सुटलेली ट्रेन भाग ३

Love
बाजूला बसलेली मुलगी धापा टाकत म्हणाली म्हणाली, "तुझी पण ट्रेन चुकली का नेहमीची....."

तिने झटकन वळून पाहिलं..... नेहमी दिसणारी पण मागच्या डब्यात चढणारी मुलगी.... आज पळत येऊन पुढचा तर पुढचा डब्बा पकडावा म्हणून धापा टाकत आली होती.... पण सुटलीच तरीही....

"हो ना... नेमकी चप्पल तुटली...." तिने हातातली चप्पल दाखवत म्हटलं.....

तेवढ्यात कानात एम वर गाण्याचे शब्द पडले....

ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी
ये नज़राना तेरा भी है मेरा भी...

आणि समोर नजरेआड होणाऱ्या ट्रेनचा कानठळ्या बसवणारा आवाज झाला...... पाठोपाठ एक आगीचा लोळ उठला..... आणि मग एकामागे एक असे ४-५ स्फोट झाले...

दोघींनी घट्ट हात धरले एकमेकींचे....स्टेशनवरच्या गर्दीचे हाल काही वेगळे नव्हते.... मोठे झालेले डोळे, त्यात दिसणारं ते ज्वालाचं प्रतिबिंब..... थरथरणारे हात पाय.... आणि ओठ.... प्रचंड धावाधाव..... आरडाओरडा.... भीती....गोंधळाचं वातावरण!


तिने कॉल लावायचा प्रयत्न केला.... पण लागलाच नाही.... त्याचा आवाज पुन्हा कधी तिने ऐकलाच नाही.... पहिलं वहिलं प्रेम अपूर्ण राहिलं..... पुन्हा कधीच पूर्ण न होण्यासाठी.... एक भळभळती जखम देऊन गेलं.... आयुष्यभरासाठी.....


त्यानंतरची ३-४ वर्षे तिने फक्त काढली कशीबशी.... कॉलेज पूर्ण केलं..... पण गेलेल्या क्लास्मेट्सची आठवण सतत यायची.... आकाश नंतर प्रेमाला विसरूनच गेली ती..... आपल्या आयुष्यातून वजा करुन टाकलं तिने प्रेमाला आणि त्या एफ एम वरच्या गाण्यांना....

जॉब ला लागली. तोच ट्रेन चा प्रवास.... पण आता ती गाणी ऐकत नव्हती.... इच्छा नव्हतीच..... आणि ३ वर्षांपूर्वी पवन आयुष्यात आला. राहायला एक स्टेशन पुढे मागे..... कामही एकाच ठिकाणी..... एकाच ट्रेनने जाणं येणं....

एक दिवस अचानक त्याने प्रोपोज केलं.... हिने तोंडावर नकार दिला... पण पट्ठ्या बधला नाही. आपले प्रयत्न सोडले नाहीत.... शेवटी वैतागून एक दिवस त्याला बाहेर घेऊन गेली जेवायला.... आणि स्पष्टच सांगितलं.....तिच्या आणि आकाशबद्दल.....त्याच्या अशा जाण्याबद्दल....

🎭 Series Post

View all