मृगजळ ( भाग ४ )
( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)
( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)
जालिंदरला भारतात जाऊन दोन महिने होऊन गेले. पहिल्यांदा एक दोन वेळा त्याचा फोन आला. पण नंतर फोन येण बंद झाले. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली तर ते ही काही नीट उत्तर देणे टाळत होते. रमोलाला आता काळजी वाटायला लागली. तरी "मैत्रिण, सहज म्हणून ही मला फोन करायचा नाही.
ताउजी खूप कडक आहेत" असे जालिंदरने आधीच सांगितले होते. त्यामुळे ती फोन करायला धजावत नव्हती. इकडे कामात तिचा दिवस निघून जाईल, पण रोज रात्री फोन करणारा जालिंदर एक दिवस ही फोन करत नव्हता. तिला वाट पहावी लागत नव्हती ती रमोला आता रोज जालिंदरच्या फोनची सतत वाट पहात होती. तीन महिन्यांनंतर जालिंदर परत आला. पण त्याने रमोलाकडे पाठ फिरवली होती. तो जाणिवपूर्वक रमोलाला टाळत होता. शेवटी एक दिवस रमोला त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली व म्हणाली, " यासाठीच मी पहिल्यापासून नाही म्हणत होते. तुला नसेल रिलेशनशिप पुढे न्यायची तर राहू देत, पण काय झाले ते तरी सांग? हे काहीच न बोलणे पूर्णपणे चूक आहे. " तेव्हा कुठे जालिंदरने तोंड उघडले, म्हणाला, " मैने माॅं को मना लिया था। वो तुम्हे देखनेके लिए तरस रही थी। लेकिन ताऊजी को ये बिलकूल पसंद नही है। उन्हाने मेरी शादी कही और तय करदी है। मै तुम्हे और दुःख देना नही चाहता, ना ही मै तुम्हे भूल सकता हूॅं।" जालिंदर रडायला लागला. अगदी लहान मुलांसारखे. तिलाही त्याची दया आली. मग ती म्हणाली, " ठीक है। मगर क्या हम यहाॅ शादी नहीं कर सकते? शादी हो जानेके बाद ही उन्हे बातएंगे। " खूप आशेने रमोला जालिंदरकडे बघत म्हणाली. " मै ये नहीं कर सकते। पापाजी गये तो मै बस तीन साल का था। ताउजीनेही मुझे बडा किया है। " जालिंदर आणखीन उदास होत म्हणाला. रमोला आता चिडून म्हणाली, " ये सबकुछ तो प्यार करनेसे पहले सोचना था। अब क्यूॅं सोच रहे हो? अब फायदा नहीं होगा। मै तभी ना बोल रही थी। अब तो कुछ नहीं होगा। अब तो शादी करनीही पडेगी मुझसे। " हे ऐकून जालिंदर आणखी घाबरला. ते पाहून रमोलाचा संयम सुटला. " बस आठ दिन की मोहलत देती हूॅं तुम्हे। सोडले, अगर नहीं तो फिर कभी अपना मूॅं मत दिखाना। " रमोला चरफडत निघून गेली.
आठ दिवस जालिंदरच्या मित्रांनी त्याला खूप समजावले. तेव्हा कुठे जालिंदर रमोलाशी लग्न तयार झाला. रमोला आणि जालिंदरचे रजिस्टर लग्न झाले, पण जालिंदरच्या ताउजींनी त्याच्याशी सगळे संबंध तोडले. त्याच्या माॅंचाही नाईलाज झाला. रमोलाची आई मात्र या लग्नानंतर खूप खूश झाली. आपल्या बरोबर आणलेले व जपून ठेवलेले सोन्याचे चार दागिने तिने रमोलाला दिले. आता प्रतिक्षा, रमोलाची आई तिच्या जबाबदारीतून मोकळी झाली असे तिला वाटत होते. जीवन अंकलना रमोलाच्या लग्न होण्याने काहीच फरक पडला नाही. रणजित थोडा नाराज झाला. पण तो ही बेफिकीरच वाटला. रमोलाने आजीला फोन केला. तिला सर्व सांगितले. आजीचा आशिर्वाद तिला खूप महत्वाचा वाटला. रमोला आणि जालिंदर दोघांचा संसार सुरू झाला.
पहिले नव्याचे दिवस मजेत गेले. पण हळूहळू कुरबुरी सुरू झाल्या. रमोलाने केलेले जेवण जालिंदर खात होता. पण त्याला माॅंच्या हाताची चव आठवायची. पंजाबी पद्धतीचे जेवण त्याला आवडायचे, रमोलाला ते येत नव्हते. त्यांचे सणवार, रितीरिवाज रमोलाला माहिती नव्हते. खूप भांडणे झाल्यावर रमोलाची आई मधे पडली. तिने जालिंदरला परिस्थिती समजावून सांगितली. " अगर वो नहीं जानती तो वो कैसे तुम्हारे त्योहार मना सकती है? तूम खूद अगर हमारे त्योहार नहीं जाते तो मना सकोगे? तूमही उसे तुम्हारे त्योहार समझादो, वो सब त्योहार मनाएगी। ' जालिंदरला समजले. त्याने रमोलाला सगळे त्योहार समजावून सांगितले. रमोला सर्व पंजाबी पद्धतीचे जेवण तिच्या मैत्रिणी कडून शिकली. तिने साजरे केलेले सणांचे फोटो जालिंदर मुद्दाम आपल्या मित्रांकडून त्याच्या आई पर्यंत पोचवत असे. रमोला पंजाबी पध्दतीचे जेवण किती छान बनवते हे पण त्याचे मित्र कौतुक करून त्याच्या आईला सांगत. त्यामुळे त्याच्या माॅंचे विचार हळूहळू बदलत होते. सगळे छान झाले. रमोला आणि जालिंदरचे संसार मार्गी लागला. त्यांच्या आयुष्यात आता नवा पाहुणा येणार होता. रमोलाला आता आयुष्यात काहीतरी मिळाल्याचे समाधान मिळाले होते. ती हरखून गेली होती. जालिंदरने ही बातमी त्याच्या आईला कळवल्यावर ती देखील आनंदली व तिने जालिंदरशी अबोला सोडला. ताउजींनी थोडे वरमले व त्यांनी रमोलासह जालिंदरला घरी बोलावले. जालिंदरच्या घरच्या लोकांनी रमोलाला आपले मानले, तिला स्वीकारले हेच रमोलासाठी खूप होते. सगळे गोड झाले, चांगले झाले.
क्रमशः
सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
मिरज
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा