Feb 28, 2024
रहस्य

मिस लिली! भाग -२

Read Later
मिस लिली! भाग -२


मिस लिली!
भाग -दोन.

स्सऽऽक ...
अचानक हातातील सूरी त्याच्या गळ्यावर फिरली
आणि रक्ताच्या चिरकांडया तिच्या चेहऱ्यावर उडल्या.

"शीट! पारकर, मेकअप खराब झाला ना माझा. पुन्हा टचअप करावं लागेल." ती वॉशबेसिन कडे जात हसत म्हणाली.

तीन दिवसानंतर..


"हॅलो, नेहा पारकर?"

"हो. मी नेहाच. आपण?" पलीकडून आवाज आला.

"मी इन्स्पेक्टर राणे. तुमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम झालाय. तुम्ही केव्हा येऊ शकता? "

"मी पोचलेच पुढल्या पाच मिनिटात." नेहाने कॉल कट केला.

"कुणाचा गं फोन?" रिक्षात शेजारी बसलेल्या तिची आई म्हणजे सुरभीने विचारले.

"अगं सोसायटी मध्ये प्रॉब्लेम झालाय. इन्स्पेक्टर होते." ती म्हणाली.

पाच मिनिटात त्या दोघी तिथे पोहचल्या. त्यांच्याच फ्लॅटसमोर गर्दी बघून थोडया भांबावल्या त्या.


"काय झालं इन्स्पेक्टर?" घाईने समोर येत नेहाने विचारले.

समोरचे दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली.

"पप्पाऽऽ"

गळ्यावर सुकलेले रक्त.. अर्धनग्न शरीर आणि कुजका वास.

"असं कसं हे घडलंय?" सुरभीने डोळ्याला पदर लावला.

"बॉडी पोस्टमार्टमला न्यावी लागेल मॅडम आणि तुम्हालाही पोलीस स्टेशनला यावं लागेल." इन्स्पेक्टर राणे नेहाकडे बघत म्हणाले.
*****


"तुमचा कोणावर संशय?" पोलीस स्टेशनमध्ये राणे विचारत होते.

सुरभीने नकारार्थी मान हलवली.

"त्यांचं काही एक्स्ट्रा मरायटल अफेअर वगैरे?"

"काय बोलताय इन्स्पेक्टर? ते खूप चांगले होते." नेहा संतापून म्हणाली.

"रिलॅक्स! रागावू नका. पण बेडरूम मधील बेडवरच्या त्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या, विरत आलेले लाल फुगे,
आणि त्यांचं अर्धनग्न शरीर.. ह्यावरून तर हेच दिसतंय.
आणि मी नाही, तुमच्या घरची सिच्युएशन सांगतेय हे."

"यू आर क्रॉसिंग युअर लिमिट इन्स्पेक्टर. आमच्यावर काय बेतलंय तुम्हाला जाणीव नाहीये याची." नेहा.


"रिअली?" राणे डोळे विस्फारून म्हणाले. "मग तीन दिवस त्यांना सोडून कुठे होतात तुम्ही दोघी?" त्यांनी रागाने विचारले.

"तुम्ही आमच्यावर संशय घेताय?" नेहा चिडली.


सुरभीने तिचा हात दाबला. "माझ्या मामाकडे लग्नकार्याला आम्ही खेड्यावर गेलो होतो. खूप फोर्स केला मधुकरला. पण तो नाही आला. बंगलोरला काहीतरी मिटिंग आहे म्हणाला, इमर्जन्सी. तो आज परतणार होता म्हणून आम्हीदेखील आजच आलो.

अफेअरबद्दल म्हणाल तर आमच्या लग्नाच्या चोवीस वर्षांत मला एकदाही असं जाणवलं नाही.

आम्हा तिघांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. खूप खुश होतो आम्ही.

हां, तो आता बंगलोरला का नाही गेलॅ? ती सजवलेली बेडरूम, त्याची ही अवस्था.. ह्याबद्दल काहीच माहिती नाही मला." सुरभी शांतपणे म्हणाली.

"ठिक आहे. पोस्ट मार्टम नंतर खरं कारण समजेलच. तुम्ही जावू शकता आता." राणे.


*****

"राणे, हा बघ रिपोर्ट. मानेवर सूरी चालली खरी, पण ताकद जरा जास्त होती. म्हणजे एखाद्या स्त्री पेक्षा जास्त. आणि मेन थिंग, त्याच्या गुप्तांगावर देखील सुरीने वार केलेत.पण मृत्यू मात्र गळ्यावरच्या वारामुळे झालाय." डॉ. सौरभ सांगत होते.

"पण कोणी का करेल असं?" राणे.


"हे शोधणे तुझे काम. मी फक्त मृत्युंचं कारण तेवढं सांगू शकतो. हां, आणखी एक. हा मर्डर प्रीप्लॅन होता. अगदी शांत डोक्याने केलेला. अलगद आपल्या जाळ्यात ओढून...
कारण झटापटीच्या कोणत्याच खुणा नाहीत शरीरावर." डॉ. सौरभ म्हणाले.

"काही शारीरिक संबंध?"

"ते नाही सांगू शकत. ऑलरेडी तीन दिवस झालेत. आणि त्या भागावर देखील वार होते. पण खुन मात्र त्याच रात्री झालाय. अकरा साडेअकराच्या दरम्यान."

"काही प्रेमभंग वगैरे? किंवा आणखी काही?"

"ते तू शोध मित्रा. मी माझं काम केलं."
-सौरभ.

"रात्री अकरा साडेअकरा वाजता कोण जाईल त्या सोसायटीमध्ये? सावंत, वॉचमनला आणा पाहुणचाराला, आणि सिसिटीव्हीचे फुटेज मागवा तिथल्या सेक्रेटरीकडून." राणेनी ऑर्डर सोडली.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

फोटो गुगल साभार.
लागेल का खुन्याचा शोध? वाचा पुढील भागात.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//