Aug 09, 2022
कथामालिका

मीराची लव्हस्टोरी.. भाग २ अंतिम..

Read Later
मीराची लव्हस्टोरी.. भाग २ अंतिम..
मीराची लव्हस्टोरी भाग २(मागील भागात मीरा ने समीरला प्रपोज केले.... तेंव्हा समीरने संगितले की, तो माणूस नसुन एलीयन आहे..... हे ऐकून मीरा बेशुद्ध झाली... आता पुढे...)
कस वाटतंय मीरा?..... बाटलीतले पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडत समीरने विचारले..... मीरा काहीशी शुद्धीवर आली..... पहाते तर तिचे डोक समीरच्या मांडीवर होते.... तश्याही स्थितीत तिला बरं वाटलं..... कारण ती समीरवर मनापासुन प्रेम करत होती....समीर तु खरंच एलीयन आहेस?..... मीराने विचारले.... हो!..... मी खरंच एलीयन आहे.... आणि गेल्या शंभर वर्षा पासुन मी या पृथ्वीवर आहे!...मी आमच्या ग्रहावरचा सैनिक आहे...येथे पृथ्वीवर.... मला तुमचे चांगले विचार, नव नविन तंत्रज्ञान अश्या गोष्टीच्या अभ्यासासाठी पाठवले आहे........आमच्या ग्रहावरील बरेचसे सैनिक ब्रम्हांडातील अनेक ग्रहांवर अभ्यासासाठी गेलेले आहेत.... त्यांच्या पैकी मी एक.... मला तुमचा पृथ्वी ग्रह मिळाला ...समीर म्हणाला.....
याचा अर्थ तु हेर आहेस..... आणि पृथ्वीवर आमची हेरगिरी करायला आला आहेस तर?..... मीराने काहीश्या रागात विचारले...... हो!..... मी हेरगिरी करायला आलो आहे!..... मात्र चांगल्या गोष्टीची हेरगिरी...आणि यांत पृथ्वीवरील माणसांना इजा पोहोचवण्याचा आमचा कसलाही हेतु नाही... .आमचा ग्रह ब्रह्मांडातील अतिशय शांतिप्रिय ग्रहांपैकी एक आहे....... मीरा तु माझ्यावर खरं प्रेम करतेस ना!.... मग मला वचन दे.... मी एलीयन आहे.... या बाबत तु कोणालाही काही सांगणार नाहीस!.... समीर विनंती स्वरूपात म्हणाला......
हो!... मी वाचन देते!...मी कुणाला काहीच सांगणार नाही .... खरंच तु मला फार आवडतोस..... कारण तु दिसायला तर सुंदर आहेसच पण तूझा स्वभाव देखिल छान आहे... मीरा... काहीश्या लाडात म्हणाली....मीरा.... स्वभावाचे ठीक आहे... पण माझे खरे रूप असे नाही!...समीर म्हणाला.... तूझ खरं रूप म्हणजे?......मीराने विचारले.....मीरा तुला माझे खरे रूप पाहायचे आहे ?......मग डोळे बंद कर!........ मीराने डोळे बंद केले...... काहीवेळाने डोळे उघडून पाहते तर काय?........ तिच्या समोर.... अगदी कोई मील गया।....चित्रपटातील जादू समोर उभा आहे. असा भास झाला .....तेच डोळे.... तेच नाक..... अगदी तसाच चेहरा...... फरक फक्त उंची मध्ये होता... जादूची उंची कमी होती.... मात्र समीरच्या खऱ्या रुपाची उंची त्याच्या मानव उंची इतकीच होती ........
समीर!.... मी तूझ्यावर खरंच फार प्रेम करते रे! .. .....मला पण जादुचे रूप देऊन तूझ्या बरोबर घेऊन जा ना!...... ...मीरा! मी तूझ्या भावना समजु शकतो... मात्र ते शक्य नाही..... समीर समजावत म्हणाला...बरोबर!.....म्हणूनच माझ नाव मीरा आहे.... कारण मीराची प्रेमकहाणी कधिच पुर्ण होत नाही..... कारण ती देखिल कल्पनेतल्या कृष्णा वर प्रेम करायची..... तशीच काहीशी मी देखिल!....... ती मीरा ही दुर्दैवी!.... आणि ही मीरा देखिल दुर्दैवी!.... मीरा रडत रडत म्हणाली..... समीरने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.... मात्र त्याला फारसा काही नव्हता..... हे समीर आणि मीरा दोघं ही जाणुन होती......
आभ्यास सहलीच्या परतीच्या प्रवासात......... पुन्हा एकदा समीरने..... तेच डॉनचे गाणे परत संगितले.....मात्र या गाण्याद्वारे समीरला नक्की काय सांगायचे आहे.....हे फक्त मीराला समजत होते........ समीरच गाण संपल्यावर मीराला देखिल मित्रांनी गाण्याचा आग्रह केला ....मीरा बरीचशी नाराज होती.... तरिही मित्रांच्या आग्रहातर तिने गाण संगितले........ भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी... अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक काहानी...... मीराला या गाण्याद्वारे नक्की काय सांगायचे आहे... हे फक्त......नी ...फक्त.. समीरला...माहीत होत.....

समाप्त..


(कथा मोबाईल वर टाईप केल्याने काही चुका आहेत.... त्या बद्दल माफी असावी..)


लेखन: चंद्रकांत घाटाळ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक