Aug 18, 2022
कथामालिका

मीरा ची लव्हस्टोरी.. भाग १

Read Later
मीरा ची लव्हस्टोरी.. भाग १
मीरा ची लव्हस्टोरी..

अरे! मन मोहना!.... रे! मोहना!.......कळली देवा तुला राधिका रे राधिकाsss.... राधिका रे राधिका sss.... कळली राधिका रेsss.... कळल्या गोपीका sss.... कळल्या गोपीका sss......साधी भोळी मीरा तुला कळली नाही...... तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही.........अरे! मन मोहना रे! मोहना!.....
आज मीरा इतका मेकप करून कॉलेजला आली तरी समीरने आज देखिल तिला नजरअंदाज केले.... म्हणून मीरा मनातल्या मनात ते गाण गुणगुणत होती......मी दिसायला बऱ्यापैकी आहे... मी त्याच्यावर लाईन मारते हे सगळं माहीत असुन तो मला भाव देत नाही.....असा मीरा स्वतःशीच विचार करत होती...


समीर तिला भाव देत नसला तरी मीरा मात्र त्याच्यावर मनापासुन प्रेम करत होती.... .तिला तो फारच आवडायचा.... आपला जीवनसाथी समीरच हवा अस तिला मनोमन वाटे.....आज नाही पण कधीतरी समीर मला विचारेल या आशेवर ती होती.....


तसं समीर आणि मीरा यांचा दहा बारा जणांचा एकच कॉलेज ग्रुप ..... तसं समीर तिच्याशी कधिच बोलायचा नाही अस नाही....तर त्यांच्यात हाय हॅलो चे संबध होते...पण मीराकडे कधी तो त्या नजरेने पाहायचा नाही.... असे मीराला वाटे.... कारण त्यांच्या ग्रुप मध्ये.....मीराच्या नजरेत... मालिनी ( राधा), नेहा (सत्यभामा), चित्रा ( रुक्मिणी).... अश्या तिघी अजुन होत्या.... ज्या समीरशी फार जवळीक करतायेत अस मीराला नेहमी संशय .......पण समीर त्यांच्यावर नक्की कोणावर प्रेम करत होता का? या विषयी मात्र तिच्या मनात शशांकता होती...आज तीघी गप्पा करत होत्या इतक्यात मीरा तिथे आली..... त्यांच्या गप्पांचा सुर एकच होता... समीर किती क्युट दिसतो ना!.... तो जिच्या वर प्रेम करेल ती खरंच लक्की गर्ल असेल ना!..... मात्र तो आपल्या कोणालाच भाव देत नाही !......कोणावर प्रेम करत असेल तो?..... या सगळ्या गप्पा ऐकून मीराच्या मनांत लाडू फुटत होते..... कारण आपल्याला नाही तर नाही...पण समीर यांनाही भाव देत नाही तर.....
समीर दिसायला अतिशय सुंदर... अभ्यासातही हुशार.... कॉलेजच्या हर एक ऍक्टिव्हिटी मध्ये त्याचा सहभाग असायचा.... मात्र मुलींच्या बाबतीत मात्र तो फारसा रस घेत नसे...... कधी कधी मीराला संशय यायचा... समीर गे... तर नसेल?..किंव्हा तो कॉलेज बाहेरच्या एखाद्या मुलीवर तर प्रेम करत नसेल?. की अजुन दुसर काही कारण असेल?.. याचा बऱ्याचदा मीरा विचार करी...... कारण त्याच्या रूपावर कॉलेजच्या कितीतरी मुली पागल होत्या..... पण तो कोणालाही भाव द्यायचा नाही......आज मीराच्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता... कारण आज कॉलेजमधील एक टपोरी टाईप गॅंग जी मीराची नेहमीच छेड काढुन तिला त्रास देत असे.... आज मात्र त्यांनी कहरच केला... ही बातमी समीरला समजताच त्याने मस्त फिल्मी स्टाईल मध्ये त्यांची धुलाई केली होती..... त्यामुळे मीराला खात्री झाली की, माझी बदनामी समीरला सहन झाली नाही म्हणून त्याने त्या छेड काढणाऱ्या मुलांना मारले... म्हणजे समीरही आपल्यावर प्रेम करतोय तर.... या विचाराने ती आनंदली.....


समीर माझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याने त्या मुलांना मारले... ही बातमी जाणूनबुजून मीरानेच कॉलेजमध्ये पसरवली.... जेणेकरून दुसरी कोणती मुलगी समीरच्या मागे लागणार नाही....मारामारीच्या त्या घटनेनंतर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले होते की, समीर मीरावर प्रेम करतोय.... मात्र आज पर्यंत त्याने अस मीरा किंव्हा इतर कुणालाही संगितले नव्हते.... अजुन मीराने देखील समीरला संगितले नव्हते की ती त्याच्यावर प्रेम करते.... तसं मीराने बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता...मात्र आपल्या प्रेमाचा इजहार ती करु शकली नव्हती.....समीर आणि मीरा विज्ञान शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या कॉलेजची अभ्यास सहल ऐका विज्ञान केंद्रांवर जाणार होती.... ते विज्ञान केंद्र छान अश्या ऐका हिलस्टेशनवर होते..... चला अभ्यासाचा अभ्यास होईल आणि निसर्गरम्य वातावरणात मनसोक्तपणे फिरता देखिल येईल... त्यामुळे सगळी खूष होती....


या सहलीमुळे मीराचा आनंद तर आणखी द्विगुणित झाला...कारण फार कधीपासून तिला कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात जावेसे वाटतच होते.... त्यांत समीर देखिल जोडीला येणार होता... तिने विचार केला त्याच मदमस्त वातावरणात..... मी समीरला आय लव यु हे तीन जादुई शब्द सांगेन....... कोणास ठाऊक कदाचित मी सांगण्या आधी तोच मला प्रपोज करेल?..... असा विचार करून मीरा मनातून हसली.......आभ्याससहल निघाली..... बस मध्ये नुसती धम्माल.. कधी अंताक्षरी कधी विनोद तर कधी डान्स.... जो तो आपल्या अंगातील सुप्त गुण दाखवत होता....... समीरचा आवाज अतिशय चांगला होता.... कॉलेज गेदरिंग मध्ये तो दरवर्षी गायचा.... सगळ्यानी त्याला गाण्याचा आग्रह केला.... तेंव्हा त्याने गायला सुरवात केली...


अरे दीवानो...मुझे पहचानो... कहाँ सेआया में हूं कौन?...
मैं हूं कौन sss... मैं हूं कौन sss...मैं हूं मैं हूं कौन?.......बाकी सगळ्यानी डॉन ssss डॉन ssss......डॉन ssss... असा जोरदार कोरस प्रतिसाद दिला.......तुमने जो देखा हे। सोचा हे समजा हे जाना हे।... वो मैं नही ssss वो मैं नहीsss.... लोगों की नजरोने मूझको यहां जो भी माना हे। वो मैं नही।sss वो मैं नही sss तुम जानो ना जानो मैने तो जाना हे। मेहफील मैं कैसा हे कौन?...अरे! दीवानो ssss मुझे पहचानो... कहा से आया मैं हूं कौन?..... ssssमीराला वाटलं समीरला इतका आग्रह केला तर तो एखाद रोमेंटिक गाण सांगेल..... पण समीरने डॉनच गाण संगितले...... तसं ते गाण देखिल मीराचे फेवरेट होते... मात्र या सिच्युएशन ते सूट होत नव्हते ...अस तिला वाटले.... समीर एखाद प्रेमगीत गाईल अशी तीची अपेक्षा होती...त्यामुळे तिचा काहीसा मुड ऑफ झाला.....


गाडी विज्ञान केंद्रावर आली.....ऐका निर्जन ठिकाणी इतके मोठे विज्ञान केंद्र असेल याची कल्पना त्यांना नव्हतीच....गेटवर आले तेंव्हा समजले हे विज्ञानकेंद्र म्हणजे सरकारचा एक सिक्रेट पोजेक्ट आहे..... इथे कोणालाही परवानगी नव्हतीच.... या साठी कॉलेजने केंद्रसरकार कडुन स्पेशल परवानगी काढली होती..... कॉलेजची अभ्याससहल म्हणून परवानगी होती..... नाहीतर सर्वसामान्य लोकांना येथे आसपास देखील प्रवेश नव्हता....त्या सगळ्यानीं त्या विज्ञान केंद्रात प्रवेश केला..... एक वही पेन सोडून आत मध्ये काहीही नेण्यास बंदी होती... पाणी देखील नाही.... त्यामुळे मोबाईल वैगरे तर सोडाच.....केंद्रात आत मध्ये वेगवेगळी उपकरणे ठेवली होती..... त्यांत दोन अतिशय मोठे आणि अत्याधुनिक टेलिस्कोप होते.... सगळी मुलं ते पाहुन आपल्या वहीत नोंदी घेत होते...... मीरा देखिल आपल्या वहीत नोंदी करत होती.....नोंदी करता करता ती समीरकडे पाहत होती.... तो एक नजर तरी आपल्याकडे मारेल अशी तीची माफक इच्छा..... मात्र समीर ती उपकरणे फार लक्ष देऊन पाहत होता.... मीराकडे त्याने अजिबात लक्ष दिले नाही.... याचे मीराला फार वाईट वाटले.... .आवश्यक त्या नोंदी घेवुन सगळी मुलं बाहेर पाडली..... आता त्यांना हिलस्टेशन पहायला मोकळीक होती...... मीरा समीर जवळ आली व म्हणाली....समीर मला तुझ्याशी जरा बोलायच आहे!..... तो सनसेंटपॉईंट दिसतोस ना तिथे जाऊ!.... ठीक आहे! समीरने होकार दिला.....

ऐका छान अश्या उंच टेकडीवर तो पॉइंट होता.... बाजुला खोल दरी होती... ...सुरक्षा म्हणून पॉइंट वर लोखंडी दांड्या बसवल्या होत्या... त्या मनौरम्य ठिकाणी ती दोघंच होती..... बोल काय बोलायच होत तुला माझ्याशी?.... समीर म्हणाला..... कस सांगु तुला?....काही सुचत नाही.... मीरा म्हणाली..... आय लव्ह यु!.... ...... मीराच्या आय लव यु वर समीरच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसले नाही...... कदाचित मीरा कडून त्याला तेच अपेक्षित होते..... मीरा कस सांगु तुला?..... तो म्हणाला..... काही नको तु माझ्यावर प्रेम करतोस की नाही इतके फक्त सांग.... बाकी काही नको.... काहीश्या लाडीक स्वरात ती म्हणाली......


मीरा!..... मीरा!!... कस सांगु तुला..... मी तूझ्यावर प्रेम नाही करु शकत.... समीर चिंतेत म्हणाला....... का नाही?..... गे आहेस?.... दुसऱ्या कोणावर प्रेम करतोस?.... की, मी तुला आवडत नाही?..... मीरा काहीश्या आवेशात म्हणाली.... तु समजतेस असल काही नाही!...... मी तूझ्यावर प्रेम नाही करु शकत बस!..... समीर समजावत म्हणाला......अरे! नक्की तुझी अडचण तरी काय?... ते सांग ना मला!...... आपण काहीतरी मार्ग काढू त्यातुन... आता मीरा काहीश्या नरमाईने म्हणाली.... ते कारण मी तुला नाही सांगु शकत..... समीरच्या या बोलण्याने मीरा रागा रागात त्या दांड्यावर चढली..... हे बघ समीर मी तूझ्यावर अगदी दीलो जान से प्रेम करते.... तु जर खरं खरं संगितले नाहीस तर आता येथुन उडी टाकून जीव देईन मी माझा!.........मीराचा तो रुद्र अवतार पाहुन समीर आवक झाला... ...त्याला माहिती होते मीरा त्याच्यावर खरं प्रेम करते.... त्यासाठी ती उडी मारायला देखिल मागे पुढे पाहणार नाही...... सांगतो!..... सांगतो!!... तु आधी खाली ये पाहु!... समीर विनंती करत म्हणाला..... तशी ती खाली उतरली.....


बघ आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन एक!.... मी तूझ्यावर प्रेम करु शकत नाही.... कारण..... कारण मी इथला नाही म्हणून!........समीर म्हणाला..... इथला नाही म्हणजे?....मी कुठे तूझ्या राज्याचे प्रमाणपत्र मागितले.....तु परप्रांतीय आहेस इतकंच ना!... मग मला काहीच हरकत नाही.... मीरा काहीशी बेफिकीर पणे म्हणाली....... अग मीरा कस सांगु तुला मी?........मी इथला नाही म्हणजे मी पर प्रांतातला....काय पण तुमच्या या पृथ्वीवरचा देखिल नाही... मी दुसऱ्या ग्रहावरचा प्राणी आहे!..... तुमच्या भाषेत एलीयन!...... एलीयन!!.. समजल?...... समीरच्या त्या वाक्याने... मीरा शॉक झाली.... तीच डोक गरागरायाला लागले व ती बेशुद्ध झाली......

क्रमशः...

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने बऱ्याच चुका आहेत त्याबद्दल माफी असावी)

(पुढचा भाग लवकरच वाचायला मिळेल..)


चंद्रकांत घाटाळ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक