( मिस लिली… एक रहस्यकथा..)
...टिंग टॉंग..
डोअरबेल आवाजाने तो लिविंग रूम मध्ये आला.. त्याच्या आवडत्या डिओचा घमघमाट सुटला होता.. घाईघाईत माऊथवॉश करून त्यानं होल मधून बाहेर पाहिलं..
बाहेर तीच होती.. जिच्यासाठी तो एवढा तयार झाला होता..
दार उघडलं तशी ती आत आली..
तिच्या अंगावर गुढग्यांच्याही वर असलेला लाल रंगाचा स्लीवलेस वनपीस..
अंगाला पूर्ण चिपकलेल्या त्या ड्रेसमधून तिचं सौंदर्य उठून दिसत होतं.
त्यानं तिला खालून वरपर्यंत न्याहाळलं.
" परफेक्ट..! "
त्याच्या तोंडून आपोआपच बाहेर पडलं.
त्याला तसं बघून ती हसली..
" पारकर.. तुझ्यासाठीच तर आलेय डिअर..डोन्ट लुक लाईक धिस.. ! "
त्याच्या नाकाला टिचकी मारत ती म्हणाली.
" ओह! मिस लिली.. तुझी हिच अदा मला खूप आवडते..
डायरेक्ट स्ट्रेटफॉरवर्ड.. "
" काही खाशील..? "
त्यानं विचारलं.
" नाही.. त्यापेक्षा काही प्यायला मिळेल का ते सांग. "
त्याला डोळा मारत लिली.
त्यानं तिच्यासमोर बाटली उघडून दोन पेग तयार केले..
" चिअर्स लिली..!"
" पारकर.. पुढचं सगळं इथेच...? "
त्याच्या मानेवरून हात फिरवत ती.
तिचा इशारा कळला त्याला..
" तुझ्यासाठी सरप्राईज आहे लिली.. "
तिच्या डोळ्यावर हात ठेवून तो तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला..
त्यानं डोळ्यावरून हात काढला..
"वॉव.. पारकर.. तुझ्यातला रोमँटिक माणूस जिवंत आहे अजूनही.. "
आतला नजारा बघून ती खूश झाली.
लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला बेड..
हार्ट शेप चे लाल फुगे..
आनंदाने बेडवर तिनं स्वतःला झोकून दिलं..
तोही तिच्या अंगावर चढणार , तशी ती बाजूला पलटली..
" पारकर… एवढी घाई काय आहे..?
हे तुझं सरप्राईज.. आता माझं…
ओठावर कातिल हास्य होतं तिच्या ..!
त्याचा कलेजा तिथेच खलास झाला…!
"... रात अकेली है…
बुझ गये दिये… "
… तिनं गाणं सुरु केलं..
खुर्चीवर पारकर बसला होता..
हात मागे बांधलेले.. आणि डोळ्यांवर लाल सॅटिनची पट्टी..
हात मागे बांधलेले.. आणि डोळ्यांवर लाल सॅटिनची पट्टी..
" ओह.. लिली.
आता मला कंट्रोल होत नाहीये..
प्लीज.. डोन्ट चेक माय पेशन्स.. डार्लिंग.. "
तो उतावीळ झाला होता.
" हेयs .. पाsरकर..! यू नॉटी..!!
जल्दी क्या है..?
जल्दी क्या है..?
ही लिली तर अक्खी रात्र तुझ्यासोबत घालवायला आली आहे.. आणि तू इतक्यातच..?"
त्याच्या शर्टच्या बटना उघडत ती म्हणाली..
त्याच्या छातीवर आपला मोरपीसाचा स्पर्श करीत ती हळूच त्याच्या कानात कुजबुजली…
" पारकर.. म्हातारा झालायस तू आता.. "
त्याच्या कानाचा चावा घेत ती जोरात हसली.
हळूहळू त्याच्या अंगावरच्या कपड्यांचा अडसर ती कमी करत होती…
" लिली.. माझें हात सोड फक्त.. मग दाखवतोच तूला अजूनही किती तरुण आहे मी ते.."
तो झटपटत म्हणाला.
तो झटपटत म्हणाला.
" अरे.. पारकर..
आधी नेत्रसुख तर घे .."
ती त्याच्या डोळ्यावरची पट्टी ओठांनी सोडत म्हणाली.
आधी नेत्रसुख तर घे .."
ती त्याच्या डोळ्यावरची पट्टी ओठांनी सोडत म्हणाली.
तिचे उष्ण श्वास आणि बेधुंद करणारा पर्फ्यूमचा सुगंध..
.. काही नं घडताही त्याचे श्वास जोरात सुरु झाले..
तिनं त्याच्या ओठाला मदिरेचा ग्लास लावला..
" बस्स..! पारकर.. हा शेवटचा...
नंतर लिलीच्या पिंजऱ्यातून तू मुक्त …
लाईक अ फ्री बर्ड..
नंतर लिलीच्या पिंजऱ्यातून तू मुक्त …
लाईक अ फ्री बर्ड..
मोकळा..! काहीही करायला..
त्याच्या ओठांवर बोटांचा मधाळ स्पर्श करत ती बोलली..
तिची मादक नजर मात्र त्याच्या डोळ्यात..
तोही अडकला.. अलगद तिच्या जाळ्यात..!!
स्सक ...
हातातील सूरी गळ्यावर फिरली…
आणि रक्ताच्या चिरकांडया तिच्या चेहऱ्यावर उडल्या.
" शीट..! पारकर..
मेकअप खराब झाला ना माझा..
पुन्हा टचअप करावं लागेल.."
मेकअप खराब झाला ना माझा..
पुन्हा टचअप करावं लागेल.."
ती वॉशबेसिन कडे जात हसत म्हणाली.
तीन दिवसानंतर…
" हॅलो..! नेहा पारकर..? "
"हो.. मी नेहाच. आपण? "
पलीकडून आवाज आला.
"मी इन्स्पेक्टर राणे. तुमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम झालाय.. तुम्ही केव्हा येऊ शकता? "
" मी पोचलेच पुढल्या पाच मिनिटात. "
नेहाने कॉल कट केला.
नेहाने कॉल कट केला.
" कुणाचा गं फोन? "
रिक्षात शेजारी बसलेल्या सुरभीने विचारलं.
" अगं सोसायटी मध्ये प्रॉब्लेम झालाय.. इन्स्पेक्टर होते."
ती म्हणाली.
पाच मिनिटात त्या दोघीं पोहचल्या.
त्यांच्याच फ्लॅटसमोर गर्दी बघून थोडया भांबावल्या त्या.
" काय झालं इन्स्पेक्टर..? "
घाईने समोर येत नेहाने विचारलं.
समोरचं दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
" पप्पा.. "
गळ्यावर सुकलेलं रक्त.. अर्धनग्न शरीर आणि कुजका वास..
"असं कसं हे घडलंय..? "
सुरभीनं डोळ्याला पदर लावला.
" बॉडी पोस्टमार्टमला न्यावी लागेल मॅडम.. आणि तुम्हालाही पोलीस स्टेशनला यावं लागेल."
इन्स्पेक्टर राणे नेहाकडं बघत म्हणाला.
" तुमचा कोणावर संशय..? "
पोलीस स्टेशनमध्ये राणे विचारत होता .
सुरभीनं नकारार्थी मान हलवली.
" त्यांचं काही एक्सट्रामरायटल अफेअर वगैरे..? "
" काय बोलताय इन्स्पेक्टर..? ते खुप चांगले होते. "
नेहा संतापून म्हणाली.
" रिलॅक्स..!
रागावू नका.पण बेडरूम मधील बेडवरच्या त्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या..
विरत आलेले लाल फुगे…
आणि त्यांचं अर्धनग्न शरीर..ह्यावरून तर हेच दिसतंय ..
आणि मी नाही.. तुमच्याघरची सिच्युएशन सांगतेय हे.. "
रागावू नका.पण बेडरूम मधील बेडवरच्या त्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या..
विरत आलेले लाल फुगे…
आणि त्यांचं अर्धनग्न शरीर..ह्यावरून तर हेच दिसतंय ..
आणि मी नाही.. तुमच्याघरची सिच्युएशन सांगतेय हे.. "
" यू आर क्रॉसिंग यौर लिमिट इन्स्पेक्टर.. आमच्यावर काय बेतलंय तुम्हाला जाणीव नाहीये याची."
" रिअली..? "
तो डोळे विस्फारून म्हणाला.
" मग तीन दिवस त्यांना सोडून कुठे होतात तुम्ही दोघीं..? "
त्यानं रागानं विचारलं.
" तुम्ही आमच्यावर संशय घेताय.? "
नेहा चिडली.
सुरभीनं तिचा हात दाबला.
" आम्ही खेड्यावर गेलो होतो.. माझ्या मामाकडे लग्नकार्याला.
खूप फोर्स केला मधुकरला.
पण तो नाही आला.
पण तो नाही आला.
बंगलोरला काहीतरी मिटिंग आहे म्हणाला इमर्जन्सी. आज परतणार होता म्हणून आम्हीदेखील आजच आलो.
अफेअरबद्दल म्हणाल तर आमच्या लग्नाच्या चोवीस वर्षांत मला एकदाही असं जाणवलं नाही.
आम्हा तिघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. खूप खुश होतो आम्ही.
हां.. तो आता बंगलोरला का नाही गेला…
ती सजवलेली बेडरूम..
त्याची ही अवस्था..
ह्याबद्दल काहीच माहिती नाही मला."
सुरभी शांतपणे म्हणाली.
" ठिक आहे.. पोस्ट मार्टम नंतर खरं कारण समजेलच. तुम्ही जावू शकता आता. "
-राणे.
" राणे.. हा बघ रिपोर्ट..
मानेवर सूरी चालली खरं पण ताकद जरा जास्त होती..
म्हणजे एखाद्या स्त्री पेक्षा जास्त..
आणि मेन थिंग , त्याच्या गुप्तानगावर देखील सुरीने वार केलेत..
पण मृत्यू मात्र गळ्यावरच्या वारामुळे झालाय. "
म्हणजे एखाद्या स्त्री पेक्षा जास्त..
आणि मेन थिंग , त्याच्या गुप्तानगावर देखील सुरीने वार केलेत..
पण मृत्यू मात्र गळ्यावरच्या वारामुळे झालाय. "
डॉ. सौरभ.
" पण कोणी का करेल असं..? "
-राणे.
-राणे.
" हे शोधणे तुझे काम.. मी फक्त मृत्युंचं कारण सांगू शकतो..
हां.. आणखी एक.. की हा मर्डर प्रीप्लॅन होता ..
अगदी शांत डोक्याने केलेला..
अलगद आपल्या जाळ्यात ओढून...
कारण झटापटीच्या कोणत्याच खुणा नाहीत शरीरावर..!"
हां.. आणखी एक.. की हा मर्डर प्रीप्लॅन होता ..
अगदी शांत डोक्याने केलेला..
अलगद आपल्या जाळ्यात ओढून...
कारण झटापटीच्या कोणत्याच खुणा नाहीत शरीरावर..!"
" काही शारीरिक संबंध..? "
" ते नाही सांगू शकत. आलरेडी तीन दिवस झालेत. आणि त्या भागावर देखील वार होते.पण खुन मात्र त्याच रात्री झालाय.. अकरा साडेअकरा च्या दरम्यान. "
" काही प्रेमभंग वगैरे…
किंवा आणखी काही."
किंवा आणखी काही."
" ते तू शोध मित्रा.. मी माझं काम केलं."
-सौरभ.
-सौरभ.
" रात्री अकरा साडेअकरा वाजता कोण जाईल त्या सोसायटीमध्ये..?
सावंत..
वॉचमनला आणा पाहुणचाराला , आणि cctv चे फुटेज मागवा तिथल्या सेक्रेटरीकडून. "
वॉचमनला आणा पाहुणचाराला , आणि cctv चे फुटेज मागवा तिथल्या सेक्रेटरीकडून. "
राणेनी ऑर्डर सोडला.
" साहेब.. मी काहीच नाही केलं हो.. "
वॉचमन हात जोडत म्हणाला.
"हो काही नाही केला बे.. पण एन्ट्री काऊन नाही केला कोण होती ती तं?"
गालावर एक हाणत राणेनं विचारलं.
" साहेब खूप सुंदर मुलगी होती.. एकदम सेक्सी. माझ्या गालाला हात लावला तसा पिघलून गेलो मी.. अनं जावू दिलं.. "
तो आपला गाल चोळत म्हणाला.
