सुटलेली ट्रेन भाग ४

Love
"मी आकाशची होते आणि अजूनही त्याचीच आहे.... माझ्या मनातली त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही...."

"पण मला त्याची जागा नकोच.... मला त्याच्या बाजूची जागा तरी देशील ना?" त्याचा आशावादी प्रश्न.....

"शक्य नाही ते.... पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं.... ते विसरता येत नाही...."

"पण मी विसरायला सांगतच नाहीये.... त्याच्या आठवणी सोबत ठेवून..... मला सोबत द्यायला सांगतोय...."

"हे आता बोलतोयस तू.... पण नंतर कंटाळशील.... वैतागशील.... भांडशील..... तू मला त्याच्या दुःखातून काढलंस जरी, तरी माझ्यातून त्याला काढू शकणार नाहीस.... आणि तुझ्यातल्या मेल इगोला हळूहळू ते असह्य होईल.... विचार कर निट...."


"अगं तो तुझा श्वास आहे.... त्याला कसं बाजूला काढू? मला तुझी आस व्हायचंय..... तो तुझ्या मनात आहे.... हृदयात आहे.... त्याची धडधड व्हायचंय....."

"फिल्मी डायलॉग नको मारुस..... रिअल लाईफ मध्ये ते कामाला नाही येत. कल्पनेतून बाहेर पड, वास्तवात ये....."


"माझी कल्पना आणि वास्तव दोन्हीही तूच आहेस..... आकाश तुझा होता आणि तुझाच राहील.... पण आजपासून.... आतापासून तू माझी आहेस.... त्याच्यासकट..... आजपासून आकाश माझी सवत झाला चल....." तो म्हणाला आणि ही खुदकन हसली.


"सवत??? सिरीयसली?"

"हो मग आपल्या बायकोच्या आयुष्यातल्या दुसऱ्या पुरुषाला काय म्हणतात मला नाही माहित ना... सवत सोपा वाटला शब्द..... म्हणून मग....." तो एवढुस तोंड करत बोलला, आणि ती हसली.....खळखळून..... इतक्या वर्षांत पहिल्यांदाच.....


त्याच्या साथीने ती पुन्हा हसायला शिकली.... जगायला शिकली.... एफ एम वरची गाणी नव्याने ऐकायला शिकली....


🎭 Series Post

View all