मिशन मुंबई (भाग-२)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आपण, फॉरेन्सिक डॉक्टर म्हणून गूढ कथेत डॉ. विजय आणि नियतीला भेटलोच आहोत! तेच पुन्हा आता आपल्या भेटीला येणार आहेत!)

(मागच्या भागात आपण पाहिलं, कुणाल ला टाइम बॉम्ब दिसला आणि तो डिफ्युज करायचा तो प्रयत्न करत असताना त्याने पिवळी वायर कापली..... आता पुढे....)

त्याने वायर कापल्या बरोबर अचानक आवाज यायचा थांबला.... काही सेकंद अशीच शांततेत गेली.... सगळ्यांचे डोळे अजून बंदच होते..... 

"Very good कुणाल!..." ए.सी.पी. सुयश म्हणाले... 

त्यांच्या आवाजाने सगळ्यांनी डोळे उघडले.... 
"थँक्यू कुणाल! तुझ्या मुळे आपल्या सगळ्यांचा जीव वाचला आहे..." निनाद म्हणाला.

"अहो सर त्यात थँक्स काय! तुम्ही तर रोजच आमच्या रक्षणासाठी लढता.... मी या पुढे काहीही केलं नाही..." कुणाल अगदी नम्रतेने म्हणाला.... 

"ओके! चला आता सगळे..... आपल्याला लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायचा आहे!" ए.सी.पी. सुयश म्हणाले.

सगळे तिथून निघाले.... कुणाल त्याच्या त्याच्या वाटेने गेला..... सोनाली आणि अभिषेक फॉरेसेन्सिक लॅब मध्ये आले.... सोबत कुणाल ने डिफ्युज केलेला बॉम्ब चेकिंग साठी आणला... 

"सर! त्या बॉडी च्या तुकड्यांवरून काही हाती लागलं आहे का?" सोबत आणलेला बॉम्ब डॉ. विजय ना देत सोनाली ने विचारलं. 

"हो! त्या तुकड्यांवरून असच स्पष्ट होतंय, हा माणूस सुसाईड बॉम्बर होता! त्याच्या पोटात बॉम्ब फिक्स केलेला होता." डॉ. विजय म्हणाले.

"पण, सर तुम्हाला कसं समजलं याच्या पोटात बॉम्ब फिक्स केलेला होता?" अभिषेक ने विचारलं.

"तुम्ही जे बॉडी चे तुकडे लॅब मध्ये पाठवले ते आम्ही नीट तपासले! त्यात एक आतड्याचा तुकडा होता आणि त्याची झालेली हालत व त्यावर मिळालेले बारुद या वरून समजतंय बॉम्ब शरीराच्या आत फिक्स केला होता." नियती म्हणाली. 

"मला एक कळत नाहीये, मॉल मध्ये एन्ट्री करताना व्यवस्थित स्कॅनिंग करून एन्ट्री मिळते! दुसरा कोणता रस्ता सुद्धा नाही आत जायला मग हा माणूस आत गेलाच कसा?" सोनाली म्हणाली. 

"मी सांगतो! या सगळ्या तुकड्यांमध्ये मला काही विशिष्ट प्रकारचे अंश मिळाले आहेत.... ते प्लास्टिक ची पिशवी जशी असते तशी पिशवी बनवायला कामी येतात.... आणि या मध्ये काहीही गुंडाळून ठेवलं तरी सहसा ते पटकन स्कॅनिंग मध्ये पकडता येत नाही.... जवळ जवळ ९०% तरी नाहीच!" डॉ. विजय म्हणाले. 
***************************
दुसरीकडे निनाद आणि गणेश प्रेस कॉन्फरन्स अरेंज केली होती तिथे तो बॉम्ब कसा आला, कोणी लावला काही समजतंय का पाहायला म्हणून हॉल मॅनेजर प्रकाश ची चौकशी करायला आले..... पोलिसांना पाहून तो पळायला लागला..... गणेश ने त्याला बरोबर पकडून निनाद समोर आणलं! 

"काय रे! तुझाच हात आहे ना यात...." निनाद ने त्याची कॉलर पकडून विचारलं. 

