
ज्याचा कधी थांगपत्ता कळत नाही असे असते मन
ज्याचा कधी वेग मोजता येत नाही असे असते मन
ज्याला कधी आवर घालणे अवघड असते असे असते भरकटणारे मन
नेहमीच आपल्या मनासारख होत नसतं
कुणाच्या सुखासाठी आपल मन माराव लागत
कधीतरी आपल्या मनासारख होत असतं
तेव्हाही कुणाच तरी मन दुखत असतं
मन जुळायला
वेळ लागत नाही
पण एकदा मन तुटले की
जुळायला मन होत नाही
मन असे का असते ?
सारखेचं पळत असते
कधीच कसे स्थिर नसते
आपले कधी ऐकत नसते
जर शुद्ध असेल
आपले मन
तर समृद्ध होईल
आपले जीवन
बुद्धी व्यवहारी आणि
मन भावनिक असते
दोघांची सांगड घालणे
खुप अवघड असते