश सर म्हणतात; "अरे! तुला कुठे माहितेय आम्ही तुझा हा डाव सुद्धा हाणून पाडणार आहोत!"

सगळे पूर्णपणे विश्वासाने त्यांच्या कडे बघत असतात.... आणि पुन्हा कोड काय असेल हा विचार करायला सुरुवात करतात.... 

"निनाद, गणेश तुम्ही एकदा फॉरेन्सिक लॅब ला जाऊन या.... बघा डॉ. विजय ना काही माहिती मिळाली आहे का.... आधीच आपल्या हातात कमी वेळ आहे... तोवर आम्ही हा कोड काय आहे हे बघतो." विक्रम सांगतो. 

दोघं फॉरेन्सिक लॅब ला जातात.... 

"सर, काही समजलं का? हा कसा मेला?" निनाद विचारतो. 

"हो! खूप वेदना झाल्या असतील याला." डॉ. विजय म्हणतात. 

"म्हणजे?" गणेश विचारतो.

"याच्या शरीरात एक चिप फिट केलेली होती.... जेव्हा याने मांडीवर प्रेशर दिलं, तेव्हा ती आतल्या आत एखाद्या बॉम्ब सारखी फुटली.... ब्रेन हॅमरेज झालं आणि हा मेला." डॉ. विजय म्हणाले. 

निनाद आणि गणेश दोघंही गोंधळले... काय? फक्त बॉस च नाव सांगायला नको म्हणून हे असं केलं! असेच विचार दोघांच्या मनात येत होते... 

"अजून काही मिळालं आहे का?" निनाद ने विचारलं. 

"हो! याच्या बुटांच्या सोल मध्ये हे मेमरी कार्ड लपवलेलं होतं...." नियती ते निनाद ला देत म्हणाली. 

दोघं सगळी माहिती आणि मेमरी कार्ड घेऊन पुन्हा पोलीस स्टेशन ला आले....
क्रमशः...
*************************
आता पुढच्या भागात पाहूया त्या मेमरी कार्ड मध्ये काय असेल..... तोपर्यंत तुम्ही कोड काय असेल हा विचार करा... आणि तुम्हाला जर कोड समजला तर कमेंट करून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all