"नाही! नाही! साहेब.... मला तिथे काय घडलं हे समजलं आणि हे माझ्यावर शेकणार म्हणून मी घाबरून पळत होतो हो... मी... मी... काही नाही केलं! खरंच खरंच....." प्रकाश हात जोडून विनवण्या करत बोलत होता.  

"सांग मग कोणी केलं हे... आम्ही जेव्हा सगळी तयारी बघून तिथून गेलो तेव्हा कोण आलेलं बोल पटकन..." गणेश ने विचारलं.

"मला नाही माहित सर हे कोणी केलं..." प्रकाश म्हणाला.

"जाऊदे गणेश हा आपल्या काही कामाचा नाही... गोळी घाल याला.... वर उत्तर देताना सांगू, चकमक झाली आणि स्वरक्षणासाठी गोळी झाडली आणि त्यात हा गेला..." निनाद ने सांगितलं.

गणेश ने गन काढून त्याच्या डोक्याला लावली आणि ट्रिगर वर बोट ठेवलं! 

"नाही नाही साहेब मारू नका.... सांगतो! सांगतो!" प्रकाश गयावया करू लागला... 

"हेच आधीच कबूल झाला असतास तर वेळ वाचला असता आमचा... बोल पटकन..." निनाद म्हणाला. 

"तुम्ही इथून गेल्यावर समोरच्या रस्त्यावर गोंधळ उडाला.... तिथे एका गाडी वाल्याचा आंधळ्या बाईला धक्का लागला आणि ती खाली पडली म्हणून भांडणं सुरु होती.... काय झालं ते बघायला मी तिथे गेलो.... थोडावेळ ते खूप भांडत होते पण, नंतर स्वतःहून निघून गेले... ती बाई ज्या प्रमाणे नंतर चालत गेली त्या वरून ती आंधळी वाटतच नव्हती...." प्रकाश ने घाबरत घाबरत सांगितलं.

"तू त्या बाई चा चेहरा नीट बघितलास का? किंवा त्या माणसाचा किंवा मग त्याच्या गाडीचा नंबर?" निनाद ने विचारलं.

"नाही साहेब! त्या बाईचा चेहरा स्कार्फ ने झाकलेला होता आणि डोळ्यावर गॉगल होता... त्या माणसाने सुद्धा हेलमेट काढले नव्हते म्हणून त्याचा चेहरा पण नाही दिसला.... त्याच्या गाडीचा नंबर म्हणाल तर मला फक्त MH ४८, ११ एवढंच आठवतंय... मधली अक्षरं आणि पुढचे दोन डिजिट आठवत नाहीयेत..." प्रकाश ने सगळं सांगितलं.

"कोणती गाडी होती ते तरी सांग! का आता ते पण आठवत नाही..." गणेश ने विचारलं.

"बाईक होती... काळ्या रंगाची हिरो...." प्रकाश म्हणाला.

निनाद आणि गणेश तिथून निघाले.... 
"एम्. एच. ४८ म्हणजे, बोरीवली पासिंग आहे.. आर.टी.ओ. मधून माहिती काढ अश्या किती बाईक ना सुरुवात ११ असलेले नंबर दिले आहेत... त्यातूनच आता काहीतरी हाती लागेल." निनाद ने गणेश ला सांगितलं. 
****************************
विक्रम त्या हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या इसमाची काय परिस्थिती आहे हे पाहायला गेला होता.... तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला आणि रिसेप्शन वर चौकशी केली... 

"काल मॉल मध्ये जखमी झालेला माणूस ना? त्याची ट्रीटमेंट डॉ. रवी करतायत.... ते बघा त्यांना विचारा..." रिसेप्शनिस्ट कार्तिकी ने डॉ. रविंकडे बोट दाखवून सांगितलं.

"डॉ. रवी... काल मॉल मध्ये जखमी झालेल्या माणसाची ट्रीटमेंट तुम्ही करताय ना? काय झाले त्याचे? कोमातून बाहेर आलाय का तो?" विक्रम ने विचारलं. 

"अहो सर पण, आत्ता तासभरापूर्वीच तर त्याला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये हलवलं ना?" डॉ. रवी म्हणाले. 

"काय? कोणी? आणि तुम्ही आम्हला कळवलं का नाही?" विक्रम थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाला. 

