मिटींग संपली तस पृथ्वी उठला आणि आपला कोट झाडत ताडताड बुटाचा आवाज करत केबीनबाहेर निघून गेला तो गेला तसं सगळे थोडे रिलॅक्स झाले आणि सगळे ऊठुन बाहेर आले आणि आपापल्या डेस्क वर बसले.....
हे नंदिनी आज लेट का झाला तुला रिना तिच्या डेस्क वर बसत म्हणाली....
काय सांगू यार सकाळी लवकर निघाली मी घरातुन आणि बस स्टॉप ला आले तर बस नव्हत्या त्यात आज लेट आले असते तर या खडुस ने मला हकलवून दिली असती आज म्हणून मग रिक्षा बघितली पण एक रिक्षा थांबायला तयार नाही तेव्हड्यात एक रिक्षा आली तर मी डायरेक्ट समोरच जाऊन उभी राहिली रिक्षा च्या त्याने जाम शिव्या घातल्या मला पण फायनली सोडलं ऑफिस खाली आणि मग पाच मिनिट आधी ऑफिस मध्ये आले तर तुम्ही कोणीच नव्हता तितक्यात त्या खडुस चा फोन आला तेव्हा समजलं मिटींग आहे ..... नंदिनी म्हणाली
अगं पण रात्रीच मेल पाठवला होता आज मिटींग आहे त्याचा रिना म्हणाली ....
अगं पाठवला होता पण आज लवकर उठायचं होत म्हणून मी रात्री आठ वाजता झोपले आणि सकाळी उठले तर नेहमीप्रमाणे घरात कटकट चालू होती आत्या ची मग काय ऊठुन काम आवरली आणि त्यात मेल बघायला वेळच नाही मिळाला..... नंदिनी म्हणाली
यार नंदु मी सांगुन ठेवते या तुझ्या आत्या ला ना एक दिवस मी चांगलीच झापणार आहे म्हणजे तुला गरज आहे म्हणून तुला कशी पण वागवते यार स्वतःच्या मुलीला पण काम करायला सांग म्हाणाव नाहीतर लग्न झाल्यावर सासू च्या लाथा खाईल....रिना म्हणाली
रिना तु पण ना , तुला माहित आहे ना मला गरज आहे नाहीतर या जगात कोण आहे ग माझं तु आणि आत्या सोडुन.... नंदिनी इमोशनल होत म्हणाली
नंदु तुझ्या याच स्वभावाचा फायदा घेते ती आत्या , मी सांगतेय ना तुला हाॅस्टेल ला ये म्हणून माझ्यासोबत खुश राहशील तिथे नको राहु आणि ती आत्या इतकी हरामी आहे की तुझा पगार ही सगळा तीच घेते , यार नंदु विचार कर ना .....रिना म्हणाली
रिना आपण या विषयावर ऑफिस सुटल्यावर बोलुयात नाहीतर सर आपल्या दोघींना ही सोडणार नाहीत.... नंदिनी म्हणाली
बरं नंतर बोलू आणि पॅकिंग कर चार दिवसांनी तु पण येतेय दुबईला थोडा तरी आराम तुला.....रिना म्हणाली
हम्म मला आधी आत्या शी बोलावं लागेल .... नंदिनी म्हणाली
आणि तिच ऐकुन रिना ने डोळे फिरवले आणि काम करु लागली...
नंदिनी पण आपल्या कामाला लागली तितक्यात तिच्या डेस्क वरील फोन वाजला तसा तिने उचलला....
हॅलो... नंदिनी म्हणाली
Miss Nandini come to my cabin right now..... पृथ्वी म्हणाला
Yes yes sir ..... नंदिनी म्हणाली आणि फोन ठेवला
काय ग काय झालं इतकी का घाबरली आहेस ..... रिना ने विचारल
रिना सरांचा फोन होता बोलवलं आहे मी येते लगेच.... नंदिनी म्हणाली आणि पळतच गेली समोरच असलेल्या केबिनमध्ये गेली ....
आणि तिची ती धांदल पाहुन रिना ने डोक्याला हात लावला ....
क्रमश:
°°°°°°°°°°°°
°°°°°°°°°°°°
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा