बाजुला झाला तसं इतका वेळ धरुन ठेवलेला श्वास नंदीनी ने भसकन सोडला आणि आता जोरजोरात श्वास घेऊ लागली पृथ्वी ने तिची अवस्था पाहीली आणि आता गालातल्या गालात हसू लागला आणि कार चालू केली .....
नंदिनी ने एक तिरकी नजर त्याच्यावर टाकली तर तो गप्प कार चालवत होता मग तिने गप्प बाहेर नजर फिरवली आणि शांत बसली ... थोड्या वेळाने अगदी दहा मिनिटात त्याने कार तिच्या घराच्या बाहेर उभी केली ....
आता तिनं हळूच नजर त्याच्याकडे टाकली आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला तो तिच्या कडेच बघत होता ते ही अगदी एक टक मागे सिट वर डोकं ठेवून तो तिच्या पाणीदार डोळ्यात बघत होता एक क्षण ती ही बघत बसली काही तरी होत त्याच्या नजरेत पण काय हे कळत नव्हतं आणि आता जेव्हा ती भानावर आली तसं तिने गडबडून नजर फिरवली आणि उगाचच गालावर लाली पसरली तिच्या .....
त...ते...स..र thankyou so much तुम्ही मला विश्वासाने तुमच्या आवडत्या ठिकाणी घेऊन गेलात मला खुप छान वाटल तिथे मी कधीच विसरणार नाही इतकी अविस्मरणीय ती जागा होती ... नंदिनी तिच्या नाजुक आवाजात म्हणाली ....
आणि आता तो हलकेच हसला तसं तिने नकळुन त्याच्याकडे पाहिलं हा खरंच वेडा आहे असा हसतोय का मी काही जोक मारला का जे हा हसतोय .... नंदिनी मनातच म्हणाली ....
No this is not joke but आता तु जे काही बोललीस ते ऐकून हसू आलं .... पृथ्वी म्हणाला ....
आयला यांनी माझ्या मनातलं कसं काय ओळखलं मी तर मनातच बोलले ना .... हो मी मनातल्या मनात म्हणाले मग ऐकू कसं गेलं यांना मनातलं ऐकू जात की काय .... ती पुन्हा म्हणाली मनातच .....
Yes मी ऐकलं तु जे काही मनात बोललीस ते मला तुझ्या मनातलं ओळखता येत .... पृथ्वी म्हणाला ....
आणि आता ती गडबडली .... बापरे मनातलं ऐकू येत आता.... नको नको नंदीनी मनात बोलणं आज पासून बंद .... नंदिनी म्हणाली ....
आणि आता तिच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव पाहून तो गालातच हसला ....
लिसन मी तुला घेवून गेलो आणि आता सगळीकडेच घेऊन जाणार आहे त्यात काही thankyou बोलायची गरज नाही .... पृथ्वी म्हणाला ....
पण सगळं तिच्या डोक्यावरून गेलं होतं तरीही मठ्ठ सारखी तिने मान हलवली तसं तो तिच्या डोळ्यात बघू लागला .....
हे देवा झाल पुन्हा चालू हे असं बघत बसतात आणि मला काही तरी होत यांना कळत कसं नाही .... ती म्हणाली आणि लगेच स्मित करत खाली उतरणार तोच त्याने तिचा हात पकडला आणि तिला काही ही कळायच्या आत तिला ओढुन घेतल ....
तसं काही ही जाणीव नसणारी ती अचानक ओढल्याने दचकुन गेली हे काय झालं हेच कळायला तिला वेळ लागला ...
तर त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत तिच्या कपाळावर ओठ ठेवले तसं तिचे डोळे मिटून घेतले तिने ....
तो बाजुला झाला तसं तिने डोळे उघडले .... Bye see you tomorrow take care .. and most important I will Miss you so much at night .... तो म्हणाला तसं तिनं पुन्हा काही समजलं नाही तरी मान हलवली आणि खाली उतरून जाऊ लागली .....
ती आत गेली तसं त्याने मंद स्मित केलं आणि कार चालू केली ....
नंदिनी मात्र त्याचं बोलणं आठवून विचार करत होती आताच तर भेटलो उद्या पुन्हा भेट होणारच तर आहे मग मला हे रात्री का मिस करणार आहेत... तेव्हाच तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिचे गाल लाल झाले .....
इश्श....ती हळूच म्हणाली आणि पळतच आपल्या रुममध्ये गेली नशीब कोणी दिसलं नव्हतं .....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा