Mar 03, 2024
रहस्य

मिस लिली! भाग -१

Read Later
मिस लिली! भाग -१


मिस लिली!
भाग - एक.


टिंग टॉंग..

डोअरबेल आवाजाने तो लिविंग रूम मध्ये आला. त्याच्या आवडत्या डिओचा घमघमाट सुटला होता. घाईघाईत माऊथवॉश करून त्याने होल मधून बाहेर पाहिले.

बाहेर तीच होती, जिच्यासाठी तो एवढा तयार झाला होता.

दार उघडलं तशी ती आत आली. तिच्या अंगावर गुडघ्याच्याही वर असलेला लाल रंगाचा स्लीवलेस वनपीस. अंगाला पूर्ण चिपकलेल्या त्या ड्रेसमधून तिचे सौंदर्य उठून दिसत होते.


त्याने तिला खालून वरपर्यंत न्याहाळले. "परफेक्ट..!" त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले.


त्याला तसे बघून ती मंद हसली.

"पारकर.. तुझ्यासाठीच तर आलेय डिअर. डोन्ट लुक लाईक धिस!" त्याच्या नाकाला टिचकी मारत ती म्हणाली.


"ओह! मिस लिली. तुझी हिच अदा मला खूप आवडते.
डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड.." तोही हसला.

"काही खाशील?" त्याने विचारले.

"नाही, त्यापेक्षा काही प्यायला मिळेल का ते सांग." त्याला डोळा मारत लिली.

त्याने तिच्यासमोर बाटली उघडून दोन पेग तयार केले.

"चिअर्स लिली!" तिच्या ग्लासाला ग्लास लावत तो.

"पारकर, पुढचं सगळं इथेच?" त्याच्या मानेवरून हात फिरवत ती.

तिचा इशारा कळला त्याला. "तुझ्यासाठी सरप्राईज आहे लिली." तिच्या डोळ्यावर हात ठेवून तो तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला.

त्याने डोळ्यावरून हात काढला तशी आनंदाने ती वेडी झाली.

"वॉव! पारकर. तुझ्यातला रोमँटिक माणूस जिवंत आहे अजूनही." आतला नजारा बघून ती खूष झाली होती.


लाल गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला बेड..
हार्ट शेपचे लाल फुगे..
आनंदाने बेडवर तिने स्वतःला झोकून दिले. तोही तिच्या अंगावर चढणार, तशी ती बाजूला पलटली.

"पारकर, एवढी घाई काय आहे? हे तुझं सरप्राईज. आता माझं बघ." ओठावर कातिल हास्य होतं तिच्या.
त्याचा कलेजा तिथेच खलास झाला."रात अकेली है..
बुझ गये दिये.."

तिने गाणे सुरु केले. खुर्चीवर पारकर बसला होता.
हात मागे बांधलेले आणि डोळ्यांवर लाल सॅटिनची पट्टी.


"ओह, लिली. आता मला कंट्रोल होत नाहीये.
प्लीज, डोन्ट चेक माय पेशन्स डार्लिंग." तो उतावीळ झाला होता.

"हेऽऽय पारकर. यू नॉटी! इतनी जल्दी क्या है? ही लिली तर अक्खी रात्र तुझ्यासोबत घालवायला आली आहे आणि तू इतक्यातच?" त्याच्या शर्टच्या बटना उघडत ती म्हणाली.

त्याच्या छातीवर आपला मोरपीसाचा स्पर्श करीत ती हळूच त्याच्या कानात कुजबुजली, "पारकर, म्हातारा झालायस तू आता."

त्याच्या कानाचा चावा घेत ती जोरात हसली.

हळूहळू त्याच्या अंगावरच्या कपड्यांचा अडसर ती कमी करत होती.

"लिली, माझे हात सोड फक्त. मग दाखवतोच तूला अजूनही किती तरुण आहे मी ते." तो झटपटत म्हणाला.

"अरे, पारकर. आधी नेत्रसुख तर घे." ती त्याच्या डोळ्यावरची पट्टी ओठांनी सोडत म्हणाली.

तिचे उष्ण श्वास आणि बेधुंद करणारा पर्फ्यूमचा सुगंध. काही न घडताही त्याचे श्वास जोरात सुरु झाले.

तिने त्याच्या ओठाला मदिरेचा ग्लास लावला.

"बस्स! पारकर. हा शेवटचा. नंतर लिलीच्या पिंजऱ्यातून तू मुक्त. लाईक अ फ्री बर्ड! मोकळा. काहीही करायला." त्याच्या ओठांवर बोटांचा मधाळ स्पर्श करत ती बोलली.


तिची मादक नजर खिळली त्याच्या डोळ्यात. तोही अडकला.. अलगद तिच्या जाळ्यात!


स्सऽऽक ...
अचानक हातातील सूरी त्याच्या गळ्यावर फिरली आणि रक्ताच्या चिरकांडया तिच्या चेहऱ्यावर उडल्या.

"शीट! पारकर, मेकअप खराब झाला ना माझा. पुन्हा टचअप करावं लागेल." ती वॉशबेसिन कडे जात हसत म्हणाली.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*****

फोटो गुगल साभार.

कोण आहे ही लिली आणि का वागली ती अशी? वाचा पुढील भागात.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//