Jan 23, 2022
वैचारिक

मन.....

Read Later
मन.....

मन कधीच समजणारं नाहिये
तरीही त्यावर बंधन टाकायचंय,
खुप काही ठरवत
नव्याने जगायचंय.

उदिग्न झालेल्या मनाला
आता शांत करायचंय,
घडुन गेलेलं बऱ्यापैकी विसरत
एक सुंदर स्वप्न पहायचंय.

मन नावाच्या पाखराला 
आता कुठेतरी गुंतवायचंय,
वाट चालत कितीही पुढे गेलोतरी
स्वतःचं अस्तित्व जपायचंय.

क्षितिजाकडे बघत त्याला 
ओलांडायचं स्वप्न पाहायचयं,
त्याचा पाठलाग करत
वनवन भटकायचंय.

काहीतरी ठरवून झालेलं विसरून
खुप पुढे जायचंय,
काही आठवणींना मात्र गोड कुपीत ठेऊन
प्रत्येक क्षणाला जगायचंय.

भावनांना आवर घालत
पुन्हा एकदा स्वतःशीच बोलायचंय,
कुणावरही हक्क न गाजवता
पुन्हा एकदा स्वतःमध्ये मिसळायचंय.

कारण
मन कधीच समझणारं नाहीये
मन कधीच समजणारं नाहिये........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

.

Student

.