Oct 16, 2021
बालकथा

मीकीचे दुःख..

Read Later
मीकीचे दुःख..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
मीकीचे दुःख
...मायकल उंदीर म्हणजे मिकी माऊस आपल्या घरात येरझाऱ्या घालत होता.....त्याच्या चेहऱ्यावर फारच चिंता दिसत होती.. मायकल आता फ़ार म्हातारा झाला होता.. त्यामुळे ये- जा करतांना त्याची पावले फ़ार हळू हळू पडत होती.. म्हातारपणामुळे त्याची शक्ती बरीच क्षीण झाली होती...कारण १८ नोव्हेंबर १९२८ जन्म त्याचा.. आता नव्वदी पार केली होती त्याने...
आपल्या पतीला इतक्या चिंताग्रस्त अवस्थेत फेऱ्या मरताना पाहुन.... अहो! काय झाल?तुम्ही इतके चिंताग्रस्त का?..मिनीने आस्थेने विचारले... आज मला माझे जन्मदाते वॉल्ट डीजनी आणि यूबी ईव्केर्स यांची फ़ार आठवण येतेय ग मिनी! तो गंभीर आवाजात म्हणाला... ओ! आठवणच येतेय ना?मग त्यांत चिंता करण्या सारखे काय? .. ..नाही ग मिनी! माझी चिंता माझ दुःख वेगळे आहे.... अस काय दुःख आहे मिकी?..मी तर तुझी अर्धांगिनी मला तर तु सांगु शकतोस...कदचित तूझ दुःख दूर करायला माझी काही मदत होईल?.. माझ हे दुःख तुला तर नक्कीच सांगु शकतो माझ्या लाडके!... मिकीने आपले दुःख मिनीला संगितले. तशी तीच्या चेहऱ्यावर देखिल चिंतेची रेष दिसली.... मिकी! समस्या तर खरंच फ़ार गंभीर आहे.. आणि वेळेवर जर यांवर काही उपाय केला नाही तर भविष्यात याचे फ़ार वाईट परीणाम होतील. मिनी काळजीच्या सुरात म्हणाली...
मिकी! मला काय वाटते आपण या विषयी आपला मित्र डोनाल्ड बदकाला विचारू तो नक्की या समस्येवर काहीतरी उपाय सांगेल मिनी आत्मविश्वासाने म्हणाली..
ठीक आहे! ... मिकीने आपल्या प्लूटो कुत्र्याला हाक मारली व ते तिघंही डोनाल्ड बदकाकडे गेले..बदक गुफी बरोबर बागेत एका बाकावर बसले होते.. म्हातारपणामुळे ते देखिल आता बरेच थकले होते... तसं ते मिकी पेक्षा पाच सहा वर्षानी लहान होत होत...
मिकी, मिनी व प्लूटोला पाहून ते हळुच बाकावरून उठले.....या! या!! मिकी आणि फेमिली.. डोनाल्ड बदक आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे!... अस सांगुन त्याने आपला जिवलग मित्र मीकीला मिठी मारली..
मिकी बऱ्याच दिवसांनी या मित्राची आठवण झाली. काही विशेष?... बदकाने आनंदाने विचारले... डोनाल्ड! काय सांगु मित्रा ?..दुःखी आवाजात मिकी म्हणाला.. काय झाले मिकी मित्रा? तूझ्या चेहऱ्यावर इतके दुःख का?..... मिकीने आपले दुःख डोनाल्ड बदकाला संगितले... व आता यांवर तुच काहीतरी उपाय सुचव अशी विनंती केली...
समस्या तर फ़ार गंभीर आहे मिकी मित्रा!....बराच विचार करून ते म्हणाले.. समस्या तर मोठी आहे. याची तक्रार पोलिस स्टेशनला करावी लागेल.कारण कायदेशीर कारवाई केली तरच ही गंभीर समस्या दूर होऊ शकते अन्यथा कठीण आहे. मिकी मित्रा!....पण ही तक्रार आपण कोणत्या पोलिस स्टेशनला करायची? या कामी कोण आपल्याला मदत करेल डोनाल्ड मित्रा?.... आहे! एक आहे!! जो या कामात आपली मदत करेल मिकी मित्रा!... कोण? कोण आहे तो? मिकीने फ़ार फ़ार अधीरतेने विचारले..त्याचे नाव आहे लिटिल सिंघम!...लिटिल सिंघम या कामी नक्की आपल्याला मदत करेल मिकी मित्रा!...लिटिल सिंघम चे नाव ऐकून सर्वांना आनंद झाला. कारण त्याच्या कर्तुत्वाचे किस्से सर्वांनी ऐकले होते...
पण मिकी मित्रा! आपल्या दोनचार जणांनी जाऊन ही तक्रार केली तर फारसा उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्याला जग भरात प्रवास करून आपल्या सारखे काम करणाऱ्या अनेक मित्रांना एकत्र कराव लागेल... त्यांच संघटन कराव लागेल... आणि यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा... चल ! या चांगल्या कामासाठी आम्ही आजच तुला आमचा नेता म्हणून जहीर करतो. ....यावर मिकी फ़ार भाऊक झाला व म्हणाला.मला हा मान दिल्याबद्दल आपल्या सर्वच मित्रांचे मनःपूर्वक आभार... मात्र या कामी तुमच्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे!...मिकीने हात जोडून विनंती केली.
दुसऱ्या दिवशी सगळेजण प्रवासास निघाले.... प्रवास फ़ार दूरचा होता....पण त्यांचा निर्णय पक्का होता...
प्रवासात त्यांना एका घरा जवळ टॉम नावाचे मांजर व जेरी नावाचा उंदीर पकडा- पकडी खेळताना दिसले... .. नमस्कार टॉम भाऊ व जेरी भाऊ!...मिकी टिमने त्या दोघांना नमस्कार केला.. आम्ही सगळे तुमच्याकडे एक काम घेऊन आलोय! ...मिकीने हात जोडून टॉम व जेरीला आपले दुःख संगितले.....दोघंही विचार करत म्हणाले.. मिकी खरंच या समस्येवर तूझ दुःख करणे योग्य आहे....तु आणि तूझे मित्र जी लढाई लढत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे. मिकी तु काळजी करू नकोस ही लढाई तुझी एकट्याची नसुन आपली सर्वांची आहे.. आम्ही दोघंही या लढाईत तूझ्या बरोबर आहोत...
त्या दोघांचा टिम मध्ये समावेश झाल्याने टिमचे मनोबल वाढले..खास करून डोनाल्ड आणि मिकीचे..त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरवात केली... प्रवास करता करता ते एका घनदाट जंगलात पोहचले.. त्या जंगलात त्यानां अनेक प्राणी पक्षी दिसले.... मात्र आता जो प्राणी त्यांनी पाहिला त्याला पाहुन सर्व टिमला आश्चर्य वाटले. या इतक्या जंगलात हा माणसा सारखा दिसणारा प्राणी काय करतोय? असा प्रश्न त्यांना पडला.. शेवटी न रहावून डोनाल्ड बदकाने त्याला त्याला हाक मारली.. मित्रा! तूझे नाव काय? तु माणसासारखा दिसतोस.. तरिही या घनदाट जंगलात काय करतोस?....
मी मोघली!..आणि लहान पणापासून या जंगलातच रहातोय.या जंगलातील प्राण्यांनीच मला लहाणाचे मोठे केले....अस सांगुन तो जोरजोरात ओरडू लागला... त्याचा आवाज ऐकून बल्लू, बगीरा, पोनीया, जकाला, माशा, इकी,तबाकी,का, अकेला, लाली, बाला ई.. तेथे धावत आले... बल्लूने त्यांना येथे जंगलात येण्याचे कारण विचारले. तसं मिकीने त्यांना आपले दुःख संगितले... बल्लूने थोडाही विचार न करता या नेक कामी आम्ही सर्वच तूझ्या सोबत आहोत अस सर्वानुमते आश्वासन दिले... पण याची खबर शेरखानला होता कामा नये असे तो म्हणाला.... नाही! नाही!! बल्लू या कामासाठी आपण आपले व्यक्तिगत हेवेदावे बाजुला ठेऊन सगळ्याना बरोबर घेतले पाहीजे तेंव्हाच आपले मिशन पुरे होईल.. डोनाल्ड बदक विनंतीच्या स्वरात बल्लूला म्हणाले.... ठीक आहे!.. .. अस सांगुन बल्लू ने शेरखानचा खास सेवक तबाकीला शेरखान व कालाला निरोप घेऊन पाठवले..
काही वेळाने काला व शेरखान आले... मला इथे का बोलवले इन्सानी बच्चे ?...अस तो मोगलीला म्हणाला.... मोगलीने नाही आम्ही बोलवले तुम्हांला.. मिकी म्हणाला... आणि त्याने आपले दुःख शेरखान व काला यांना संगितले... ठीक आहे!..आम्ही तुमच्या सोबत आहोत मिकी!... चांगल काम आहे...शेरखानची दुष्मनी मोगली बरोबर आहे..मुलां विरुध्द नाही!.... शेरखानच्या होकाराने सगळ्याना आनंद झाला...
