मिश्र डाळीचा डोसा

मिश्र डाळीचा डोसा

साहित्य

पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, पाव वाटी उडीद डाळ, दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या दही, मीठ चवीनुसार.

कृती

प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी  मिक्सरमधून काढून घ्या. त्या मिश्रणात दही घालून पुन्हा तासभर ठेवा. डोसे करतेवेळी चवीपुरते मीठ घालून डोशाच्या तव्यावर चमच्याने हे मिश्रण पसरवून कुरकुरीत डोसे तयार करा. व बटाट्याची भाजी किंवा हिरव्या चटणी सोबत खायला घ्या. हा पौष्टिक डोसा सर्वांनाच खूप आवडेल.

हिरवी चटणी

साहित्य

दोन कैऱ्या, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, दोन लसुन कळ्या थोडे जिरे व गूळ.

कृती

कैरी स्वच्छ धुऊन, पुसून त्याची साल काढा. त्याच्या फोडी करा. या कैरीच्या फोडी, पुदिना, कोथिंबीर, लसूण, जिरे, गुळ सर्व एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्या. ही आंबट गोड हिरवी चटणी खूप छान लागते.

कैरी काकडी चटणी

साहित्य

एक कैरी, एक काकडी, कोथिंबीर, तडका देण्यासाठी थोडे तेल, मोहरी, हळद व तिखट. चवीनुसार साखर किंवा गूळ व मीठ.

कृती

कैरी व काकडी स्वच्छ धुऊन, पुसून त्याची साल काढून किसून घ्या. त्यात चवीनुसार साखर किंवा गूळ व मीठ घालून मिक्स करून घ्या. व तेलात मोहरी, तिखट, हळद टाकून तडका द्या. ही पौष्टिक चटणी सर्वांनाच खूप आवडते.

चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ राहा.

फोटो साभार गुगल.

सौ. रेखा देशमुख