Login

बेधुंद मन

बेधुंद झालेले मन !

शीर्षक:~ बेधुंद मन(मुक्तछंद)

बेधुंद मन हे होते
जेव्हा तू बरसतोस
होते मन हे बैचेन
तेव्‍हा तू असा येतोस

तप्तभूमी वाट पाहे
तुझ्याही आगमनाची
सजली पूर्ण धरती
पुन्हा जलधारांसाठी

नेसला हिरवा शालू
भेटवस्तू दिली धरणीला
सरींच्या आवाजातच
पाने,फुले आली सोबतीला

लाजरा अवखळ ऋतू
बनवतो हिरवे सर्व
वर्षानुवर्षे चालते हे
सृष्टी बहरण्याचे पर्व

पाहूनी निसर्गाचे रुप
भान माझे हरपले
होताच थेंबाचा स्पर्श
अंगअंग माझे मोहरले

रुप निसर्गाचे मोहक
पाहून मन बावरले
बघुनी निसर्गसुख
मन का रे शहारले

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all