तेवढ्यात त्यांची मोठी सून येते..
"आई मी निघते, मावशी आलात? बरं झालं...मी येते संध्याकाळ पर्यंत.."
असं म्हणत मोठी सून नोकरीवर निघून गेली.
सुषमा काकू धाकल्या मुलाचा डबा बनवू लागल्या..
"काय गं? तू का बनवतेय त्याचा डबा? त्याची बायको कुठेय? आणि मोठ्या सुनेने काही बनवलं नाही का?"
सुषमा काकू अपराधीपणाने सांगू लागल्या.
"मोठ्या सुनेला घरातलं काही काम सांगायचं नाही असं फर्मान काढलं आहे माझ्या मोठ्या मुलाने...मोठ्या नोकरीवर आहे ती.."
"आणि लहान सून??"
"तिचा जॉब दुसऱ्या शहरात आहे, सुट्टीच्या दिवशी येते ती घरी.."
वसुधा काकूंना ऐकून धक्काच बसला..पण आता त्यांनीही चांगलं तोंडसुख घेतलं..
"मला तर म्हणत होतीस सुना आल्या की मस्त ऑर्डर सोडणार...मला मुलगी आहे तर तिच्या घरात राबावं लागतं म्हणून टोमणा मार्ट होतीस, आता काय झालं?? पाहिलं ना? मी तर एकच दिवस राबले, तुला तर कायम राबावं लागतंय..."
"मुलांसाठी एवढं तर करू शकते ना.."
"मलाही आहेत मुली...पण त्यांच्या त्यांच्या घरी त्या सुखात आणि मी आणि माझा नवरा आमच्या घरात सुखी...कामाची वणवण नाही, डबे नाही की भरमसाठ स्वयंपाक नाही..असो,
माझ्या दोन्ही मुली त्यांच्या नवऱ्यांसोबत मस्त केरळच्या ट्रीपला गेल्या आहेत, खूप छान जमतं दोन्ही जोड्यांचं...
माझ्या दोन्ही मुली त्यांच्या नवऱ्यांसोबत मस्त केरळच्या ट्रीपला गेल्या आहेत, खूप छान जमतं दोन्ही जोड्यांचं...
ते जाऊदे...तुझी दोन्ही मुलं काय म्हणताय? मजेत ना?
सुषमा काकू हे ऐकून रडायलाच लागल्या...
"त्यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद झाले, लहान मुलगा घर सोडायच्या तयारीत आहे आणि मोठ्याने तर आपल्या लहान भावाला रक्त येईपर्यंत मारलं.."
वसुधा काकूंना बहिणीची समजूत कशी घालावी हेच कळत नव्हतं, ते काहीही असो, पण...
मुलं आहेत म्हणून मिजाशीत राहणाऱ्या आणि दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या काकूंना आज चांगलाच धडा मिळाला होता...
मुलं आहेत म्हणून मिजाशीत राहणाऱ्या आणि दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या काकूंना आज चांगलाच धडा मिळाला होता...