मिकीची टिम आता बरीच वाढली .. त्या सगळ्याना घेऊन मिकी पुढील प्रवासाला निघाला.प्रवास करता करता ते बरेच पूर्वेला आले.. तेथे त्यांना नोबीता, सूजूका,मीनामोतो ,सूनेओ होनकावा आणि जियान नावाची मुलं भेटली त्यांच्या सोबत डोरेमोन नावाची मांजरा सारखी दिसणारी एक बाहुली देखिल होती ... .मिकीने आपले दुःख त्यांना संगितले...त्यांनीही या मिशन मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला... आपल्याला येथुन लिटिल सिंघम कडे जायला बराच वेळ लागेल त्यासाठी माझ्याकडे एक गेजेट आहे त्याच्या आधारे आपण लवकर पोचू अस डोरेमोन म्हणाला.. डोरेमोनच्या गेजेट च्या आधारे प्रवास करत करत सर्व ढोलकपुर नावाच्या गावात पोहचले.. त्या गावात एका मोठ्या झाडाखाली काही मुलं खेळताना दिसली.. त्यात एक मुलगा बाजुला बसुन लाडु खात होता.. सगळी टिम झाडाखाली आली.... लाडु खाणारा मुलगा चुणचुणीत व बलशाली होता. मिकीने त्याला नाव विचारले ... मी छोटाभीम! आणि हे माझे मित्र.. ही चुटकी,हा राजू, हा कालिया आणि हे ढोलु भोलू.. सगळ्यांची ओळख करून देत तो मुलगा म्हणाला... तुम्ही कोण आहात?आणि इतक्या मोठ्या संख्येने कुठे जात आहात?..... मी मिकी आणि हे माझे सर्व मित्र... आम्ही एका खास मिशन वर चाललो आहोत..कोणते मिशन? छोटा भीम ने विचारले.. आपल्या दुखा बद्दल मीकीने छोटा भीमला संगितले.आणि त्यांनाही या कामात सहभागी होण्याची विनंती केली... मिकीची विनंती मान्य करून ते मिशन मध्ये सामील झाले...
टिम पुढच्या प्रवासाला निघाली... प्रवासात.. त्यांना सायकल वर जाणारी चार मुलं दिसली.. मिकी ने सहज विचारले बच्चा कंपनी कुठे निघाली? तस त्यांतील एक मुलगा म्हणाला बच्चा नही केहेना अंकल! शिवा!..शिवा!!नाम हे मेरा!... अरे! शिवा अस काय करतोस आपले मिकी अंकल आहेत ते! रेवा म्हणाली.. माफ करा मिकी अंकल मी आपल्याला आधी ओळखले नाही! शिवा माफीच्या स्वरात म्हणाला.. आपण सर्व कुठे निघालात अंकल? आदी आणि युदीने विचारले....तेव्हा त्यांनाही मिकीने आपले दुःख संगितले... यावर आम्हीही या मिशन मध्ये सामील आहोत असे ते म्हणाले..
पुढील प्रवासात त्यांना हनी बनी ,जोरदार , पोपट ,किटी, सनी, तोताराम भेटले... ..मिकी टिमला पाहुन हनी बनीला म्हणाला छोटे भाई हे कोण आहेत? ह ..हा..ह. हा.. करत बनी म्हणाला बडे भाई हे मिकी सर आहेत.. ह.. हा.. ह.. हा..
आणि बडे भाई! मिकीसर आपल्याला सर्वात सीनियर आहेत.. ह.. हा.. ह.. हा. बनी समजवत म्हणाला.. हनी! मिकी सर सगळ्यात पहिले आहेत कोई शक?... पोपट म्हणाला...मिकी ने जमवले प्रिय मित्र!... काल येऊन चावल वेड कुत्र..ठोको टाली। खन्ना साब म्हणाले.
बोला मिकी सर आम्ही तुमच्या साठी काय करू शकतो? बनीने विचारले... मिकीने आपले दुःख त्यांना संगितले.... त्यांनीही लगेच या मिशन मध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या बरोबर पुढच्या प्रवासाला निघाले... वाटेत त्यांना मोटु पतलू, गुरु भोले, शिंगचैन,पावर पेट्रोल, सुपर स्पीडो, मायटी राजू,जय वीरु, ओगी झूरळ,डॉगी ब्रदर्स असे कितीतरी मित्र मिळाले... त्या सर्वानी मिकीचे दुःख ऐकून मिशन मध्ये भाग घेतला..
त्यामुळे आता मिकी टिमला सेनेचे स्वरूप प्राप्त झाले...ही सगळी सेना लिटिल सिंघमच्या पोलिस स्टेशन जवळ पोहचली... पोलिस स्टेशन बाहेरची प्रचंड गर्दी पाहुन लिटिल सिंघम बाहेर निघाला... त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने येथे येण्याचे कारण विचारले..
मिकी पुढे होऊन म्हणाला...सिंघम या सगळ्याना मी माझे दुःख संगितले.. माझ दुःख हे यांचे देखिल आहे..म्हणून हे सगळे माझ्या बरोबर तुमच्या कडे तक्रार नोंदवायला आले आहेत.. तक्रार? कसली तक्रार? आणि कोणाविरुध्द?... लिटिल सिंघम विचारले..
पालकांविरुध्द तक्रार! मिकी म्हणाला.. बोला मिकी सर! काय तक्रार आहे तुमची ?.... सिंघम! तुला तर माहीतच आहे मी आणि या सगळ्यानी मुलांचे मनोरंजन करता करता त्यांना चांगले संस्कार देण्याचा वसा घेतला आहे.. आणि १९२८ पासुन ते आजपर्यंत हे काम अविरतपणे चालु आहे.. पण आता काळ बदलला आहे. आताची मुलं आमच बोधपर वागण.. बोलणे टीव्हीवर पाहत नाही. सगळी मुलं आता मोबाईल वर नाही- नाही ते विडिओ गेम खेळत असतात... त्यात ते इतके तल्लीन होतात की, त्यांना काश्याचेच भान राहत नाही...आणि त्याचा फायदा तर काहीच नाही... त्या गेम मधुन ना चांगली शिकवण ना चांगले संस्कार. काही काही मिळत नाही....मोबाईल वर दिवस रात्र ते गेम खेळण्यासाठी मुलं वेडे होतात.. त्यांना कसलेही भान राहत नाही.. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर फ़ार विपरीत परिणाम होतो... हे असच चालु राहिले तर भविष्यात सगळी मुलं आंधळी होतील.. पालकांनी वेळीच मुलांकडे लक्ष दिले नाही तर.. पुढे या मुलांचे कसे होईल.. याची मला फ़ार काळजी वाटते सिंगम!...पालक आधी आम्हांला दोष द्यायचे की, आम्ही मुलांना बिघडवतो असे आरोप करायचे. वास्तविक आम्ही मुलांचे मनोरंजना बरोबर किती तरी प्रबोधन करतो.. जे पालक आम्हांला त्या वेळेस शिव्या शाप द्यायचे तेच पालक आता आपली मुलं डोळे फाडून आख्खा वेळ मोबाईल वर धाड.. धाड.. करत असतात तेव्हा काही बोलत नाही..त्या पालकां विषयी माझी तक्रार आहे.... कारण मुलं तर लहान आहेत.. नादान आहेत.. त्यांना समजावण्याचे काम पालकांचे आहे... तेच जर काही बोलत नसतील तर येणारी पिढी आंधळी, लुळी व पांगळी असेल! पांगळी असेल सिंगम!! आपल्या दुःखाचा बांध आवरत मिकी म्हणाला....अगदी बरोबर आहे मिकी सर मी तुमच्या भावना चांगल्याच प्रकारे समजु शकतो.
ठीक आहे! .. पालकांनी वेळीच याकडे लक्ष द्यावे अशी तक्रार मी नोंदवून पालकांना या विषयी नोटिस काढतो व आजच सरकारला या संदर्भात विनंतीपत्र लिहतो की, वीडियो गेम बाबत योग्य ती कार्यवाही करावी. लिटिल सिंघम म्हणाला.
मिकी आणि त्याच्या टिमचे दुःख ...आणि त्यांची मुलांविषयी असलेली काळजीतुन उभ्या राहिलेल्या संघर्षाच्या कहाणीची जगभरातल्या प्रसार माध्यमांनी व बालसाहित्यकानीं दखल घेतली... व त्यांनीही आप आपल्या सरकारला या विषयी वेळीच पाऊल उचलण्यातची विनंती केली..
पाहिलत मुलांनो मिकी आणि त्यांच्या मित्रांना तुमची किती काळजी आहे ते!... आता तुम्हीच ठरवा भविष्यात तुम्ही डोळस राहणार की,आंधळे होणार? ...

(कथा मोबाईल वर टाईप केल्याने यांत बऱ्याच चुका आहेत त्या बद्दल माफी असावी.)

लेखन: चंद्रकांत घाटाळ
संपर्क: ७३५०१३१४८०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक