मीरा सधन कुटुंबातील असली तरी राघवशी आपली बरोबरी होऊ शकत नाही, हे तिला माहीत होते. 'रेगे 'कुटुंब हे शहरातील प्रसिद्ध एक व्यावसायिक होते. योगायोगाने मीरा त्या कुटुंबाशी जोडली गेली होती. राघव विषयी तिच्या मनात निर्माण झालेल्या भावनेमुळे आपली मैत्री तुटू नये म्हणून मीरा राघवपासून थोडा लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली. शिवाय तिचे परदेशी उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे, आपल्या आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्याकडे दुर्लक्ष होऊ द्यायचे नव्हते तिला. त्यामुळे राघव विषयी वाटणारे प्रेम तिने कधी व्यक्त केले नाही.
फायनल परीक्षा जशी जवळ आली तसे मीराने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. राघवच्या घरी तिचे येणे- जाणे आता कमी झाले होते. मधेच तिला राघवची आठवण अस्वस्थ करे.
इकडे राघवची अवस्था ही मीरा सारखीच होती. मीराचा शांत, प्रसन्न आणि हुशार व्यक्तिमत्व, दुसऱ्याला समजून घेणारा मनमोकळा स्वभाव यामुळे राघव नकळत तिच्या प्रेमात पडला होता. पण मीरा विषयी वाटणारे हे केवळ आकर्षण आहे की प्रेम? हे कळत नाही तोपर्यंत तिच्या सोबत या विषयी काहीही बोलायचे नाही असे ठरवून त्याने ही स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले.
परीक्षा संपल्या. निकाल ही जाहीर झाले. अपेक्षे प्रमाणे मीरा कॉलेज मध्ये पहिली आली आणि जेमतेम काठावर पास होणारा राघव 61%मिळवून पास झाला. मिसेस नूपुर आणि मिस्टर रेगे यांनी राघव चांगल्या मार्कांनी पास झाल्याचे सारे श्रेय मीरा ला देऊन तिला परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यास तिची मदत केली.
राघवला सोडून परदेशी जाणे मीरासाठी अवघड होते. दोन -तीन वर्षांचा तर प्रश्न होता. शिवाय अशी संधी तिला पुन्हा मिळाली नसती. तिचे राघव वर प्रेम होतेच, पण राघवच्या मनात आपल्या विषयी काय भावना आहेत याची कल्पना तिला नव्हती. राघवला ही जाणवत होते की आपण मीरा पासून फार काळ लांब नाही राहू शकणार.
मीरा परदेशी गेली आणि ठरल्याप्रमाणे राघवने आपली कंपनी जॉईन केली. आपल्या मॉम आणि डॅड च्या मार्गदर्शनाखाली तो कंपनीत काम करू लागला. गरज भासेल तिथे मॉम आणि डॅड सोबतच मीरा चा सल्ला ही घेऊ लागला. एखादा अवघड निर्णय घेताना मीरा कशी वागली असती असा विचार करून निर्णय घेऊ लागला. राघव मीराकडून खूप काही शिकला होता. राघव परीक्षेत नापास झाला असता तरी त्याने कंपनी जॉईन केली असतीच पण मीरा कडून मिळालेल्या प्रेरणेमुळे त्याला एक योग्य दिशा मिळाली होती. यामुळे मॉम आणि डॅड ही खुश होते.
आज मीरा इथे असायला हवी होती.. हो ना मॉम!एक महत्वाची डील फायनल झाल्यावर राघव आपल्या मॉम ला म्हणाला.. कंपनीत आत्मविश्वासाने वावरणारा...जबाबदारीने काम करणारा, मीरा ची आठवण काढताच चेहर्यावरचे बदललेले हावभाव पटकन लपवणारा राघव पहाताच मिसेस नूपुर ना जाणवत होते की राघव मीराच्या प्रेमात असावा.. पण या विषयी राघव स्वतः कबुली देत नाही तो पर्यंत त्या राघवला काही विचारणार नव्हत्या.
गेल्या तीन वर्षात राघवने कंपनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली होती. कंपनीचा सक्सेस ग्राफ ही वाढला होता. राघवचे काम, डेडिकेशन पाहून मॉम, डॅड आणि घरची सारी मंडळी खुश होती. आज त्याला मीराची आठवण जास्तच अस्वस्थ करू लागली. मीराला आज मनातलं सार काही सांगायचं म्हणून त्याने तीन -चार वेळा मीराला व्हिडिओ कॉल करून ही तिने उचलला नाही. मग मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याने मीराला एक छानसे लेटर लिहिले..
रात्री घरी गेल्यावर अचानक मीराला समोर पाहून राघवला एकदम 'सरप्राइज' मिळाले. परदेशातला अभ्यासक्रम पूर्ण करून मीरा भारतात पुन्हा येणार हे राघवसाठी एक छान सरप्राइज होते मीराचे... मीराला समोर पाहून राघवला खूप आनंद झाला होता.. संधी मिळताच कुणाच्या नकळत त्याने लिहिलेले पत्र मीराच्या हाती दिले.
"मीरा...आज मी जे काही आहे ते केवळ फक्त तुझ्यामुळेच. तू प्रेरणा दिलीस मला, ध्येय दिलेस. माझ्या जीवनाला नवीन दिशा दिलीस..आपली भेट, मग झालेली छान मैत्री... नकळत तुझ्या स्वभावाच्या प्रेमात पडलो मी.. तू परदेशी गेलीस आणि तुझा विरह खुप काही सांगून गेला.. कंपनीत अगदी झपाटून काम केलं, मॉम आणि डॅड ही आता निश्चिंत झालेत. तुझ्या येण्याने माझे आयुष्य खूप बदलून गेलयं.. अशीच आयुष्यभर साथ देशील मला? "
फक्त तुझाच राघव.
हे वाचून मीराला फार फार आनंद झाला. तिच्यासाठी अनपेक्षितच होत सारं..
राघवच्या मनात आपल्याविषयी ही भावना असेल याचा अंदाज ही तिला कधी आला नव्हता. तिचे ही राघववर प्रेम होतेच.. तिने कधी ते व्यक्त केले नव्हते, इतकेच..
दुसऱ्याच दिवशी मीराने आपला होकार राघवला कळवला. आता मीराचे ही आपल्यावर आधीपासूनच प्रेम होते ,हे ही राघवसाठी सरप्राइजच होते...
पुढे अर्थातच सर्वांच्या संमतीने मीरा आणि राघवचे लग्न अगदी रीति-रिवाजानुसार धूमधडाक्यात पार पडले..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा