Mar 02, 2024
Education

मीस यू बाबा (बडी)

Read Later
मीस यू बाबा (बडी)

      यंदा या कोरोनाच्या सावटाने अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाले. कुणी आपल्या प्रियजनांना गमावले तरं कुणी आपली नोकरी गमावली ,कुठे कामधंदे ठप्प झाले. अश्यातच अनघावर वाईट प्रसंग ओढवला. तीचे पति अमितना कोरोनाशी झुंज देताना दुर्दैवी मृत्यु आला.????????
        

         महिन्याभराने अमित आणि अनघाचा मुलगा तेजसचा दहावीचा रिझल्ट लागतो.तेजस आपल्या buddy ला खूप miss करतो .अँडमिशनला लागणारे कागदपत्र ,पैशांची व्यवस्था यासाठी त्याला buddyची मदत झाली असती , सतत तेजस याच विचारात होता.अमित काटकसरी होता. 

    त्याने भविष्यासाठी सेव्हींग केलेली पण तेजस आणि अनघाला याबाबतीत कल्पना नव्हती.अमित आणि अनघाचा प्रेमविवाह होता.अनघाने अमितच्या कुटुंबाशी कधी जुळवून घेतले नाही. ती नेहमी घरीच रहायची.बाहेरची कामे शक्यतोवर अमित आटपायचा.अनघाला सर्वांनमध्ये मिसळणे आवडतं नव्हते.ती एकटेच रहाणे पसंद करत होती.

     तेजसला ह्या गोष्टींची जाणीव होती.अनघाच्या चुलत बहिणीशी फोनवरून बोलताना तीला समजते की अॅडमिशनसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज लागते .तेजसचं कास्ट सर्टिफिकेट काढ़ले आहे का ?बहिणीच्या प्रश्नावर अनघा गप्पचं झाली.तीला आता काही सुचेना.डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते.

            तेजस बाहेरून आल्यावर अनघा विचारते..."तेजस  पप्पांनी तुला कधी कास्ट सर्टिफिकेटबाबत काही सांगितले का रे ?"आपल्याकडे ते आहे की नाही....दोघेही गोंधळल्यासारखे होतात.तेजस लगेच कपाटांमध्ये अमितने ठेवलेल्या फाइल पहातो पण त्याला आणि अनघाला अमितच्या कारभाराविषयी,त्याच्या गुपित कागदपत्रांविषयी काहीच माहित नसते.

    अमितने अनघाला ही जबाबदारी कधी दिलीच नाही.दोघेही निराश होतात काय शोधायचं,कुठे शोधायचं काही सुचेना.तेजस एकदम रडवेला होतो.????????आईला म्हणतो ...मम्मी स्कूलमध्ये जाऊन चौकशी करू.शाळेत जाऊन चौकशी केल्यावर समजते की....या अशाप्रकारच्या कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. अनघाने याआधी अर्ज केलेला नसतो त्यामुळे तेजसच्या मदतीने अनघा अर्ज तयार करते. कोरोना कालावधी आणि सरकारी निर्बंधानुसार कामांसाठी वेळ लागत होता. ती या टेबलवरून त्या टेबलच्या साहेबांना भेटते. पण अनघाचे कोणतेच कामं तत्परतेने होत नाहीत.

       कार्यालयात जेवणाचा अवकाश असतो म्हणून अनघा आणि तेजस कार्यालयाच्या बाहेरील झाडाखाली बसतात. अनघा तेजसला काही खातोस का म्हणून विचारते ...पण तेजसचे तीच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते...काय रे तेजस कशाचा विचार करतोसं ?तेजस वडिलांच्या अचानक मृत्यूने दुःखी असतो वरं ही न झेपणारी कामं ....मम्मी माझा मित्र श्रेयसच्या मम्मीला सर्व कामं ईजीली करता येतात. त्यांच्या भरपूर ओळखी आहेत.काल मी श्रेयसशी बोललो तर त्याने सांगितले की त्याचे कास्ट सर्टिफिकेट दोन दिवसातचं बनले.

     आज माझे पप्पा असते तर त्यांच्या ओळखीने लवकर  काम झाले असते. मम्मी...तू कोणाशी बोलतही नाहीस आणि आपले नातेवाईक आपल्याशी दुरावा ठेवतात नाहीतर कामापुरतेच बोलतात.पप्पा होते तर.. ते सर्वांना समजून घेत होते....तू तर एक मैत्रीणही नाही बनवलीस आणि नातेवाईकपण नाही टिकवलेस. मम्मी तुला चेन्ज व्हावं लागेल.

तेजस अनघाच्या बाबतीत जे बोलतो ते योग्यच होतं. वेळ कुणावरही कधी सांगून येत नसते. अडचणीच्या वेळेस मदतीला आणि मार्गदर्शनाला आपल्या जवळचे माणसचं कामी येतात. 

     अनघाने स्वतःला सक्षम करायला हवे, अमितवर अवलंबून असल्यामुळे अनघाला बऱ्याच अडचणींना तोंडं द्यावे लागेल.घरातील महत्तवाच्या कागदपत्रांची फायलींग , बँकेची कामे,सरकारी कामे ही अनघाने वेळीच शिकले असते तर तेजसने एवढं टेन्शन घेतलं नसतं.तेजस मनात बोलतो I miss you buddy??????

अनघा काही काळ सुन्न होते ....आणि मग मनाशी निर्धार करते.....मातृत्वाच्या या सुखद प्रवासात काटेरी वळणं असणारचं, त्यातून मार्ग काढणे ही कला जमली पाहिजे.

समाप्त

©® Sujata Tambade

dont copy without permission.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//