मन हे बावरे (भाग 5)

ही एक प्रेमकथा आहे आणि काल्पनिक आहे .....
नंदिनी पळतच पृथ्वी च्या केबीनबाहेर आली आणि दिर्घ श्वास घेतला आणि टकटक केलं ....

May I ...... नंदिनी म्हणाली

Coming..... पृथ्वी म्हणाला

आणि आता नंदिनी ने हळुच दरवाजा उघडला आणि आत आली तर समोर पृथ्वी त्याच्या खुर्चीवर बसुन काम करत होता ती हळुच चालत त्याच्या समोरच जाऊन उभी राहिली पण तो मात्र आपलं काम करत होता .....

तिने मान खाली घातली आणि शांत पणे उभी राहिली , त्याच झाल तसं त्याने मान वर केली आणि समोर तिला अशी पाहुन त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला ....

कारण तिने मान खाली घातली होती एका इनोसंट मुलीसारखी गप्प उभी होती त्यात इतकी सुंदर तिची ती कांती तो घायाळ झाला होता .....

उंच त्याच्या खांद्यापर्यंत असेल तिची हाइट , लांबलचक कमरेच्या खाली पडलेले तिचे काळेभोर केस , गोरीपान त्वचा झुपकेदार दाट पापण्या , आणि गुलाबी ओठ बिना मेकअप ची ती एका माॅडेल ला ही लाजवेल इतकी सुंदर होती ती .....

त्यात कहर म्हणजे आज तिने घातलेला तो ड्रेस अमरेला गुलाबी रंगाचाड्रेस घातला होता तिने त्यावर मॅचींग गुलाबी ओढणी जी दोन्ही खांद्यावर घेतली होती कमाल दिसत होती ती .....

पृथ्वी काही क्षण तिच्या कडे बघतच बसला , इतका वेळ झाला तो‌ अजुन काही बोलत नाही म्हणून तिने मान वर केली तर हे काय तो आपल्याकडेच बघतोय ते ही एकटक तिला बघुन थोडं विचित्र वाटल....

तिने वर बघितल्यावर तिचे ते ब्राऊन डोळे त्याच्या नजरेस पडले‌ आणि आता त्याला वेड लागायच बाकी होत कारण मघाशी त्याने मिटींग रुममध्ये तिच्या कडे बघितलं नव्हतं पण आता तिच्यावरुन नजर हटत नव्हती....

स....र.... शेवटी न राहवून तिने आवाज दिला , पण हे काय आवाज देऊन ही तो बघत होता .....

सरररर....तिने थोडा जोरात आवाज दिला आणि आता तो‌ भानावर आला आणि आता आपण तिच्या कडे एकटक बघत होतो हे समजल्यावर त्याने मनातच जिभ चावली .....

पण आता तो पुर्णपणे भानावर आला होता , तो उठला आणि कोट झाडत तिच्या समोर येऊन टेबल ला टेकुन उभा राहिला....

So miss Nandini Deshmukh why are you late today..... पृथ्वी ने दिर्घ श्वास घेत तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारल .....

आणि आता नंदिनी घाबरली पण तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही पक्की ड्रामेबाज होती ती घरात नाही पण बाहेर अशीच शांत बसणार नव्हती ती .....

सर....मी लवकरच निघाले होते आणि पाच मिनिट लवकर ही आले पण त्याच काय आहे ना मला मिटींग च माहित नव्हतं ती हळुवार पण भोळेपणाने म्हणाली .....

Why काल रात्रीच नोटीस सेंड केली होती .... पृथ्वी म्हणाला

सर ते आज लवकर उठायचं होत म्हणून काल लवकर झोपले म्हणून नोटीस वाचायला भेटली नाही.... नंदिनी म्हणाली

Then what today morning..... पृथ्वी म्हणाला

आणि आता तिच्या डोळ्यासमोर सकाळी घडलेला घरचा प्रकार आला .....

ती सकाळी उठली आणि फोन हातात घेतला आणि नेट चालू करणार तोच आत्या चा आवाज आला ....

उठल्या महारानी काम करायला नको यांना उठल्या उठल्या फोन हातात हवेत जसे आईशी ने गुण उधळले तशी लेक पण उधळतेय शेवटी आईवरच जाणार ना घाण कुठली घरातली ..... आत्या जोरात म्हणाली

आणि फोन आताच हातात घेतलेल्या नंदिनी च्या डोळ्यात टचकन पाणी आल .....

काय ग ये भवाने सांगितलेल कळत नाही का उठ आधी हडळ कुठली आणि कामाला लाग माझ्याने आता काम होत नाहीत , नंतर काय दिवसभर बाहेर उंडगतच बसशील ....आत्या म्हणाली

आणि हे ऐकुन तिच्या गालावरुन एक थेंब अलगद खाली ओघळला , तिने तो तसाच पुसला आणि झाडु घेऊन कामाला लागली.....

मिस नंदिनी..... पृथ्वी चा आवाज आला तसं ती भानावर आली पण हे आठवून ही तिच्या डोळ्यातुन पाणी गालावर आलं होतं ...

What happened why are you crying..... पृथ्वी ने विचारल

N... nothing sir ..... नंदिनी भावना अडवत म्हणाली तिला सवय जी झाली होती .....

Okay next time don't late ....तो म्हणाला आणि आपल्या खुर्चीवर बसला ....

बायदवे आपल्याला चार दिवसांनी पंधरा दिवसांसाठी दुबई ला जायचं आहे सो be ready..... पृथ्वी म्हणाला

पण सध्या ती इतकी जास्त भावनिक झाली होती की तिला आपण काय बोलायचं सुचत नव्हतं तिने फक्त मान हलवली.....

आणि तिथुन पळतच बाहेर आली आणि थेट वाॅशरुममध्ये पळाली आणि वाॅशरुमचा दरवाजा बंद करुन तशीच खाली बसली ....

पण ती अशी का पळत गेली म्हणून पृथ्वी मात्र विचारात पडला ....