Mar 04, 2024
रहस्य

मिस लिली! भाग -३

Read Later
मिस लिली! भाग -३


मिस लिली!
भाग -तीन.

रात्री अकरा साडेअकरा वाजता कोण जाईल त्या सोसायटीमध्ये? सावंत, वॉचमनला आणा पाहुणचाराला, आणि सिसिटीव्हीचे फुटेज मागवा तिथल्या सेक्रेटरीकडून." राणेनी ऑर्डर सोडली.


"साहेब.. मी काहीच नाही केलं हो." वॉचमन हात जोडत म्हणाला.


"हो काही नाही केला बे. पण एन्ट्री काऊन नाही केला कोण होती ती तं?" गालावर एक हाणत राणेने विचारले.

"साहेब, खूप सुंदर मुलगी होती. एकदम सेक्सी. माझ्या गालाला हात लावला तसा पिघलून गेलो मी.अनं जावू दिलं." तो आपला गाल चोळत म्हणाला.

"जसा आता माझा हात पडला अनं पिघल्लास तसा का?" आपल्या विनोदावर राणे एकटेच हसले.

"सर, हे फुटेज, त्या रात्रीचे. हा म्हणतो तशी मुलगी दिसत आहे इथे." सावंत म्हणाला.

"बाबोऽऽ वॉचमन भावा, माफ कर. एवढी आयटम बघून भलेभले पिघालायचे.. तर तिथे तू कोण?" राणेने कान पकडले.


"हे बघ. ही वर गेली साडेदहा वाजता आणि परतली बारा वाजता. म्हणजे ससपेक्टेड तर हीच वाटतेय.
मोबाईल उघडला का रे पारकरचा? पटकन कुंडली समोर मांडा." राणे.

*****

"मॅडम, हिला ओळखता तुम्ही?" सुरभी आणि नेहाला फुटेज दाखवत राणेने विचारले.

"नाही. कोण ही?" सुरभी.

"ही लिली. तीन महिन्यापासून मिस्टर पारकरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. कधी नाव वगैरे ऐकलंत तुम्ही?"

सुरभी मानेनच नाही म्हणाली.


"वॉचमन हा कोण रे? काय बोलतोय तुझ्याशी? " सावंत दुसऱ्या दिवशीचे फुटेज बघत म्हणाला.

"हे विक्रम दादा. नेहा मॅडमला भेटायला आले होते. घरी कुणी नव्हते म्हणून निघून गेले. केव्हा येतील वगैरे विचारत होते."
-वॉचमन.

"याला तरी ओळखता का?" राणे नेहाला म्हणाले.


"हो. हा विकी. माझा मित्र." -नेहा.


"मित्रच का आणखी काही?" राणे.

"इन्स्पेक्टर, तो माझा पर्सनल मॅटर आहे." नेहा चिडून म्हणाली.

"अरे? मॅडम पुन्हा चिडल्या. बोलवा मग तुमच्या पर्सनल मॅटरला इथेच. त्याचं काय ना मॅडम, आमच्याकडं असं काही पर्सनल वगैरे नसतं हो. सगळं कसं ओपनली. काय आलं ना लक्षात?" राणे म्हणाले.


"काय विक्रम साहेब? तुम्ही गेला होतात म्हणे पारकरांकडे?" विक्रम आला तसा राणेने प्रश्न केला.


"होय. नेहाचा फोन लागेना म्हणून ती आली की नाही हेच बघायला गेलो होतो."
-विक्रम.

"अहो, मित्र ना तुम्ही मॅडमचे? काय हो मॅडम, यांना कळवलं नव्हतं का तुम्ही केव्हा येणार ते?" राणेने नेहाकडे पाहिले.

"गावात नेटवर्क नव्हता, म्हणून बोलणं नव्हतं झालेलं." ती म्हणाली.


"ओके. विक्रम साहेब तुम्ही जावू शकता. मॅडम तुम्हीही जा. बाकी काही कळलंच तर बोलावू पुन्हा." राणे म्हणाले तसे बाकीचे निघाले.

*****
दुसऱ्या दिवशी..


"सावंत, काय रे, चालतंय का डोकं तुझं?"

"राणे साहेब. तुम्हीच बघा आणि काय ते समजा." स्क्रीनवरचे फोटो मार्फ करत सावंत म्हणाला.


"च्यायला! ही गोम आहे तर. माझा तर भेजा फ्राय झाला रे.
चला पुन्हा सगळ्यांना निमंत्रण धाडा." राणे डोके खाजवत म्हणाले.


सगळे परत पोलिस्टेशनला जमले होते.

"आता सगळयांनी खरं सांगायचं. का मारलंत मिस्टर पारकरांना? सुरभी मॅडम? नेहा मॅडम?

तुम्ही तरी काही बोला, विक्रम सर.. सॉरी सॉरी. मिस लिली?"
विक्रम पुढे दंडा आपटत राणे म्हणाला.


"विकी? लिली? काय बोलताय तुम्ही हे?" नेहा रागाने म्हणाली.

" मॅडमचा राग लई मोठा बाबा. तुम्हीच सांगा त्यांना." राणे विक्रमला म्हणाले.


"हो. मीच मारलं पारकरला." विक्रम शांतपणे.


"ते आता जुनं झालं हो. कारण काय ते सांगा." राणे.

विक्रमने आपल्या पाकिटातून एक फोटो काढून टेबलावर ठेवला.

:
क्रमश:
कोणाचा होता तो फोटो? आणि का केले विक्रमने असे? वाचा पुढील अंतिम भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//