सुटलेली ट्रेन भाग ५ अंतिम

Love
आज दहा वर्षांनी पुन्हा ती गझल ऐकताना ती भूतकाळातून वर्तमानात आली, आणि भानावर आली.....

काहीतरी झालं आत खोलवर, आणि तिने मनोमन प्रार्थना केली, "देवा पवन ची ट्रेन सुटू दे..... प्लीज प्लीज.....तो नसू दे रे आज या ट्रेन मध्ये....."


शेवटचं त्याला पाहावं.... त्याचाशी बोलावं म्हणून त्याचा डीपी पाहत त्याला कॉल किंवा मेसेज करायला व्हाट्सअप उघडलं, तर त्याचा मेसेज येऊन पडला होता ऑलरेडी....

"अरे यार सॉरी.... ट्रेन सुटली माझी..... माहित नाही काय झालं..... पण शूजची शिलाईच निघून आली अचानक.... आता परत घरी जातोय.... दुसरा शूज घ्यायला....."

आणि ही चक्क हसली.... वेड्यासारखी.... हसत सुटली... "थँक्स देवा....."


त्याला मेसेज केला, "बरं झालं.... तसंही या ट्रेनची ही कदाचित शेवटची फेरी आहे.... आकाशच्या जवळ जाण्याची वेळ आलीये .... तो बोलावतोय... अधुरी राहिलेली प्रेम कहानी पूर्ण करायला. .... आपण कितीही घट्ट धरून ठेवलले, तरीही धरलेले हात सुटत जातात.... माणसं आतून तुटत जातात..... जाणाऱ्याला जाऊ द्यावं.... पुन्हा तुटलेल्या मनाने उभं राहावं.... घट्ट धरून ठेवलेल्याना दुर जाताना पाहून त्रास होतो रे.... पण सावर लवकर.... तुझी माझी भेट इतपर्यंतच.... काळजी घे....आय लव यू..."


सहज म्हणून बाजूला पाहिलं..... तर स्टेशन वरची तीच दहा वर्षापूर्वीची मुलगी बाजूच्या रोमध्ये बसली होती....

दोघींची नजरानजर झाली.... आणि ओळखीचं हसल्या दोघीही..... जुनं नातं असल्यासारखं..... आणि पुन्हा कानठळ्या बसवणारा आवाज झाला.... आणि गझल शांत झाली.... कायमची.....


ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी
ये नज़राना तेरा भी है मेरा भी
अपने ग़म को गीत बना कर गा लेना
राग पुराना तेरा भी है मेरा भी


🎭 Series Post

View all