Login

Mind Is Crezy मन हे बावरे

काल्पनिक कथा
येऊन फ्रेश झाली आणि आता बेडवर येऊन बसली होती आणि आज जे दिवसभर काही झालं ते आठवत होती ते आठवताच नकळत गालावर शरमेची लाली चढत होती तिच्या ... ति दोन्ही पाय दुमडून बेडवर शांत बसली होती आणि हलकेच त्याच्या विचारांनी हसत होती तितक्यात रुमचा दरवाजा वाजला तसं ती गोंधळून गेली आणि घाबरली सुध्दा .... 

कोण आहे .... नंदिनी हळूच म्हणाली ... तुझी सवत उघड दार ... बाहेरुन आत्या च्या मुलीचा म्हणजेच पुजा चा आवाज आला तसं नंदीनी ने एक दिर्घ श्वास घेऊन सोडला .... आणि हळूच उठून दरवाजा जवळ आली आणि दरवाजा उघडला तर समोरचं पुजा तिला रागात बघत असताना दिसली ....

काय झालं इतकी का चिडली आहेस .... नंदिनी ने विचारल ....

जोपर्यंत तु माझ्या आयुष्यात आहेस ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात काही सुख नाहीय कैदाशिन बनून माझ्या आयुष्यात आलीयस .... पुजा म्हणाली ...

तसं नंदीनी च्या मनाला ते लागल आणि डोळे टचकन पाण्याने ओले झाले ....

काय झालंय बोल काय केलय मी आता .... नंदिनी ने शांत होत विचारलं ....

कोणासोबत आली होतीस आता त्या कार ने नंदीनी तु पृथ्वीराज इनामदार सोबत काय करत होतीस तुला माहित तरी आहे का तो कोण आहे ते नंदीनी आधीच सांगते लायकीत रहायचं समजलं लांब रहायचं त्याच्या पासून पुजा नंदीनी ला आपली तर्जनी दाखवून गेली तसं नंदीनी ने दरवाजा बंद केला आणि तशीच बेडवर बसुन उशी घेऊन रडू लागली ....

हेच तर व्हायच नेहमी तिच्या सोबत कोणीही येऊन तिला काही ही बोलून जायचं तिची चुक नसताना .... पण आता पृथ्वी सरांचा आणि हिचा काय संबंध ..... नंदिनी विचारात पडली होती ....

पण त्या ही  पेक्षा पुजा चे शब्द तिला लागले होते ती तशीच पडल्या पडल्या झोपली .....

दुसरीकडे पृथ्वी आपल्या रुममध्ये बसून ड्रिंक चे ग्लास रिचवत होता समोर काळा कुट्ट अंधार पसरला होता आणि तो सोफ्यावर आरामात बसून ड्रिंक करत होता आजचे नंदीनी सोबत घालवलेले क्षण मनाच्या एका स्पेशल जागी साठवून ठेवले होते त्याने ... त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित पसरलं तिचा विचार डोक्यात येताच ....

मुस्खुरान की वजह तुम हो
गुनगुनाने की वज़ह तुम हो
जिया जाए ना,  जाए ना, जाए ना
ओ रे पिया रे…
ओ रे लम्हें तू कहीं मत जा
हो सके तो उम्र भर थम जा
जिया जाए ना, जाए ना, जाए ना
ओ रे पिया रे…

जिया जाए ना, जाए ना, जाए ना
ओ रे पिया रे…
पिया रे…

धुप आए तो.. छाँव तुम लाना
ख़्वाहिशों की बारिशों में
भीग संग जाना

जिया जाए ना, जाए ना, जाए ना
ओ रे पिया रे…
जिया जाए ना, जाए ना, जाए ना
ओ रे पिया रे…
पिया रे…
ऊऊ…त्याच्या मनाच्या खोल दरीत सध्या हे गाणं वाजत होत नंदीनी आणि तिचं वागणं खुप वेगळ होत आणि ते त्याला तिच्या प्रेमात वेडा व्हायला भाग पाडत होत .....

Ohh beby mind is crezy for you I am crezy for you my sweetheart ..... पृथ्वी म्हणाला आणि ते ड्रिंक च ग्लास ठेवून आत आला आणि बेडवर पडला ....

लवकरच तु इथे माझ्या बाजूला असशील mock my words  आणि तेव्हा एक क्षण ही माझ्या पासून लांब नाही करणार मी तुला .... पृथ्वी मनातच म्हणाला आणि डोळे बंद करुन झोपला ....

******

सकाळी नंदीनी उठली आणि कोणीही उठायच्या आतच शामु काकांना सांगुन लवकरच निघाली ....

ती लवकरच इनामदार इंडस्ट्रीत आली आणि आपल्या डेस्क वर बसून आपलं काम करु लागली कोणीही आलं नव्हतं फक्त क्लिनिंग स्टाफ होता जो साफसफाई करत होता ....

तिने लवकर मेल ओपन केले आणि चेक केले तर समोरचा मेल पाहून तिला धडकीच भरली कारण दुबईला दोन दिवसांनी जायचं होतं ते ही एक महिना ..... तिची ह्रुदयाची धडधड कैक पटीने वाढली .....

देवा मला तर जायचं आहे दुबईला या नेहमीच्या वातावरणातून थोडासा तरी चेंज मिळेल पण घरी आत्या तिला काय सांगू ती शिव्याच घालेल .... पण नंदीनी जायचं आहे तर काही तरी करन भाग आहे .... नंदिनी विचार करु लागली तोच तिला रिमा आठवली ....

येस रिमा .... पण ती तर आजच जाणार आहे ना .... आणि आम्ही उद्या ..... शिट मलाच काही तरी करावं लागेल .... नंदिनी म्हणाली आणि फोन हातात घेतला ‌....

आणि आत्या चा नंबर डायल केला .... समोरुन दोन रिंग मध्ये फोन उचलला गेला ....

बोल ग आज गेलीस ते सांगितल नाहीस ठिक आहेस ना .... आत्या ने विचारल ....

आणि नंदिनी काही वेळ गप्प झाली आत्या आणि इतकी चांगली बोलतेय तिला विश्वास बसेना ....

हो आत्या मी ठिक आहे ... ते आज खुप काम आहे म्हणून लवकर आले .... नंदिनी म्हणाली ....

बरं ठिक आहे मी शामू ला पाठवते डब्बा घेऊन .... आत्या म्हणाली .....

आत्या म.. मला बोलायचं आहे महत्वाच तुझ्याशी .... नंदिनी हिम्मत करुन म्हणाली ....

बोल .... आत्या म्हणाली ....

आत्या काही कामासाठी मला पुर्ण स्टाफ सोबत दुबईला जायला लागणार आहे एक महिना .... नंदिनी हिम्मत करुन म्हणाली....

काय एक महिना आणि दुबईला .... आत्या म्हणाली

हो आत्या .... नंदिनी म्हणाली ....

बरं ठिक आहे जा .... पण लवकर यायचा प्रयत्न कर .... आत्या म्हणाली आणि फोन ठेवला .....

नंदिनी त्या फोन कडे बघत होती .... आज आत्या इतकी चांगली कशी काय वागली .... असेल .... नंदिनी म्हणाली आणि खुश होऊन काम करु लागली .... आता ‌दुबईला जायला भेटणार म्हणून खुप खुश होती .....


🎭 Series Post

View all