मिळावे तुझे तुला आस ही ओठी
भाग २६
पहाटेचे साडेतीन चार वाजत आले होते. कमल खाली आली. जिथे काल पूजा मांडली होती तिथे येत तिने अखंड लावलेल्या दिव्या मध्ये तूप घातले आणि वात नीट केली. देवाला नमस्कार केला आणि रात्री भजन अर्ध्यात सोडून जावे लागले त्यासाठी माफीही मागितली. सगळीकडे अंधार होता, त्यात फक्त दिव्याचा तो मंद असा प्रकाश खोलीत पसरला होता. कमलने परत एकदा प्रसन्न चित्ताने नमस्कार केला आणि रुमकडे जायला निघाली. तोच तिला जाणवले की तिथे कोणीतरी आहे. आधी तर ती थोडी घाबरली पण थोडे जवळ जाऊन बघितले तर त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट झाला. तशी तिची भीती मावळली आणि ओठांची कोण रुंदावली.
ती जवळ गेली बघते तर वेद तिथेच सोफ्याला टेकून बसल्या बसल्याच झोपला होता. त्याचा डोक्यावरील केस पार विस्कटलेले दिसत होते. चेहऱ्यावरून बराच थकलेला दिसत होता. त्याला उठवून सरळ पाय लांब करून झोप म्हणायची तिची इच्छा झाली. पण परत उठवले तर त्याची झोप मोड होईल, असेही तिला वाटले. म्हणून मग तिने त्याला उठवले नाही. पहाटेची वेळ असल्यामुळे हवेत बोचरा गारवा पसरला होता. वेदच्या अंगावर पांघरून घालावे विचार करत तिने आजुबाजुला काही आहे का बघितले. पण तिथे काही नव्हते. वेमिका, आजीच्या खोलीतून काही आणायचे म्हणजे परत त्यांची झोप मोड करावी लागणार होती. रात्री सगळे उशिराने झोपले असतील, याची तिला कल्पना होती. तिला काही लक्षात आले आणि तिने लगेच तिने अंगावर ओढलेली शाल त्याच्या अंगावर पांघरली.
"बापरे, यांना तर खूप ताप आहे." त्याला शाल पांघरतांना तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या गालाला, मानेला झाला होता.
तिने परत त्याच्या कपाळाला हात लाऊन बघितला. तर खरंच त्याच्या अंगात ताप भरला होता. ती परत मानेला हात लाऊन बघायला गेली तर त्याने तिचा हात पकडला.
तिने परत त्याच्या कपाळाला हात लाऊन बघितला. तर खरंच त्याच्या अंगात ताप भरला होता. ती परत मानेला हात लाऊन बघायला गेली तर त्याने तिचा हात पकडला.
"आय एम फाईन. " त्याने तिचा हात बाजूला झटकला. त्याचा आवाज खोल गेला होता, पण आवाजात नाराजी जाणवत होती.
"तुम्ही जागे होता तर.." कमल त्याच्याकडे बघत म्हणाली.
तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे बघत होता. कमल जेव्हा खाली आली, आणि ती दिवा लावत होती, तेव्हाच तिच्या बांगड्यांचा खणखण आवाजाने तो जागा झाला होता.
"तुम्हाला खूप ताप आहे." कमल.
"मग?" तो तिरकसपणे म्हणाला.
त्याच्या या वेगळ्या बोलण्याचा भाव, त्याचा टोन तिला जाणवला. तिला थोडे वाईट वाटले.
भजन मधात सोडून गेलेले कदाचित यांना आवडले नाही विचार करत तिने त्याकडे दुर्लक्ष केले.
त्याच्या या वेगळ्या बोलण्याचा भाव, त्याचा टोन तिला जाणवला. तिला थोडे वाईट वाटले.
भजन मधात सोडून गेलेले कदाचित यांना आवडले नाही विचार करत तिने त्याकडे दुर्लक्ष केले.
"वरती तुमच्या रूममध्ये चला. आणि औषध घ्या." कमल.
"नाही. मी इथेच ठीक आहे." तो पण हट्टाला पेटला होता. ती जे म्हणेल त्याच्या बरोबर विरोधात तो उत्तरं देत होता.
"हे बघा उगाच हट्टीपणा करू नका. इथे थंडी पण वाढली aah. तुमचं अंग खूप तापलंय. चला तुमच्या खोलीत चला." ती त्याच्याकडे न बघत त्याचा हात पकडत त्याला वरती घेऊन जाण्याच्या उद्देशाने म्हणाली.
"मला नाही.." बोलता बोलता तो तिच्या हाताला झटका देणारच होता की त्याचे लक्ष तिच्या छातीकडे गेले. तिची तिथली जागा काळीनिळी झाली होती.
देवा जवळचा दिवा अखंड तेवत रहावा म्हणून दिव्यात तूप घालायला कमल चुपचाप रूम मधून बाहेर पडली होती. ती नाईट गाऊन मध्येच होती. तिने वरतून फक्त शाल ओढली होती. आता ती शाल पण तिने वेदला पांघरली होती. त्यामुळे तिच्या मानेचा भाग स्पष्ट दिसत होता. आणि त्यामुळेच वेदला तिच्या छातीवरील जबरदस्ती केलेले व्रण दिसले होते. बोलता बोलता जसे त्याला ते दिसले, त्याचे हृदय कळवळले. आणि बोलता बोलता तो शांत झाला.
"चला.." कमल त्याचा हाताला पकडून त्याला सोबत चालायला सांगत होती.
तो जागेवरून उठलायला गेला, पण वेदनेने कळवळला. त्याचे पूर्ण अंग ठणकत होते.
"काय झालं?" कमलने काळजीने त्याच्याकडे बघितले.
तो काहीच बोलला नाही. बरीच शक्ती एकवटून तो जागेवरून उठला. आणि कसेबसे चालत पायऱ्या चढू लागला. कमल त्याच्या मागे मागे पायऱ्या चढत होती. पाच सहा पायऱ्या चढून झाल्या आणि एकदम त्याचा तोल गेला. तो पडणार तोच कमलने त्याला पकडत सांभाळून घेतले. तिने त्याचा एक हात आपल्या मानेभोवती घेत पलीकडून पकडला. दुसऱ्या हाताने त्याच्या कंबरेला पकडले.
"मी एकट्याने जाऊ शकतो. मी स्वतःला सांभाळू शकतो, मला कोणाची गरज नाहीये." तिला तसे पकडलेले बघून तो म्हणाला.
त्याच्या बोलण्यातून तो तिच्यावर रागावला आहे, तिला जाणवले होते.
"हो माहिती मला. पण मला गरज आहे तुमच्या आधाराची. चला." त्याच्या कंबरे भोवतीची तिची पकडत ती घट्ट करत त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली. तिच्या डोळ्यात एक ठाम निश्चय त्याला दिसला. ती मानणार नाही हे त्याच्या लक्षात आले. तो चुपचाप पुढे चालू लागला.
कमल त्याला त्याच्या खोलीत घेऊन आली. त्याला बेडवर बसवले. तसे लगेच उठून तो सोफ्यावर जाऊन बसला.
"इकडे झोपा. त्यावर पाठ अकडून जाईल." कमल.
त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आणि तो त्यावरच पाय लांब करत झोपण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते.
"तुम्ही कपडे नाही बदलले? त्यात अवघडल्या सारखे होत असेल." कमल.
परत तो काहीच बोलला नाही.
"मी तुमच्या कपाटातून काढून देऊ?" कमलने त्याला विचारले.
काही न बोलता कसेतरी तो सोफ्यावर आडवा झाला.
"काय झालंय यांना? असे का वागत आहेत?" तो बोलत नाहीये बघून ती मनोमन विचार करत होती.
ती चुपचाप त्याच्याजवळ गेली. परत तिने त्याच्या कपाळावर हात ठेवत त्याचा ताप बघितला.
"तापाचे औषध कुठे आहे?" तिने विचारले.
त्याने डोळे बंद केले.
"एवढा हट्टीपणा लहान मुलं सुद्धा करत नाहीत.. पिहू पण थोड्या वेळात ऐकते.." ती एकटीच पुटपुटली.
वेदचे अंग चांगलेच तापले होते. तिला काहीच सुचत नव्हते. ती लगेच थंड पाणी घेऊन आली. रुमाल शोधत होती. वेदचे कपाट उघडावे की नाही ती थोड्यावेळ विचार करत होती. तेवढयात वेदचा तिला कन्हण्याचा आवाज आला. आता मागचा पुढचा विचार न करता तिने त्याचे कपाट उघडले.
"बापरे, इतकं व्यवस्थित आवरलेले कपाट.." ते बघून ती आश्चर्यचकित झाली. "वेमिकाचे कपाट उघडले की आधी सगळं भूकंप आल्यासारखे अंगावर येऊन पडतं."
वेदच्या कपाटात सगळं इतकं व्यवस्थित ठेवले होते की तिला रुमाल सापडायला सेकंदाचा पण उशीर लागला नाही. एक रुमाल घेत ती पटकन वेदच्या शेजारी येऊन बसली. पाण्यात रुमाल ओला करून, पिळून घेत वेदच्या कपाळावर ठेवला. त्या थंड स्पर्शाने त्याने डोळे उघडले. समोरच अगदी कमल बसली होती. तो एकटक तिच्याकडे बघत होता.
"काही पाहिजे काय?" कमल त्याला स्वतःकडे बघतांना पाहून म्हणाली.
त्याने काहीच उत्तर दिले नाही. कमल त्याच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलत होती. तिच्या हालचालीमुळे त्याची परत नजर तिच्या छातीवर असलेल्या काळ्यानिळ्या डागाकडे गेले. ते बघून परत त्याचे हृदय दुखू लागले. डोळे मिटत, त्याने त्याची मान दुसरी दुसरीकडे फिरवली.
जवळपास एक तास झाला होता, कमल पट्ट्या बदलत होती. पण काहीच फरक पडत नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर वेदनादायी भाव दिसत होते. बरंच काही तो सहन करतोय, असे जाणवत होते. वारंवार विचारूनही तो काहीच बोलत नव्हता, त्याचा तिला आणखीच त्रास व्हायला लागला होता. तिला पण तिच्या हृदयात दुखतेय, जाणवत होते.
"ताप उतरत नाहीये." तिचा स्वर कापरा झाला होता.
तिच्या आवाजाने परत डोळे उघडले.
तिच्या आवाजाने परत डोळे उघडले.
"कुठलं औषध घेता? कुठे ठेवले आहे? सांगा ना.." ती विनावनीच्या सुरात म्हणाली.
तो काहीच बोलला नाही. ती पटकन जागेवरून उठली. कपाट, ड्रॉवर सगळं उघडून उघडून बघू लागली. ती आता खूप panic झाली होती. शेवटी तिला एका ड्रॉवर मध्ये औषधांचा एक बॉक्स सापडला. तो घेऊन ती परत त्याच्या जवळ बसली. बॉक्स उघडून त्यात औषधं बघू लागली. त्या बरीच औषधं होती. ती त्यावर नाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला काहीच समजत नव्हते. कोणते औषध कशाचे आहे, ते पण कळत नव्हते. तिने वेदच्या डोक्यावर हात ठेवून बघितला. चांगला चटका लागावे, असे गरम झाले होते.
"सांगा ना यातले कोणते औषध द्यायचे?"
वेद फक्त तिच्याकडे बघत होता.
"बोला ना?" तिच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले होते.
"मला नाही माहिती यातले कोणते तापाचे औषध आहे.. सांगा ना…" ती रडत रडत एका हाताने गालांवर ओघळणारे अश्रू पुसत होती. तरी ते परत वाहत होते.
"ताप खूप वाढला आहे. कोणती गोळी आहे यातली?" ती त्याच्या गालावर थापटत विचारत होती.
त्याने डोळे बंद केले.. आणि परत दुसरीकडे मान करत झोपला.
सकाळचे ५.३०-६ होत आले होते. बाहेर उजाडले होते. वेद काहीच सांगत नाही आहे बघून ती खोलीच्या बाहेर आली. राजीवच्या खोलीत डोकावले तर तो अजूनही झोपला होता. तिने तिची एक ओढणी अंगावर घेतली आणि पटकन खाली आली.
"वेमिका, उठ.." कमलने आवाज दिला.
"कमल झोपू दे. सुट्टी आहे." वेमिका कड बदलत म्हणाली.
"वेमिका भार्गवला खूप ताप भरला आहे."
"काय?" वेमिका झोपेतून खडबडून जागी होत उठून बसली.
"हो." म्हणत कमलने तिला जे झाले ते सांगितले.
"अगं मग तेव्हाच उठवायचे होते ना? बरं चल बघू."
दोघीही वरती आल्या. वेदचा कन्हण्याचा आवाज येत होता.
कमल पण वेदच्या खोलीत जाणार तोच राजीवचा आवाज आला.
"वेमिका तू बघ. मी जाते." कमल घाबरतच रूममध्ये पळाली.
********
राजीव ब्रेकफास्ट आटोपून त्याच्या ऑफिसला गेला. रविवार असला तरी तो घरात फार काही थांबत नव्हता. बाहेर त्याचे काही ना काही काम असायचेच.
कमल आणि आजी वेमिका आणि वेदची वाट बघत होत्या. दोन तीनदा पिहू जवळ येऊन गेली. कसेबसे तिला समजावत कमलने तिला टीव्ही वर कार्टून लावून देत एका ठिकाणी शांत बसवले होते. तिचे कशातच मन लागत नव्हते. ती सतत दाराकडे बघत होती.
तिची प्रतीक्षा संपली. दारात गाडी येऊन उभी राहिली. वेमिका आणि वेद कार मधून उतरले. वेदच्या हाताला कडक प्लास्टर लावले होते.
"काय ग काय झाले? काय म्हणाले डॉक्टर?" आजी बाहेर येत म्हणाल्या. कमल पण त्यांच्या मागोमाग बाहेर आली होती.
वेदने एकदा कमलकडे बघितले आणि तो घरात आला. त्याच्या पाठोपाठ सगळे आतमध्ये आले.
वेदने एकदा कमलकडे बघितले आणि तो घरात आला. त्याच्या पाठोपाठ सगळे आतमध्ये आले.
"भैय्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. म्हणजे हाताची ही शेवटची तीन बोटं फ्रॅक्चर आहेत. बॉक्सिंग फ्रॅक्चर झाले आहे. त्याचाच ताप होता त्याला. म्हणजे आता पण आहे. रात्रभर तो वेदना सहन करत होता. म्हणून रात्री थोडं सुद्धा हलले तर त्याला खूप दुखत होते. त्यामुळेच तो कण्हत होता. तापामुळे बॉडी पेन पण जास्त होते. रात्री पेन किलर घेतले असते, तर त्रास थोडा कमी झाला असता, म्हणाले डॉक्टर." वेमिका माहिती देत होती.
"मी किती विचारले , पण सांगतच नव्हते." कमल वेदकडे बघत मनोमन बोलत होती.
"आता तापाचे इंजेक्शन दिले आहे. आता ताप कमी झाला आहे. पण परत येऊ शकतो. तर हे औषध दिले आहे. अणि तीन आठवड्यांनी परत एक्सरे करायचे आहे." वेमिका.
"अच्छा तर बाहेरची कुंडी तू फोडली तर?" आजी.
वेद चुपचाप बसला होता. त्याने काहीच उत्तर दिले नाही.
"हा काय वेडेपणा वेद? असा त्रास करून घेण्यात काय अर्थ? याने कोणाचं भलं झालेय?" आजी थोडी रागवत म्हणाली.
"रमाआजी , हे नवीन आहे काय? स्वतःच्या मनासारखे नाही झाले की तो नेहमीच तर असे वागतो. " वेमिका.
"हो, पण आजकाल बंद झाले होते. मला पण चांगले वाटले की चला मुलगा राग कंट्रोल करतोय. तर आज परत हे असे." आजी.
"त्याला काय विचारतेय? त्याला तर आता सवय झाली आहे. कितीही तोडफोड केली तरी त्याला काही लागत नाही. आपलंच मन दुखते. ती कमल सुद्धा रडत होती. पण तो मठ्ठ एक सांगायला तयार नाही. " वेमिका.
"असा काय त्रास होतोय बाळा, जो इतका सहन होत नाहीये? सांग सोन्या? मनातले बोल." आजी.
"मी ठीक आहे." वेद.
"येस ब्रो, तू आहेसच लोखंडाचा बनलेला.. इस मर्द को दर्द नही होता." वेमिका थोडी चिडत म्हणाली.
कमल सर्वांकडे आलटून पालटून बघत उभी होती.
"त्यांना बरं नाहीये. आधीच दुखत आहे, त्यात आपल्या बोलण्याचा त्रास होत असेल. आराम करू देत. आपण नंतर या विषयावर बोलूया." कमल
"जया काकी खायला दे, मला बाहेर जायचं." वेमिकाने आवाज दिला.
जयाने सर्वांना पराठे आणून दिले. हात बांधलेला असल्यामुळे वेदला नीट खाता येत नव्हते. आजी त्याला आपल्या हाताने भरवत होती.
"अच्छा तो भैय्या, ये प्लॅनिंग था." वेमिका त्याला चिडवत म्हणाली.
"म्हणजे?" कमल.
"हा पक्का लाडोबा आहे. तुला माहिती कमल, बाबांकडून याला लाड पुरवून घ्यायचे असत. मग तेव्हा तो असेच काय लागण्याचा, पडण्याचा बहाणा मारायचा. आता आजी आणि आपल्याकडून करवून घेतोय."
त्यावर कमल किंचित हसली.
"येह काय ग आज एवढे भडक लिपस्टिक? किस्को हा किस्को मारणे का इरादा हैं?" वेमिका कमलला चिडवत होती.
तिच्या या वाक्याने वेद कमलकडे निरखून बघत होता..
तिच्या या वाक्याने वेद कमलकडे निरखून बघत होता..
कमल कसेतरी हसली. " ते दुसरे सापडतच नव्हते. संपले बहुतेक. हेच होते मग.."
"अच्छा. चल मग कधी बाहेर जाऊयात. तुझ्यासाठी मस्त शॉपिंग करूयात." वेमिका.
कमलने होकारार्थी मान हलवली.
"नेक्स्ट टाईम तेरावाला बाहेर गेला की मस्त दिवसभर करूयात शॉपिंग.." वेमिका.
"तेरावाला काय ग?" कमल.
"राजीव ग.."
"तो माझा ना…" बोलता बोलता कमल चूप झाली.
तेरावाला शब्द तिला आवडला नव्हता.
" ते लिपस्टिक आज थोडं पसरलं आहे." वेमिकाला तिची चूक लक्षात आली. ती विषय बदलायला म्हणाली.
"हा , ते घाईघाईत झाले असेल." कमल.
"बरं कमल ऐक, मला माझ्या पोर्टफोलिओच्या कामाने बाहेर जायचे. भैय्याला अजूनही अशक्तपणा आहे. त्याला त्याच्या खोलीत पोहचवून देशील."
कमलने होकारार्थी मान हलवली.
"आणि भैय्या तू रे, आराम कर.. अँग्रीमॅन बनू नको.. " म्हणत वेमिका आपल्या रूममध्ये पळाली.
"जा आराम कर. आणि जी औषधं दिली आहेत ती नीट घे. नाही तर हा म्हातारीला वरती यावे लागेल. " आजीने दम दिला.
वेद जागेवरून उठत आपल्या खोलीकडे जायला पायऱ्या चढू लागला.
"आय कॅन मॅनेज." कमल त्याच्या पाठीमागे येत त्याचा हात पकडणार, तेवढयात तिला तिथेच थांब म्हणून हात दाखवत तो म्हणाला. आणि परत वरती जाऊ लागला.
कमलने वळून आजीकडे बघितले. तर त्याच्या मागे जा, असे आजीने इशाऱ्याने सांगितले.
कमल त्याच्या मागेमागे चालत होती.
मध्येच थांबत त्याने मागे वळून बघितले. कमल त्याच्या मागेच होती. तो परत आपल्या खोलीकडे गेला.
जसे खोलीत गेला त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला आणि तिला ओढत भिंतीजवळ नेत उभे केले. आणि तिच्या जवळ गेला.
मध्येच थांबत त्याने मागे वळून बघितले. कमल त्याच्या मागेच होती. तो परत आपल्या खोलीकडे गेला.
जसे खोलीत गेला त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला आणि तिला ओढत भिंतीजवळ नेत उभे केले. आणि तिच्या जवळ गेला.
तो काय करतोय, कमलला काहीच कळेनासे झाले..
****
क्रमशः
****