मिळावे तुझे तुला आस ही ओठी १४

कमल


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग १४

पूर्वार्ध:
कमलला राजीव सोबत एका बिझनेस पार्टीमध्ये जायचे असते. राजीव कमलचा कायापालट करायला त्यांच्या नेहमीच्या ब्यूटिशीयनला घरी पाठवतो.

आता पुढे…


पार्टी रंगात आली होती. राजीवने कमलच्या कंबरेत हात घालत तिला जवळ पकडून ठेवले होते. कमलला मात्र तिथे खूप अवघडल्यासारखे वाटत होते. ती सतत तिच्या ड्रेसचा गळा नीट करत, लपवण्याचा प्रयत्न करत होती. त्यात राजीव सतत सतत तिला सर्वांसमोर नको तसे स्पर्श करत होता. खरं तर तिथे बहुतेक सगळेच तसे वागत होते. फार जास्त जवळ जवळ करत होते. पण तरीही तिला ते आवडत नव्हते. पण राजीवमुळे काही बोलताही येत नव्हते. शरीर अवघडलेले, डोळ्यात असहायता आणि ओठांवर उसणे हसू, अशी तिची परिस्थितीत झाली होती.


वेद दूर एका सोफ्यावर एकटाच बसला, जे सुरू होते ते बघत होता. त्याची पूर्ण नजर कमलवर स्थिरावली होती.

"हे हॅलो हॉटी.." अंदाजे त्याच्याच वयाची एक मुलगी त्याच्याजवळ येत बाजूच्या खुर्चीवर बसत ड्रिंकचा एक सीप घेत म्हणाली.

वेदचे अजिबात तिच्याकडे लक्ष नव्हते.

ती पण वेद जिकडे बघत होता तिकडे बघू लागली.

"शी इज सेक्सी हा.. सगळे तिच्याचकडे बघत आहेत." ती मुलगी कमलकडे बघत म्हणाली.

ते ऐकून वेदने आजूबाजूला नजर वर करत बघितले तर खरंच तिथे उपस्थित असलेले बरेच पुरुष कमलकडे बघत होते. ते बघून त्याचे डोकं तडतडायला लागले.

"लेट्स डान्स?" ती मुलगी म्हणाली.

"नॉट इंटरेस्टेड.." तो एकटक कमलला बघण्यात व्यस्त होता.

"ड्रिंक?" ती त्याच्या पुढे ग्लास पकडत म्हणाली.

"नो. थॅन्क्स!"

"मी तर ऐकले होते तुम्ही चेन ड्रिंकर आहात. इथे येऊन ऑरेंज ज्यूस कोण पितं?"

"मॅडम, मला तुमच्यासोबत बोलण्यात अथवा डान्स करण्यात काही इंटरेस्ट नाही. आय होप तुम्हाला क्लिअर झाले आहे." तो ऑरेंज ज्यूसचे एक सीप पित म्हणाला आणि कमलकडे बघू लागला.

"मिसेस कमल, प्लीज हॅव अ ड्रिंक." म्हणत मल्होत्राने रमचा ग्लास तिच्या पुढे धरला.

"मला नको. " राजीवकडे बघत कमल कसेतरी म्हणाली.

"इट्स नोर्मल. प्लीज हॅव. राजीवला काही ऑब्जेक्शन नसेल." मल्होत्रा.

"येह. कमल ते म्हणतात आहेत तर घे." राजीव.

"मी नाही घेत. नको मला."

"पार्टीमध्ये घ्यावेच लागते. घे." म्हणत राजीवनेच तिच्या ओठांना ग्लास लावला आणि जबरदस्ती तिला पाजले.

सगळेजण तिला जबरदस्ती दारू पाजत आहे बघून वेदला खूप राग आला होता. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते.

"लव्ह शोव हा?" ती मुलगी वेदला बघून म्हणाली.

वेदने एकदा तिच्याकडे बघितले आणि परत त्याने आपली नजर कमलवर स्थिरावली

"सो शी डीच्ड यू फॉर मनी! आजकाल मुली अशाच स्मार्ट झाल्या आहेत, पैशासाठी म्हाताऱ्यासोबत लग्न करतात आणि बाकी गोष्टींसाठी बॉयफ्रेंड बनवून ठेवतात." परत ती मुलगी म्हणाली.

वेदने तिला एक हार्ड लूक दिले.

"स्टील इट्स सेम.. किलिंग वन." ती परत एक सीप घेत म्हणाली.

त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.

कमल नाही नाही म्हणत होती तरी त्यांनी तिला २-३ ग्लास पाजले होते. आता सगळे डान्स करत होते. डान्स करता करता राजीवने तिच्या गळ्यावर सर्वांदेखत कीस केले. आणि तो तसेच तिला पण करायला फोर्स करत होता. ती नाही नाही करत होती. राजीवने सर्वांच्या नकळत तिच्या कंबरेवर चिमटा काढला. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. जरी कोणाला ते दिसले नसतील तरी वेदला ते बरोबर दिसले होते. तिच्या चेहऱ्यावरील त्रास वेदच्या डोळ्यात दिसू लागला होता.

ती मुलगी वेद आणि कमलला न्याहळत होती.

"ओह, सो इट्स पेनिंग हा? हृदयात दुखतंय ना?" ती त्याच्या चेहऱ्यावरील भाव टिपत म्हणाली.

त्याने चुपचाप काही सेकंदासाठी डोळे बंद केले आणि एक मोठा श्वास घेतला.

"जा, तिला आण इकडे. तसे पण तिला त्यांनी खूप पाजले आहे. आय थिंक तिचे फर्स्ट टाइम आहे. थोड्या वेळातच ती आऊट ऑफ कंट्रोल होईल. ते तिचा फायदा घेतील." ती राजीवकडे इशारा करत म्हणाली.

"ते हजबंड वाइफ आहेत." वेदने आता नजर फिरवत पलीकडे बघितले.

"त्रास होतोय?" तिने परत प्रश्न सुरू केले.

"एक्सक्युज मी मॅडम, तुम्ही इथून जाऊ शकता." तो बऱ्यापैकी स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाला.

"सो फायनली यू आर इन लव्ह?" ती मात्र बोलायचे थांबत नव्हती.

"तुमचा प्रोब्लेम काय आहे? का उगाच माझ्या मागे इथे वेळ घालवत आहेत? आय एम फाईन. यू मे गो नाउ."

"तू कितीही नकार दिला तरी दिसत आहे, तू प्रेमात पडलेला आहे. आणि तू किती हेल्पलेस आहे ते पण दिसत आहे." ती थोडे तिरकस हसत म्हणाली.

"बकवास बंद करा." ती तिथून जात नाहीये बघून तोच तिथून जायला उठला.

"एवढी मोठी बिझनेस पार्टी. चौफेर सेक्सी, सिंगल मुली असताना, एक यंग, हॉट अँड हँडसम बिजनेसमन एका कोपऱ्यात बसून ऑरेंज ज्यूस पित एका लग्न झालेल्या मुलीला बघत बसला आहे. तिला होणार त्रास त्याच्या डोळयात दिसत आहे. याला प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? कितीही नाकारलं तरी हे प्रेम आहे." ती मुलगी म्हणाली.

तसे तो परत वळत तिच्या जवळ येत तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात घट्ट पकडत, थोड्या रागानेच म्हणाला," व्हॉटस् युअर प्रोब्लेम? ऐकतोय म्हणून बोलत सुटल्या आहात." म्हणत तो परत जाऊ लागला.

"मी तुझी मदत करू शकते. मी तिला त्यांच्यापासून सोडवून आणू शकते." ती म्हणाली.

तसे त्याचे पाय तिथेच थबकले. त्याने वळुन तिच्याकडे बघितले. आता मात्र त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले दिसत होते. तो थोडे आशेने तिच्याकडे बघत होता.

"पण एका अटीवर." ती म्हणाली.

भुवई उंचावत तो तिच्याकडे बघत होता.

"तू माझ्या सोबत.."

"शट अप.. " वेद तिचे बोलणं पूर्ण व्हायच्या आतच म्हणाला.

"ओ मिस्टर वेदभार्गव मी म्यारीड आहे."

"मग तरीही हे असे बोलणे.."

"का? तू नाही का त्या लग्न झालेल्या मुलीकडे बघतोय. मी काही आक्षेप घेतला?"

त्याने डोळे फिरवले.

"तसाच आहेस अगदी. काहीच बदलला नाहीस." ती म्हणाली.

"तुम्ही मला ओळखता?" तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता.

"मी दिया." ती हात मिळवण्यासाठी तिचा हात पुढे करत म्हणाली.

"ओके. मी ओळखत नाही." त्याने मात्र हात मिळवला नाही.

"तसाच आहेस, खडूस एकदम. झटक्यात दुसऱ्याचे मन तोडतो. आणि आता दुसऱ्या कुणासाठी तरी तुटतोय." ती.

"मॅडम, तुम्हाला काही काम नाही वाटते. पण मला आहेत." म्हणत तो जाऊ लागला.

"अ ब क, आय आय टी कॉलेज." ती म्हणाली.

तसे तो थांबला.

" तुला मी आठवणार नाही, पण मी तुझ्याच क्लासमध्ये होते. जसे तू इतर मुलींचा क्रश होतास तसेच माझाही होता. मी प्रेम पत्र लिहून त्यात तुला प्रपोज सुद्धा केले होते. तू उत्तर ही दिले होते."

"ओह. सॉरी पण मला काही आठवत नाही."

ती थोडीशी हसली.

" \" खुप अभ्यास कर. खुप यशस्वी हो.\" असे तू उत्तर दिले होते." ती हसत म्हणाली.

ते ऐकून आता तो पण थोडासा हसला. " बहुतेक मुलींना मी तेच उत्तर दिले होते." तो हसत म्हणाला.

"हो पण मी ते फार सिरीयसली घेतले. खुप अभ्यास केला. चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झाले. तिथेच मला सुजित भेटला. आता आम्ही आमची छोटीशी कंपनीची सुरुवात केली आहे आणि आमच्या जीवनात खूप सुखी आहोत. " ती म्हणाली.

"ग्रेट. "

"पाहिले प्रेम म्हणता येणार काय, माहिती नाही. पण माझा पहिला आणि शेवटचा क्रश मात्र तूच होता." ती म्हणाली.

"तिला त्यांच्यामधून सोडवण्यासाठी कुठली अट आहे?" तो शांतपणे म्हणाला.

"कोण आहे ती?"

"कमल."

"तुमचं प्रेम आहे एकमेकांवर?"

"नाही."

"तुझी फ्रेंड आहे?"

"नाही."

ते ऐकून तिला थोडे विचित्र वाटले.

"मग जाऊ दे. तसे पण तो तिचा नवरा आहे म्हणतोय ना? मग कशाला सोडवायचे. लेट देम एन्जॉय."

"अट काय आहे? मी तुझ्या सगळ्या अटी पूर्ण करायला तयार आहे." तो ठामपणे म्हणाला.

एकेकाळी कुणालाही भाव न देणारा, कुणाच्याही बोलण्याला कधीच बळी न पडलेला मुलगा आज जे म्हणेल ते करायला तयार आहे. ते बघूनच दियाला जे कळायचे होते ते कळले होते.

"माझ्यासोबत डिनर डेट." ती म्हणाली.

"तुझ्या पतीला चालेल?"

"त्याला माहिती तुझ्याबद्दल. "

" ओके. जेव्हा म्हणशील तेव्हा येईल." त्याने एका कागदावर त्याचा फोन नंबर, ईमेल एड्रेस लिहून तिला दिले.

"रोज बोलावले तर?"

"हो, रोज येईल."

"कीस मागितले तर?"

"देणार नाही. पण तू घेऊ शकतेस."

त्यावर ती हसली.

"प्लीज आता तिला तिथून घेऊन येशील."

"हो." म्हणत तिने तिच्या ड्रेसचा गळा थोडा खाली सरकवला.

"केअरफुली!"

"डोन्ट वरी. बिझनेस वर्ल्डमध्ये वावरतांना मी खूप स्मार्ट झाले आहे." म्हणत ती ड्रिंक वाटणाऱ्या वेटरजवळ गेली. तिथे ती काहीतरी बोलली आणि राजीव जवळ गेली.

"हॅलो हँडसम." राजीवला ती थोड्या मादक आवाजात म्हणाली. तिचे हावभाव सुद्धा मादक होते.

तशी दिसायला दिया पण खूप सुंदर होती. तिने लाल शॉर्ट ड्रेस घातला होता. त्यामुळे तिच्यावर कोणाची नजर खिळणार नाही, असे होणारच नव्हते.

राजीवने सुद्धा तिला आवडीने हॅलो केले. त्यांच्या आता थोड्या गप्पा सुरू झाल्या होत्या. दिया बिझनेसला अनुसरून बोलत होती. त्यातून ती किती हुशार आहे , हे कळून येत होते.

"मे आय डान्स विथ यू? तुम्ही खूप एनर्जेटिक आणि खूप छान डान्स करत आहात. मला तुमच्यासोबत डान्स करायला आवडेल." दिया राजीवला म्हणाली.

तेवढयात ड्रिंक वाटणारा तिथे आला. दियाचा त्याला धक्का लागला. त्याच्या हातातील पूर्ण ट्रे कमलच्या कपड्यांवर पडला. त्यामुळे तिचा ड्रेस बराच खराब झाला होता.

"ओह! आय एम सॉरी." दिया कमलला म्हणाली. कमल मात्र आपल्याच तालात होती. तिला हळूहळू नशा चढत आहे असे दिसत होते.

"ही कोण आहे? तुमची मुलगी काय?" दिया राजीवला म्हणाली.

"नो. ती माझी वाइफ आहे." राजीव.

"ओ! पण थोडी विचित्र वागत आहे. ठीक आहे मग, यू कॅरी ऑन. बायको इथे असल्यावर डान्स कसे चालणार करायला?" दिया.

"वेट. तसे पण तिचा ड्रेस खराब झाला आहे. ती जाणारच होती. " राजीव दियाला जातांना बघून म्हणाला.

"आर यू शूअर? कारण मी तिच्या समोर कंफर्टेबल नाही. मला डिस्टर्बनस् आवडत नाही." दिया.

"येस येस. वेट. मी तिला कारमध्ये सोडून येतो." राजीव.

"तुम्ही कशाला त्रास घेता." तिने कोणतरी इशारा केला तसे तिथे एक मुलगी जी तिथला स्टाफ होती ती आली.

"यांचा ड्रेस क्लीन करून द्या आणि यांना बाहेर त्यांच्या कारमध्ये बसवून या." दियाने तिला सांगितले.

"येस मॅडम." ती कमलचा हात पकडत तिला घेऊन जाऊ लागली.

वेदचे सगळे लक्ष इकडेच होते.
इकडून दियाने वेदला थंप्सअप दाखवले. त्याने पण छान हसून तिला धन्यवाद केले.

*******

क्रमशः


भाग १३ मध्ये वेद च्या मित्राचा उल्लेख , त्याबद्दल पुढे येईल.
लाईक्स आणि कॉमेंट साठी आपले सर्वांचे खूप खूप आभार.
कथा कशी वाटतेय नक्की सांगा.
Thank you.


🎭 Series Post

View all