मीरा आणि तिचा प्रवास

Journey of love..

सिद्धू ने मिराला मैत्रिणीच्या घरी पोहचवले. आरती मीरा ची
खूप जवळची मैत्रीण. त्यामुळे अशा परिस्तिथी मधे मिराला
माहेरी जाण्यापेक्षा आरतीच्या घराचे दार जवळ करावेसे
वाटले. आरती आणि राघव ने मिराचे हसत स्वागत केले.
सिद्धू आणि राघव ची ओळख नवी होती. दोघांनी एकमेकांना
हस्तांदोलन केले.

सिद्धू  :  "  सिद्धार्थ कदम "

राघव :  " राघव पवार.. "

राघव मिराला आपल्या लहान बहिणी प्रमाणे मानत असे.
आणि आरती तर मीरा ची बेस्ट फ्रेंड होतीच.

आरती : -." काय झालं मीरा, अस अचानक येण्याचा निर्णय
घेतलास तू. काही भांडण वगैरे झालं आहे का..?"

मिराला काय सांगावे, काय बोलावे , कुठून सुरवात करावी
ते कळत नव्हते. मीरा जरा अस्वस्थ होती.

राघव  :- " आरती, आपण बोलू त्या विषयावर नंतर. आधी
आपण सगळे जेवण करून घेऊया.."

सिद्धू : "  सॉरी, पण तुम्ही चालू द्या जेवणं.. मला आता निघावं लागेल. मला परत जायचं आहे.. मिराला एकटीला
सोडणे योग्य वाटत नव्हते म्हणून इथपर्यंत आलो.."

राघव :  " जेवल्याशिवाय आम्ही तुम्हाला परवानगी देणार
नाही आहोत. "
मीरा : " हो सिद्धू, तू जेवण करून मग निवांत जा..हे घर
माझंच आहे समज..."

राघव आणि सिद्धू मध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. कामाचे
आणि इतर विषयांवर त्यांची चर्चा सुरु झाली.
मीरा आणि आरती किचन मध्ये आवराआवर करत होत्या.
             थोड्या वेळाने सिद्धू निघून गेला.

 

मीरा चा निर्णय आता फक्त दोघं नवराबायको मधला राहिला
नव्हता. प्रतीक आणि मिराच्या आईवडिलांना या निर्णयापासून फार दिवस लांब ठेवता येणे शक्य नव्हते.
नातेवाईकांमध्ये देखील चर्चा होणे स्वाभाविक होती.
संसार मोडणे काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यातही आजवर
कधीच मीरा आणि प्रतिकच्या कुठल्या भांडणाविषयी
काही कुणकुण देखील कानावर आली नव्हती.
प्रत्येकजण मिराला समजावण्याचा प्रयत्न करत होते..
अर्थात, आपल्या कडे स्त्रियांनीच माघार घेणे अपेक्षित
असते.
भांडण तसे फार मोठे नव्हते. प्रतीक मिराच्या वागण्याने
फक्त दुखावलाच नव्हता तर त्याला आश्चर्य देखील वाटत
होते. मीरा मध्ये असा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास कसा
आला हे देखील त्याला कळत नव्हते.
सुरवातीला सगळे नातेवाईक मिरावर नाराज होते.
मिराचे वागणे कुणालाच पटत नव्हते.
प्रतीक ला घडत असलेल्या घटना एक वाईट स्वप्नासारखे
भासू लागल्या... त्याचं रुटीन बिघडायला लागले.
कामात लक्ष लागत नव्हते. भांडण कसे मिटवावे हे देखील
कळत नव्हते..

मीरा रोज स्वतःसाठी वेळ देत होती. स्वतःच्या पायावर उभं
राहण्यासाठी, सन्मानाने जगता यावे यासाठी काय करता येईल याचा विचार करत होती. शिक्षण आणि नौकरी सोडून
अनेक वर्षे झाली होती, त्यामुळे जगाच्या बरोबरीने चालणे
सहज शक्य नव्हते...पण मनात ठाम निर्णय घेतल्याने
मिराने अवघड गोष्टींना तोंड देण्याचे ठरवले.
अशक्य गोष्टी शक्य करण्याचे धाडस करण्याचे ठरवले.
आता जगाचा, समाजाचा विचार करून चालणार नव्हता.
पुढे जाण्यासाठी किंमत मोजावी लागणारच होती.

                   प्रतीक मिराला घटस्फोट देणार नव्हताच पण
मीरा देखील घटस्फोट मागणार नव्हती..
पण मिराला घरी परत आणण्यासाठी प्रतीक ला काही अटी
मान्य कराव्या लागणार होत्या..ज्या त्याला मान्य करण्याची
इच्छा नव्हती..

प्रत्येक भांडण हे अहंकारासाठी नसते...प्रत्येक वेळी राग
हा द्वेष नसतो. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याकडून
वेगळ्या अपेक्षा असतात.
त्याच रुजलेल्या वाटेवर चालत राहणे म्हणजे आयुष्य नीट
नेटके जगणे असे होत नाही.
नाकासमोर चालणारा माणूस सभ्य असू शकतो.. पण
त्याने निवडलेल्या सरळ रस्त्यावर आयुष्यातील अनेक गोष्टी
ला तो मुकलेला असतो.
जोडीदार हा सहप्रवासी असतो. असे असले तरी त्याचं
स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते.
त्याग आणि समर्पणाचा अर्थ गुलामी असा होत नाही.

सहज सामान्यपणे दिसणारी प्रतीक आणि मीरा ची कहाणी
आपल्याला समाजात बरेच ठिकाणी पहायला मिळते.
समाज अशा वेळी कुणाची कुठे चुकी आहे..?कुणी काय
करायला पाहिजे..? यावर सल्ले देण्यात मग्न असतो.
प्रत्येकाला मोडण्यापेक्षा जोडून ठेवणे महत्वाचे वाटते.
अशा वेळी प्रतिकची देखील एक बाजू आहे..
आणि मिराची तर बंडखोरी आहे...
मुळात कोण चुकले यापेक्षा काय चुकले हे पाहणे महत्वाचे
आहे...पण चुकीची जबाबदारी एकाच्या खांद्यावर टाकली
म्हणजे सल्ला देणे सोपे जाते... त्यासाठी एकाला आरोपीच्या
पिंजऱ्यात उभे केले म्हणजे झाले सगळे..
अशी विचारसरणी कधीच व्यक्तीला, आणि परिस्थितीला
योग्य न्याय देऊ शकत नाही...

सिद्धू ला मीरा किंवा प्रतीक कुणा एकाची बाजू घायची
नव्हतीच. पण कुणी माघार घ्यावी, आणि कुणी दोन
पाऊले पुढे यावे याचा निर्णय मात्र परिस्थिती पाहुन घेण्यात
यावा असेच वाटत होते...
मिराला तो चांगलाच ओळखत होता, त्यामुळे तिने घेतलेल्या
निर्णयामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता
येत नव्हती...
क्षुल्लक कारणावरून मीरा अटी तटीला जाईल असा
स्वभाव मिराचा नव्हताच... तर जाणीवपूर्वक मिराला
त्रास देण्याचा स्वभाव देखील प्रतीक चा नव्हता...

प्रत्येक गोष्टीवर काळ हेच उत्तम औषध असते..
त्यानुसार काही दिवस जाऊ देणे हेच हिताचे होते...
दरम्यान दोन्ही घरची वडीलधारी माणसे एकत्र येऊन
या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवत असताना...
       मिराने आयुष्याचा निर्णय कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय
घेण्याचे ठरविले...
सिद्धू चा यासाठी मिराला पूर्ण पाठिंबा होता...तरीही एकदा
त्याला प्रतीक आणि मिराची पूर्ण बाजू माहीत करून घेणे
गरजेचे वाटत होतेच...


 

                                क्रमशः..
 

                          

 

🎭 Series Post

View all