" जसा आता माझा हात पडला नं पिघल्लास तसा का..?"
आपल्या विनोदावर राणे एकटाच हसला.
" सर.. हे फुटेज.. त्या रात्रीचे.
हा म्हणतो तशी मुलगी दिसत आहे इथे.. "
हा म्हणतो तशी मुलगी दिसत आहे इथे.. "
सावंत म्हणाला.
" बाबोs ..!
वॉचमन भावा.. माफ कर .
एवढी आयटम बघून भलेभले पिघालायचे.. तर तिथे तू कोण..?? "
राणेनं कान पकडले.
" हे बघ.. ही वर गेली साडेदहा वाजता आणि परतली बारा वाजता..
म्हणजे ससपेक्टड तर हीच वाटतेय.
म्हणजे ससपेक्टड तर हीच वाटतेय.
मोबाईल उघडला का रे त्याचा?
पटकन कुंडली मांडा समोर. "
-राणे.
-राणे.
" मॅडम.. हिला ओळखता तुम्ही..?? "
सुरभी आणि नेहाला फुटेज दाखवत राणेनं विचारलं.
" नाही. कोण ही? "
-सुरभी.
-सुरभी.
" ही लिली. तीन महिन्यापासून मिस्टर पारकरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे.कधी नाव वगैरे ऐकलंत तुम्ही? "
सुरभी मानेनच नाही म्हणाली.
" वॉचमन हा कोण रे? काय बोलतोय तुझ्याशी? "
सावंत दुसऱ्या दिवशीचे फुटेज बघत म्हणाला.
" हे विक्रम दादा ..
नेहा मॅडमला भेटायला आले होते. घरी कुणी नव्हते म्हणून निघून गेले. केव्हा येतील वगैरे विचारत होते. "
-वॉचमन.
" याला तरी ओळखता का? "
राणे नेहाला म्हणाला.
" हो..! हा विकी. माझा मित्र."
-नेहा.
" मित्रच का आणखी काही? "
राणे.
" इन्स्पेक्टर… तो माझा पर्सनल मॅटर आहे. "
नेहा चिडून.
" अरे? चिडल्या पुन्हा मॅडम…!
बोलवा मग तुमच्या पर्सनल मॅटरला इथेच.
त्याचं काय ना मॅडम.. आमच्याकडं असं काही पर्सनल वगैरे नसतं हो..
सगळं कसं ओपनली..
काय आलं ना लक्षात? "
सगळं कसं ओपनली..
काय आलं ना लक्षात? "
-राणे.
" काय विक्रम साहेब? तुम्ही गेला होतात म्हणे पारकरांकडे? "
" होय. नेहाचा फोन लागेना म्हणून आली की नाही हेच बघायला गेलो होतो. "
-विक्रम.
" अहो मित्र ना तुम्ही मॅडमचे..? काय हो मॅडम कळवलं नव्हतं तुम्ही केव्हा येणार ते? "
" गावात नेटवर्क नव्हता म्हणून बोलणं नव्हतं झालेलं."
ती म्हणाली.
" ओके विक्रम साहेब जावू शकता तुम्ही. मॅडम तुम्हीही जा. बाकी काही कळलंच तर बोलावू पुन्हा ."
राणे म्हणाला तसं बाकीचे निघाले.
दुसऱ्या दिवशी..
" सावंत.. काय रे चालतंय का डोकं तुझं..?"
" राणे साहेब… तुम्हीच बघा आणि काय ते समजा."
स्क्रीन वरचे फोटो मार्फ करत सावंत म्हणाला.
" च्यायला..! ही गोम आहे तर.
माझा तर भेजा फ्राय झाला रे.
चला धाडा निमंत्रण सगळ्यांना.. "
राणे डोकं खाजवत म्हणाला.
"आता सगळयांनी खरं सांगायचं.
का मारलंत मिस्टर पारकरांना.
सुरभी मॅडम..?
नेहा मॅडम..?
तुम्ही तरी बोला काही… विक्रम सर..
सॉरी सॉरी.. मिस लिली ..?"
विक्रम पुढे दंडा आपटत राणे म्हणाला.
" विकी..?? लिली..??
काय बोलताय तुम्ही हे..? "
नेहा रागाने म्हणाली.
" मॅडमचा राग लई मोठा बाबा. तुम्हीच सांगा त्यांना."
राणे विक्रमला म्हणाला.
" हो.. मीच मारलं पारकरला."
विक्रम शांतपणे.
" ते आता जुनं झालं हो.. कारण काय ते सांगा.. "
-राणे.
विक्रमने आपल्या पाकिटातून एक फोटो काढून टेबलावर ठेवला.
" ही निकी… निकिता!
माझी बहीण. "
माझी बहीण. "
" तिचं काय मध्येच आता..? "
राणेच्या डोक्यावर आठया होत्या.
"हिचा मृत्यू झालाय.. सहा महिन्यांपूर्वी. अकॅसिडेन्टली. "
" सो सॅड..! पण त्याचा काय संबंध...? "
-राणे.
" निकी माझी जुळी बहीण..!
जुळी म्हणायला …
पण आमच्यात काहीच जुळत नव्हतं. दिसण्या बघण्यातही खूप फरक.काहीच पटायचं नाही आमचं लहानपणापासून.
मागच्या सात महिन्यापूर्वी अचानक ती शांत शांत राहू लागली. तिच्यातील बदल जाणवत होता.. पण कारण कोणाला कळेना.
मग एक दिवस तिनंच प्रस्ताव ठेवला..चिखलदऱ्याचा.
चेंज म्हणून आम्ही सगळेच गेलो. आणि तिथेच एका सेल्फी पॉईंटवर पाय घसरून ती कोसळली.. खोल दरीत.
ऍक्सीडेन्टल मृत्यू म्हणून तिची केस क्लोज झाली.
वयाची तेवीस वर्ष सोबत होतो आम्ही.. पण ती गेल्यावर तिचं महत्व जाणवयला लागलं मला.
आठवणीने रात्र रात्र झोप नाही लागायची.
एक दिवस असंच झोप लागेना म्हणून तिचं कपाट बघत होतो तर ही डायरी मिळाली.
त्यात नेहाच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे लिहिले होते.
त्यात नेहाच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे लिहिले होते.
नेहा निकीची मैत्रीण. त्यामुळं तिचं नेहमी जाणं येणं असायचं.
सात महिन्यापूर्वी अशीच त्यांच्याकडे गेली असता नेहा आणि सुरभीआंटी घरी नाही बघून पारकराने डाव साधला.
सात महिन्यापूर्वी अशीच त्यांच्याकडे गेली असता नेहा आणि सुरभीआंटी घरी नाही बघून पारकराने डाव साधला.
तेव्हापासूनच ती शांत झाली.
चिखलदरा.. सेल्फी पॉईंट वरील पाय घसरणे.. हा योगायोग नव्हता..!
मरण्यापूर्वी सगळ्यांसोबत आनंदाने काही क्षण घालवण्यासाठी तिनं प्लॅन केला होता. ती आत्महत्या होती तिची .
हे सगळं ह्या डायरीत तिनं आधीच नमूद करून ठेवलंय.."
डायरी टेबलवर ठेवत विक्रम म्हणाला.
" पण तू पोलिसात जायचंस ना भावा. कायदा का हाती घेतला? "
-सावंत.
" ह्या डायरीला पुरावा मानला असता तुम्ही? आणि असताही तरी जास्तीत जास्त कोणती शिक्षा दिली असती?
केव्हा..?
म्हणून मग मी नेहाशी जवळीक साधली. तीही माझ्यावर प्रेम करायला लागली.
मनात आलं असतं तर मी कधीही गैरफायदा घेऊ शकलो असतो.. पण बापाची शिक्षा तिला का म्हणून..?
मनात आलं असतं तर मी कधीही गैरफायदा घेऊ शकलो असतो.. पण बापाची शिक्षा तिला का म्हणून..?
लिली नावाची फेक आयडी वापरून त्याला जाळ्यात ओढलं.. त्या दिवशी दोघीं लग्नाला जाणार म्हणून बंगलोरच्या मिटिंगचं खोटं बोलून तो घरीच थांबला.. आणि रात्री मला बोलावलं..
पुढचं तुम्हाला ठाऊकच आहे.."
" ह्याची शिक्षा काय आहे.. माहित आहे तूला? "
दीर्घ श्वास सोडून राणेनं विचारलं.