मिसळपाव

मिसळ पाव

साहित्य - 

१ वाटी मटकी, १ वाटी चवळी (बरबटी) व इतर साहित्य.


कृती -

मटकी व चवळी सकाळी पाण्यात भिजत घालणे. चांगले भिजल्या

वर रात्री कापडात बांधून रात्रभर ठेवणे. सकाळी मोड आल्यावर

दोन्ही कडधान्य वाफवून घेणे.



 दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन ते फोडून आचेवर भाजून 

घेणे. त्यात प्रमाणानुसार कोथिंबीर, लसूण जिरे अद्रक,

थोडा दाळवा किंवा थोडी हरबरा डाळ, भाजलेले सुके खोबरे

या सर्व वस्तू एकत्र करून मिक्सर वरून बारीक काढून घेणे. 

आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकणे व मोहरी टाकून

ती तडतडल्यावर मिक्सरवर बारीक केलेला सर्व मसाला टाकणे.

नंतर तिखट व हळद टाकून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेणे. 

सर्वात शेवटी थोडा तयार गरम मसाला घालून त्यात

वाफवलेली मटकी व  चवळी घालणे. चवीनुसार मीठ घालणे.

त्यात रस्सा म्हणून प्रमाणानुसार पाणी टाकणे. वरून कोथिंबीर

घालून पावासोबत खायला घेणे.


रूचकर व स्वादिष्ट मिसळपाव तयार.

मग वाट कसली बघतायं?

चला तर मग करा रेसिपीला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.

सौ. रेखा देशमुख