"दोन पोलीस आलेले.... ते म्हणाले, आम्हाला इथे ए.सी.पी. सुयश सरांनी पाठवलं आहे....   आणि त्यांनी सांगितलं की या माणसाला आम्ही एका दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवतोय इथे याच्या जीवाला धोका आहे.... मी स्वतः त्यांचे आय.डी. कार्ड सुद्धा पाहिले... त्यातल्या एकाचं नाव रमेश आणि दुसऱ्याचं पराग होतं! तेच त्या माणसाला इथून घेऊन गेले..." डॉ. रवी म्हणाले. 

"हा सी.सी.टीव्ही. चालू आहे ना? मला ते दोघे जेव्हा आले होते तेव्हा पासूनच सगळं फुटेज हवं आहे...." विक्रम ने सांगितलं.

"हो सर! लगेच मागवतो..." असं म्हणून डॉ. रवींनी फुटेज मागवले.

"बरं मला सांगा, त्या दोघांपैकी कोणी काही बोललं का म्हणजे ते कोणत्या हॉस्पिटल मध्ये त्याला घेऊन चालले आहेत किंवा त्यांच्या बोलण्यात दुसऱ्या कोणाचं नाव वैगरे? नीट आठवून सांगा.... आणि तो एवढा सिरिअस पेशंट होता म्हणजे अँबुलन्स नेली असेलच ना त्यांनी?" विक्रम ने प्रश्न केला. 

"नाही सर! कोणीही तसं काही बोललं नाही... ते लोकं सोबत अँबुलन्स घेऊन आलेत म्हणाले... पण, हा सर! त्यातल्या एकाला फोन आलेला तेव्हा तो फोन वर कबुतर एवढं बोलला आणि फोन ठेवला...." डॉ. रवी म्हणाले.... 

एवढ्यात एक माणूस सी.सी.टिव्ही. च फुटेज घेऊन आला.... थोडे थोडे दोघांचे चेहरे दिसत होते.... विक्रम ते घेऊन तिथून निघला... बाहेर त्याने सिक्युरिटी गार्ड ला बोलावलं...

"सलाम साहब!" सिक्युरिटी गार्ड चंदू म्हणाला. 

"दुपारी पोलिसांच्या वेशात दोन जण अँबुलन्स घेऊन आलेले त्या अँबुलन्स चा नंबर किंवा कोणत्या हॉस्पिटल ची होती पाहिलं का काही?" विक्रम ने विचारलं. 

"ती नवीन अँबुलन्स वाटत होती साहेब! त्याच्यावर कोणत्याही हॉस्पिटल च नाव नव्हतं! मला संशय आला म्हणून मी नंबर नोट करून ठेवला आहे... हा घ्या सर नंबर..." असं म्हणत चंदू ने विक्रम ला अँबुलन्स चा नंबर दिला... विक्रम थँक्यू बोलून तिथून निघाला...
*************************
लॅब मध्ये सुद्धा डॉ. विजय नी त्या बॉम्ब ची तपासणी केली...

"यावर कोणाचे हि फिंगर प्रिंट नाहीयेत... शिवाय हा बॉम्ब जास्त काही नुकसान सुद्धा करू शकत नाही... जास्तीत जास्त ज्या टेबलाला हा लावला होता ते तुटलं असतं आणि जो बॉम्बच्या एक मीटर च्या घेऱ्यात होता त्याला थोडी फार जखम झाली असती..." डॉ. विजय नि सांगितलं. 

"म्हणजे हे सगळं आपला वेळ जायला आणि शहरात अजून दहशद पसरून जनतेचा आपल्या वरचा विश्वास उडण्यासाठी केलं होतं!" सोनाली म्हणाली. 

सगळी माहिती घेऊन सोनाली आणि अभिषेक पुन्हा पोलीस स्टेशन ला यायला निघाले.... 

(आता पुढे काय होईल? गणेश ला बाईक बद्दल कोणती माहिती मिळेल? त्या जखमी पेशंट ला कुठे ठेवलं असेल? आता पोलिसांचं पुढचं पाऊल काय असेल? पाहूया पुढच्या भागात... तो पर्यंत हा भाग कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा...)

🎭 Series Post

View all